Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

श्रावणमास

ऐश्वर्या डगांवकर जुलै 30, 2026 1 minute read
0
gumohor-water
श्रावणमास
    श्रावण महिना म्हणजे आपल्या हिंदूंचा पवित्र 
महिना.याला श्रवण करण्याचा महिना असंही म्हटलं तरी हरकत नाही.भारतीय लोकांच्या हृदयावर सत्ता गाजविणारा महिना.अनेक महान लोकांच्या जयंती आणि पुण्यतिथीचा महिना.याच महिन्यात आपल्याला स्वातंत्र्य देखील मिळाले.  याच महिन्यात लोकमान्य टिळक यांची ,रविंद्रांची पुण्यतिथी येते. अरविंदांचा वाढदिवस असतो.      नागपंचमी,रक्षाबंधन,स्वातंत्र्यदिन,गोकुळ अष्टमी म्हणजे साक्षात् श्रीकृष्ण भगवान ची जयंती आणि सरतासरता पोळा असे विविध सणाव्रतांनी सजलेला हा महिना . योगायोग पहा की बहुतेक वेळेस श्रावण आणि इंग्रजी महिना ऑगस्ट दोन्ही हातात हात घालून जोडीनेच येतात.जसा आपल्यासाठी हा भव्य -दिव्य महिना तसाच ऑगस्ट चा अर्थ देखील 'महान भव्य
 आहे.'अनाथ,दीन दुबळ्यांची मदत करणा-या मदर टेरेसांचा जन्मदिवस देखील याच महिन्यात येतो.
           आपला देश हा कृषिप्रधान असल्याने. शेतक-यांना जेव्हा शेतीच्या कामातून सवड मिळते तेंव्हा आपण सगळे सणवार साजरे करतो.मग तो श्रावणमास असो किंवा होळी वा दिवाळी असो. श्रावणात शेतीची बरीच कामे झाली असतात. स्त्रीवर्ग पण फ्री असतो.मग त्या भागवत सप्ताह,व्रत वैकल्ये करण्यात रमलेल्या असतात.पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं कमी असल्याने .गावातील लोक नदीनाल्यांना पूर असल्याने इकडेतिकडे जाता येत नसे. त्यामुळे पुरुष मंडळी पण भजन कीर्तन प्रवचन यात रमायची.त्यातून जगाचा पालनहार चार महिने झोपल्यावर आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आणि शिवस्तुतीत वेळ घालवायचा.अशाप्रकारे श्रावणमासाचे सर्व सणवार दणक्यात पार पडायचे. लहानपणी आजी आई काकू यांच्यासोबत बालगोपाळही त्यात रस घ्यायचे.गोडधोड करण्यात आणि खाण्यात सर्वांचाच वेळ छान जायचा.मग पोथ्या पुराणे सप्ताह चालायचे.काही बायका नक्त करायच्या म्हणजे एक वेळा उपवास आणि दूस-या वेळेस धान्यफराळ करायच्या.प्रत्येक सणावाराची एक वेगळी कहाणी असायची.त्या सर्वांमधून बरेच बोध मिळायचे.प्रत्येक वाराची एक  कहाणी.या सर्व कहाण्या आजही समायोजित आहे असं मला वाटतं.नागपंचमीच्या कहाणीतून,बैलपोळा सारख्या कहाणीतून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सण साजरे केले जायचे.
तर वृक्षांच्या पूजेतून पर्यावरणाचा संदेश दिला जायचा.सोमवारच्या कहाणीतून घरात कुणाला उपाशी ठेवून परमेश्वराला दूध अर्पण केल्याने तो प्रसन्न होत नसतो.हे सांगितले जाते.तर मंगळवारच्या कहाणीतून अल्पायुषी मुलगा देखील देवीची कृपा होऊन वाचू शकतो .म्हणजे ज्योतिष शास्त्र आलेच की जे आज जगात खूप महत्त्वाचे ठरते आहे.एकीकडे अंधश्रद्धा नको म्हणणारे सुद्धा वेळ पाहून मुलं जन्माला घालतात.ज्या मुलीच्या आयुष्यात वैधव्य योग नसेल अशा मुलीशी अल्पायुषी  मुलाचे लग्न लावले तर मुलगा वाचणारच ही खात्री.बुध बृहस्पतीच्या कहाणीतून आपल्याकडे असले तर नाही म्हणू नये.शक्यतोवर कुणाला उपाशी पाठवू नये.त्याचप्रमाणे कुणाचे दिवस केव्हां पालटतील हे सांगता येत नाही म्हणून कुणाची चेष्टा करू नये. शुक्रवारच्या जिवतीच्या कहाणीतून कितीही लपवलं तरी एक दिवस सत्य उघडकीस येतंच.त्याच प्रमाणे गरीबीचा अपमान करू नये.शनिवारच्या कहाणीत परत कुणाला विन्मुख पाठवू नये.देव कुठल्या रूपात तुमच्या दारी येईल हे सांगता येत नाही.लोकांना दिलं तर आपल्या संपत्तीत वाढच होते दानत्वाची वृती असावी हे ही कहाणी सांगते रविवारच्या कहाणीतून नशिबात असलं तरच मिळतं.नाहीतर ' दैवानं दिलं पण कर्मानं नेलं 'असं म्हणायची वेळ येते येते. एकंदरीत प्रत्येक कहाणीतून काहीतरी शिकायला मिळते.असं सांगितलं तर कुणाला पटत नाही .मग त्याला थोडा धार्मिक पुट देऊन देवाधर्माची आवड निर्माण करणं हा देखील उद्देश असतो.
            सणावारांचे देखील तसेच असते.नाग शेतकऱ्यांचा मित्र म्हणून त्याला एक दिवस लाह्या, फुटाणे , गव्हाची खीर  बाटीचा नैवेद्य दाखवून दूध पाजायला देणं हे सर्व कृतज्ञता दाखवण्याचं काम.राखीपौर्णिमेची काही वेगळीच मजा असते.त्याला महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हटलं जातं.समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करून त्याला शांत करायचा.कारण तोपर्यंत पाऊस बराच जोरात असतो.समुद्रही खवळलेला असतो.त्याला शांत करून नंतर कोळी लोक मासेमारीसाठी निघतात.अगस्ती ऋषींनी रागाने सात समुद्र प्राशन केले होते
असा पुराणात उल्लेख आहे.उत्तर भारतात हा सण राखी पौर्णिमा म्हणून अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो.या सणाचं खूप महत्त्व आहे. बहिण भावाचं प्रेम आणि नकळत्या वयापासून भावाने बहिणीची रक्षा करायची हे बाळकडू पाजले जाते.मग गोकुळ अष्टमी. साक्षात श्रीकृष्ण भगवानांचा जन्म या दिवशी झाला.पूर्वी लहान गावांत या दिवशी दांडपट्टा,मलखांब कुश्त्या वगैरे  होत असत.दहीहंडी फोडणं दूस-या दिवशी गोपालकाला असायचा.मुंबईला तर खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा खेळ रंगतो.मोठमोठे सिनेनट-नट्या या कार्यक्रमात भाग घेतात.एक वेगळीच रंगत यात असते. उत्तर प्रदेशात देखील यांचे फार महत्व या सणातून बरेचसे बोध आपल्याला मिळतात.भेदभाव जातपात विसरून सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने रहाण्याचा खेळण्याचा संदेश कृष्णाने आपल्याला दिला.सर्वांचा गुरू जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी तर परमेश्वराने हा प्रपंच केला.त्याने गायी पाळल्या , घोडे हाकले.वेळप्रसंगी भक्तांच्या घरी उष्टी पण काढली .खांद्यावर घोंगडी ,गळ्यात तुळशीची माळा ओठांवर साधी लाकडी बांसरी .पण त्या बांसरीतून निघणारे सूर मात्र दिव्य सर्व जगाला मोहविणारे.गोकुळातील अशक्त दुर्बळ लोकांच्या बाजूने सदैव उभा असे. त्याना दूध लोणी खाऊ घालत असे यांतून आपल्याला गरीबांची मदत करायला हवी हे समजते.तर कालिया नागाचा वध करून स्वतःमध्ये असलेल्या अहंकार द्वेष ,मत्सरादि
रिपूंना  नष्ट करण्याचा संदेश दिला. वेळप्रसंगी साक्षात इंद्राला सुद्धा नाराज करून गावक-यांना पावसासाठी त्याची पूजा करू नका तर जो तुमच्या गायी चारायला मदत करतो करतो,गवत उगवतो अशा ' गोवर्धन ' पर्वताची पूजा करा असे सांगून पर्यावरणाची रक्षा करा असेही सांगितले.
इंद्राने अतिवृष्टी करून गोकुळवासीयांना छळले तेव्हा त्याने सर्व एकत्र येऊन काठ्या लावून पर्वताला उचला आणि त्याचे छत्र बनवा.यातून एकीचे महत्व सांगितले.शेवटी बैलपोळा येतो .त्यादिवशी बैलांची पूजा केली जाते.बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालून त्यांचे शिंग रंगवून त्यांना माळा घालतात. गळ्यात घुंगुरमाळा घालतात. अंगावर झूल घालतात.घरात पुरणपोळीचा नैवेद्य करून बैलांना खाऊ घालतात. संध्याकाळी घरोघरी बैलजोडी फिरवून त्यांची पूजा औक्षण केले जाते.पूर्वी शेतकरी बैलांवर अवलंबून असायचे.त्यांच्या कष्टा विषयी कृतज्ञता दर्शविण्यासाठी हा सण साजरा केला जातो.घरी आल्यावर शेतकरी त्याला विनवितो त्याची प्रार्थना करतो ” मी तुला मारतो , टोचतो पण तू मला क्षमा कर आणि हा नैवेद्य  खा.तूच माझं खरं दैवत ” असं म्हणून त्यांचे मुलाप्रमाणे लाड करतो आणि त्याला खाऊ घालतो.खानदेशात बैलपोळ्याविषयी अनेक दंतकथा आहेत.त्यात एक बैल त्या दिवशी काहीच खात नसे.कदाचित त्याच्या मनात वर्षभर आपल्याला मारतात आणि एक दिवस लाडीगोडी करतात हे त्याला पटत नसावं.त्या व्रती बैलाचे खानदेशात पाचोरा जिल्ह्यातील नंदीखेडे या छोट्याशा गावात स्मारक आहे असं म्हणतात.यावरून प्राणीमात्रांना पण मन असतं त्यांच्या भावना जाणून त्यांना सन्मानाने वागवलं जावं हा संदेश मिळतो.
       श्रावण मासात येणाऱ्या सणावारांच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाची रक्षा करण्याचा वृक्षांची पूजा करणं, निसर्गाला जपण्याचा, प्राणीमात्रांवर दया करण्याचा , सर्वांवर प्रेम करण्याचा संदेश देतो.परंतु दु:ख या गोष्टीचं वाटतं की आता आपण हे सर्व विसरलो आहे.घराघरात वैमनस्य आहे.भावाभावात हेवेदावे आहे.एकमेकांना दूर लोटत आहोत.हवं तर पूजापाठ करायला नसेल जमत तर कमीतकमी सृष्टीची काळजी घ्या एकमेकांवर प्रेम करा !
      

लेखक

  • ऐश्वर्या डगांवकर

    पूर्वाश्रमी-वर्षाराणी दाणे
    शिक्षण-- शालेय आणि महाविद्यालयीन -धुळे
    बी. ए. ऑनर्स इंग्रजी विषयात
    पूना युनिव्हर्सिटी महाराष्ट्र.
    व्यवसाय --लेखिका /कवयित्री --मराठी हिंदी गृहिणी,कथाकथन,रसग्रहण
    भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५

Post navigation

Previous: छुपा वंशवाद
Next: तंत्रावलंबी
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.