Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

खुर्ची

सायली कराडे जुलै 29, 2026 1 minute read
0
roel-dierckens-LzGjfk1SeDw-unsplash.jpg

#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६

मध्यंतरी एका कार्यक्रमात जाण्याचा योग आला. खरं सांगायचं तर योग आला हे उगाच औपचारिकता जपावी किंवा झाकली मूठ सव्वालाखाची राहू द्यावी म्हणून म्हणायचं. तसं तर तिथे जाणं अनिवार्यच केलेलं. कार्यक्रम कुठला वगैरे प्रश्न तुम्ही मनात आणूच नका. त्याने कोणाचं ही भलं होणार नाहीय. 

आता कार्यक्रम म्हटला की ठिकाण आलं, वेळ आली – पण आपण भारतीय असाल तर आपल्याला ठावूक असेलच की दिलेली वेळ आणि आपण जाऊन पोचणार ती वेळ यातला समन्वय आपला आपल्यालाच साधावा लागतो. दिलेल्या वेळेनुसार गेलात तर तिथे केरसुणी घेऊन स्वच्छता करण्याच्या कार्यक्रमाला तुमची हजेरी लागते. पण मग उशिरा जायचं तर किती याचा मात्र तुमचा तुम्हाला अंदाज यावा लागतो. मग असाच आम्ही सुद्धा भारतीय प्रमाण वेळेनुसार – भौगोलिक नाही प्रचलित बरं का – आम्ही जाऊन पोहचलो. समोर बघतो तर काय – तुफान गर्दी!

लोकसंख्येचा विस्फोट काय तो म्हणतात तो हाच का असा प्रश्न आपसूक मनात डोकवावा इतकी गर्दी आणि गरमी सुद्धा. आता खरी कसरत सुरू झाली ती स्थिरस्थावर होण्याची. सोबत सामानाचं ओझं, त्यात हजेरी लावण्याची धडपड – मघाशीच सांगितलं नाही का – अनिवार्य होतं म्हणून. एरवी कुंभकर्णाने डोक्यावर हात ठेवलेले आम्ही – कुठे जातोय कुठल्या कार्यक्रमाला. तर मग कसे बसे समान ठेवण्याची सोय केली अन् हजेरी सुद्धा लावून झाली – एकदाच हुश्श झालं – म्हणजे तसं अर्धच – कारण खुर्ची मिळाली नव्हती ना अजून. 

लोकसंख्या तूफान असली तरी खुर्च्या मर्यादेतच होत्या. कसं आहे – खुर्च्यांची लग्नं होत नाहीत. त्यामुळे असेल कदाचित त्यांची संख्या मर्यादेत. आणि अहो, नुसता खुर्चीचा प्रश्न नाही बरं का! ती पंख्यासमोर असली पाहिजे – अहो हो! वर पंखा नव्हता ना – बाजूला होता जमिनीवर. उभ्या जागेवरून टेबल फॅन सारखी शक्य होईल तितकी मान वळवून खुर्ची – आणि तेही रिकामी – रिकामी असणं महत्त्वाचं – दिसते का ते बघितलं. पण कसलं काय! संगीत खुर्चीच्या खेळात एकच खुर्ची कमी असते पण इथे बऱ्याच कमी होत्या. आता प्रतिक्षेची पराकाष्ठा वगैरे करावी लागते की काय या विचारात असतानाच नेमका माझा भ्रमणध्वनी ओरडू लागला – त्याला शांत करून तिथल्या गोंगाटात होता होईल तितके संभाषण करून मागे वळते तो काय – हृदयात एक हलकी कळ उठावी तसं दृश्य – माझ्या सोबतची अगदी क्षणभरापूर्वी उभी असलेली मंडळी खुर्च्यांवर बसलेली. कसं आहे – आपल्या घरचे दिवे नसताना दुसऱ्याच्या घरात उजेड असलेला कसा बघवेल ना तसं च माझं ही झालं. त्यात “नेमक्या वेळी तू कुठे जातेस?” असं ही ऐकवून झालं मग तर जखमेवर मीठ चोळावं तसं झालं मला. पण काहीही झालं तरी चेहऱ्यावर दिसू द्यायचं नसतं. त्याने दु:ख अधिक वाढतं. जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात मी उभी राहिले जिथल्या तिथे. 

थोड्या वेळाने व्यासपीठावर खुर्च्यांची कमतरता भासल्याने तिथे खुर्च्या देण्यात आल्या. मी सुद्धा त्यातल्या उरलेल्या खाली देतात की काय याची वाट बघू लागले. जसा तो खुर्च्यांचा ढीग खाली उतरून माझ्या जवळ जवळ येऊ लागला तशी हृदयातली धडधड वाढू लागली. मग माझ्या सारखे अनेक खुर्ची लाभार्थी उभे असताना त्यांच्या गरड्यातून स्वतः साठी एक खुर्ची कशीबशी मिळवली अन् टेकले त्यावर. टेकल्यावर कळतंच आपण किती वेळ उभे होतो ते. 

कार्यक्रम समोर समोर सरकू लागला, खुर्ची मिळाली पण आता एक अडचण दूर झाली की दुसरीकडे लक्ष वेधतं तसं गरमी होऊ लागली म्हणून पंख्याचा ध्यास लागला. नेमके पंख्यासमोर बसलेल्या मंडळींमुळे हवा अडत होती. ते उठल्यावर ती हवा थेट यांच्यापर्यंत येऊन पोचेल अन् आम्ही सुखावणार इतक्यात त्या पंख्याचं तोंड दुसरीकडे केल्या गेलं आणि आमचं तोंड मात्र कसनुसं झालं. सुख म्हणून नाही हो जीवाला. 

खूप वाटणाऱ्या तरीही थोडाच वेळ संयमाची परीक्षा बघून झाल्यावर ठरलं बाहेर जाऊयात. पण मग मला तर आत्ताच बसायला मिळालं. खुर्ची गेली तर? परत बाहेरून आत बसावं लागलं तर? परत खुर्ची टंचाईचा सामना?? नको नको म्हणून थोडा वेळ थांबले पण मग बहुमताचा विजय झाला अन् मन घट्ट करून उठले – अगदी दुसऱ्या क्षणाला खुर्ची गेली की हो माझी. खुर्ची सुख नव्हतंच म्हणा ना माझ्या नशिबात. 

असो, तुम्हाला आणि ज्यांना कुणाला खुर्ची मिळण्याची इच्छा आहे त्यांना ती मिळो ही शुभेच्छा. 


roel-dierckens-LzGjfk1SeDw-unsplash.jpg

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: “ओंजळ”
Next: कोशातील कातरवेळ
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.