Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – १५

राधा जोशी जुलै 15, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                             १५ जुलै २०२६

नागपूरकर भोसले

    

महाराज रघुजीराजे -२ हे सेना धुरधर मुधोजीराजे व चिमाबाईं यांचे असुन पुत्र महाराज जानोजीराजे यांना अपत्य नसल्याने त्यांनी यास उत्तराधिकारी नेमले होते.महाराज जानोजीराजांचे यांचेनंतर बापुजीराव हे रघुजीराजे दुसरे म्हणून २४ जून  इ. स. १७७५ रोजी मसनंदीवर बसले.पण तेव्हा रघुजीराजे अल्पवयिन असल्याने राज्यपाल म्हणून  सेना धुरंधर मुधोजीराजांनी नागपूर राज्याची सुत्रे हाती घेतली.पूढे वडगावचे विजयानंतर महाराज रघुजीराजांनी नागपूर राज्याचा कारभार हाती घेतला.

महाराज रघुजीराजे- २ यांनी राज्यविस्तार केला.नागपूरकर भोसल्यांचे राज्य पश्चिमेस सहयाद्रीच्या बालाघाट रागांपासून  पुर्वेस सुवर्णरेखा नदीपावेतो होते.उत्तरेस नर्मदेच्या पलीकडे म्हणजेच सध्याचे मध्य प्रदेश व उत्तरप्रदेश राज्य यांचे दरम्यानचे सिमेपावेतो होते! तसेच दक्षिणेकडचे बगांलच्या उपसागरापावेतो होते. 

नागपूरचे राज्य हे प्रांतात विभागले होते.प्रातं हे सरकारात व सरकार हे परगण्यात विभागले होते. सरकार हे प्रमूख नगर अथवा प्रमूख गडचा नावे ओळखले जात असत.प्रमूख गडाने ओळखल्या जणारे सरकारास सरकार महाल म्हटले जात असे.    

                               नागपूर राज्य

नागपूर राज्यात  विदर्भ, देवगढ, गढ-मडला,बागड,  मुलताई , चंद्रपूर,  छत्तिसगढ,  गढजत,कटक, गगांथडी, भाग्यनगर आणी श्रीगोंदे असे १२ प्रातं होते. तसेच २० प्रमूख गड होते. 

१विदर्भ प्रांत 

नागपूर राज्याचा विदर्भ प्रांत हा उत्तरेस  नर्मदा नदीपासून दक्षिणेस गोदावरी आणी  पश्चिमेस सहयाद्रीच्या बालाघाट रागांपासून वंरदा नदी पावेतो होता. विदर्भ प्रांतात         

खेडला सरकार महाल  

गाविलगड सरकार महाल  

बेतुलवाडी सरकार महाल  

नरनाळा सरकार महाल 

गाविलगड सरकार महाल  

पवनार  सरकार   

कळंब सरकार  

माहूरगड सरकार महाल

पार्थी  सरकार

वाशिम सरकार 

मेहकर सरकार   

माणिकगड सरकार  

रामगड सरकार व तेलगंणा सरकार असे १३ सरकार होते . 

भोगोलिक रचने अनुसार प्रत्येक सरकारात कमी अधिक संखेत परगणे होते. खेडला सरकारात  ३५ परगणे होते रामगड सरकारात ५ परगणे होते बेतुलवाडीत ९ माहूरगड सरकार महालात  २०  माणिकगड सरकारात ८ परगणे तर गाविलगड सरकार महालात सर्वाधिक ४६ परगणे होते.

विदर्भ प्रांताच्या तेलगंणा सरकारात नांदेड,लातुर,परभणी  आदी १९ परगणे होते.तसेच गविलगड, नरनाळा ,माणिकगड माहुरगड ,रामगड , खेलडा किल्ला ,बेतुलवाडीचा किल्ला, अचलपूरचा किल्ला, बाळापूरचा  किल्ला हे गड-किल्ले होते विदर्भ प्रांताचे ऐकूण उत्पन्न सुमारे ३० लक्ष होते.

२ गंगाथडी प्रातं  

पुर्वी गोदावरीच्या तटावरचे प्रदेशाला गंगाथडी प्रांत म्हणत असत. गंगाथडी प्रांतात  अदिलाबाद निर्मल आदी परगणे होते. या प्रांताचे उत्पन्न ३.५ लक्ष  होतें.

३ देवगढ प्रांत  

नागपूर राज्याचा देवगड प्रातं  हा पश्चिमेस वरदा नदीपासून पुर्वेस वामा किवां वेनगंगानदी पलीकडे सातपुडा पर्वतराजीचे बालाघाट रागेंपर्यन्त होता.देवगढ प्रांतात सध्याचे नागपूर, बालाघाट, भंडारा,सिवनी,देवगढ, छपरा, कांटगी, डोंगरताल, चैारी,घन्सोर आदी तालूके होते.  तसेच  देवगढ,प्रतापगड, सोनगढी,  अबांगड व लांजीगड हे प्रमूख गड होतें.देवगढ प्रांताच्या उत्तरेस नर्मदा नदीपलीकडे गढ-मंडला प्रांत होता देवगढ प्रांताचे वार्षिक उत्पन्न ३० लक्ष होते!

४ गढ-मंडला प्रांत 

महाराज रघुजीराजे-२ यांचे समयी  गढ-मंडला प्रांत नागपूर राज्यात सामिल झाला. नागपूर राज्याचा  गढ-मंडलाप्रांतात सध्याचे शहानगर, कटनी, सिहोरा, धामोणी, शहागढ, हटा,पन्ना,मधियाडोह,गढकोट,शहापूर, गढा,उमरिया,मंडला,शहाडोल आदी २३ तालूके होते.तसेच धोमीणी, हटा,मडला,तेजपूर हे प्रमूख गडकिल्ले होते.या प्रांताचे उत्पन्न १४ लक्ष होते. 

५ बागड प्रांत

देवगढ प्रांत व गढ-मंडला प्रांताचे  यांचे दरम्यानच्या सिमावर्ती  प्रदेशाला बागड प्रांत म्हटले जात असे. उत्तरेस नर्मदा पुर्वेस व दक्षिणेस सातपुडा पर्वत रागां आणी पश्चिमेस गंजल नदी यांचे दरम्यान बागड प्रांतात होता.नरसिहंपूर राजधानी होती बागड प्रांतात नरसिंहपूरचा चैारागड व नर्मदापूर अथवा होशंगबादेचा राजगड हे किल्ले होते.बागड प्रांताचे उत्पन्न ७ लक्ष होते.

६मुलताई प्रांत 

नर्मदा नदी व ताप्ती नदी दरम्यान पुर्वेस गंजल नदीपासून पश्चिमेस ब्रम्हपूर किवां बुराहणपूर  खिंडीपावेतो  मुलताई प्रांत होता मुलताई प्रांताचे उत्पन्न २लक्ष होते .या प्रांतात आशिरगड किल्ला होता. 

७ चंद्रपूर प्रांत 

देवगढ प्रांताचे दक्षिणेस  चंद्रपूर  प्रांत होता.उत्तरेस नदी अंब  पश्चिमेस वरदा नदी तसेच दक्षिणेस गोदावरी व पुर्वेस सातपुडयाचे बालाघाट रागां यांचे दरम्यान चंद्रपूर प्रांत होता.चंद्रपूर प्रांतात  शिरपूर ब्रम्हपूरी शिवांपूर-चिमूर  बल्लारपूर चंद्रपूर हे सरकार होते. तसेच चंद्रपूरचा किल्ला होता चंद्रपूर प्रांताचे उत्पन्न५ लक्ष होते. 

८ छत्तिसगढ प्रांत  

पुर्वी छत्तिसगढ प्रांताचे उत्तर व दक्षिण असे दोन विभाग होते. प्रत्येक विभागात १८ गढ म्हणजेच  सरकार  होते. उत्तर विभागाचे १८ व दक्षिण विभागाचे १८ असे मिळून ३६ सरकार होत असल्याने  या प्रातांस छत्तिसगढ म्हणत असत. .पण या छत्तिसगढ  प्रातांची भोगोलिक रचना  आताचे छत्तिसगढ राज्यापेक्षा भिन्न होती.

दक्षिण कोसल  

तेव्हा सध्याचे छत्तियगढ राज्यास  दक्षिण कोसल म्हणत असत. आणी दक्षिण कोसलच्या  पुर्वेस  छत्तिसगढ होते दक्षिण कोसलचे  शिवनाथ नदीमूळे दोन भाग झाले होते.पश्चिमेस व पुर्वेस हंसदेव नदी यांचे दरम्यान दक्षिण कोसलचा उत्तर भाग असून  रतनपूर हि राजधानी होती दक्षिण कोसलचा दक्षिण भाग हा पश्चिमेस पासून पुर्वेस तेल नदीपावेतो असून रायपूर  राजधानी होती.पुर्वी दक्षिण कोसल येथे कालचुरी राजवंशाचे राज्य होते. 

छत्तिसगढचा उत्तर विभाग 

छत्तिसगढ प्रांताचा  उत्तर विभाग हा  हसंदेव नदी पुर्वेस छोटा नागपूर पठारावर असून अंबिकापूर हि राजधानी होती.महाराज रघुजीराजे यानी इ स १७४२मध्ये दक्षिण कोसल वछत्तिसगढ चा उत्तर विभाग जोडून तेथे नागपूर राज्याचा छत्तिसगढ प्रांत स्थापला .रतनपूर येथे राजधानी केली.नागपूर राज्याचा छत्तिसगढ प्रांतात डोगंरगढ,खैरागढ,सारंगगढ,धर्मराजगढ,लक्ष्मणगढ,बुनाईगढ,रायगढ,पामगढ,कोराईगढ,सुंदरगढतसेच अरण्यमय बस्तर प्रदेशात रामगढ, तिरथगड,अंतागढ,नवागढ, भेरामगढ हे प्रमूख १५ सरकार होते.छत्तिसगढ प्रांताचे वार्षिक उत्पन्न ६ लक्ष होते.

९गढजत प्रांत 

छत्तिसगढचा दक्षिण विभाग

पूर्वी छत्तिसगढ प्रातांच्या  दक्षिणविभागाचे १८ गढ हे बस्तर प्रातांचे पुर्वेस असून पश्चिम ओडिसात होते. भवानीपटणा हि राजधानी होती.इ स १७४२ मध्ये महाराज रघुजीराजांनी  छत्तिसगढ प्रातांच्या  दक्षिण विभागाचे १८ गढ व ओडिसा प्रातांच्या  पश्चिमचे ६ सरकार  जोडून  गढजत प्रांत स्थापला.हा गढजत प्रांत पश्चिमेस तेल नदी व पुर्वे बेतरणी नदी यांचे दरम्यान  गढजत पर्वत रागांत होता गढजतप्रांतात बारगढ, बलरामगढ, पाटणगढ,  आठगढ, बावुधगढ,  ठाकूरगढ, केन्जागढ, कुजंबनगढ आदी२४  सरकार होतें.गढजत प्रांताचे दक्षिणेकडे  कटक प्रांत होता.

१० कटक प्रांत 

पुर्वी कटक प्रांतास  उत्कल प्रदेश म्हटले जात असे.बंगाल उपसागरावर पश्चिमेस महानदी व पुर्वे सुवर्णरेखानदी यांचे  दरम्यान कटक  प्रांत होता. कटक प्रांतात बाराबटी किल्ला होता व बाळेश्वर किवां बालासोर महत्वाचे बंदर होते. कटक प्रांतात जलेश्वर २८ परगणे,भाद्रक ७ परगणे,कटक २१ परगणे ,कलिंग दंडपट २७ परगणे व राजमेहन्द्री १६ परगणे हे ५ सरकार होते गढजतप्रांत व कटक प्रातं याचे मिळून  वार्षिक उत्पन्न १७ लक्ष होते.                      

११भाग्यनगर प्रांत 

भाग्यनगर प्रांत हा गोदावरी व कृष्णावेली नदी दरम्यान असून त्यात  २४ सरकार  व या सरकारांचे  २१५ परगणे सामिल होतें

१राजमहेंद्री सरकार.आठ परगणे 

२कोंडापल्ली सरकार . सहा परगणे 

३श्रीकाकुलम् सरकार. आठ परगणे

४ ईलुरू सरकार अथवा  मच्छलिपट्टम् सरकार.तिन परगणे व 

५गुंटूर सरकार .दोन परगणे 

वरील पाच सरकार हे पुर्वसागरकिनारयावर असून त्यांना उत्तर सरकार म्हणत असत . उत्तरसरकारांच्या दक्षिणेत पुर्व सागरकिनारयावर सरकार  खलिल  होते.

६ हिरेखान अथवा   कोलुरू सरकार

७ मोटपल्ली सरकार

सध्या गुंटूर सरकार तसेच कोलुरू सरकार आणी मोटपल्ली सरकार हे   प्रांत आंद्र प्रदेश राज्यात आहेत

८खम्मम 

९देंवरकोंडा सरकार 

१० नालगोंडा सरकार

११ पानगल सरकार

१२ कोईलकोंडा सरकार

१३परकल  सरकार  

१४ येलंगदु सरकार   

१५ मेडक सरकार

१६ घनपूर सरकार

१७ उदामारी सरकार

१८ दौलताबाद-कोठापेट 

१९ नरसापूर सरकार

२० गोलकोंडा सरकार

२१ तांदुर सरकार

२२ नारायणखेड सरकार

२३ सतोली सरकार

२४ सुजायेतपूर सरकार

सध्या सतोली हे करर्नाटक राज्यात तसेच सुजायेतपूर हे महाराष्ट्रात आहे  

१२ श्रीगोंदे प्रांत 

छत्रपती रामराजे यांचेकडून महाराज रघुजीराजांना  इ.स.१७५० मध्ये स्वराज्याचे  नगर  प्रांताचे साडेपाच सरकारांचे वतन प्राप्त झाले होते. श्रीगोंदे  नगर  राक्षश  माडवगण तेडगाव  व  अर्धे राशिन असे ते साडेपाच सरकार होते ! 

नागपूरकर भोसले यांचे सरंक्षणात असलेले  प्रांत 

उत्तरेतील काही प्रांतानी नागपूरकर भोसंले यांचे वर्चस्व स्विकारून संरक्षण प्राप्त केले होते.

१बंगाल व बिहार 

इ.स.१७४४मध्ये महाराज रघुजीराजांनी सुभेदार अलिवर्दीखान याचा पराभव करून  मोगंलाचे बंगाल व  बिहार सुभावर वर्चस्व केले.तेव्हा बिहार-बंगालचा  सुभेदार अलिवर्दीखानाने  महाराज रघुजीराजे यांचेशी तह केला. या तहाने नागपूरकर भोसले यांना  बंगाल व बिहार सुभाची १२ लक्ष चवथाई मिळत असे.

२ प्रयाग 

गढ-मडला प्रांताच्या पुर्वेस भागेलखंडात  रिवा राज्य व गढ-मडला प्रांताच्या  उत्तरेस अंर्तेवेदित  प्रयाग राज्य होते.रिवाचे राजे अजितसिहं भागेला यांचे नागपूकर भोसले यांचेशी  स्नेहसंबद्ध होते.राजे जुगराजसिंह यांचे प्रयाग राज्य  गंगा व यमुना यांचे दरम्यान अंर्तेवेदित होते.पण मोगलांनी प्रयाग राज्याचा प्रयागराज पासून  कानपूरपर्यन्त प्रदेश बळकावून तेथे इल्हाबाद सुभा केला होता.महाराज रघुजीराजांनी इ.स.१७३८ मध्ये आक्रमण करून इल्हाबाद सुभाचे सुभेदार सुजाह खानाचा पराभव केला .इल्हाबाद लढाईत सुजाह खान मारले गेला. महाराज रघुजीराजांशी राजे जुगराजसिंह यांनी संधी केली.नंतर  इल्हाबाद सुभाचा प्रदेश राजे जुगराजसिहं यांना सोपवून महाराज रघुजीराजे नागपूरास  परतले.या संधीने  त्याना  प्रयाग राज्याची  चवथाई प्राप्त होत असे. 

 

 २ नागपूर राज्याचे गड-किल्ले 

 गढ मडंला प्रांत

१धामोणीचा किल्ला  २०० सरंक्षक दळ   

२मंडला येथे महिष्मतीगड  २००  सरंक्षक दळ  

३ हर्राईचा तेजगड ५० सरंक्षक दळ   

 मुलताई प्रांत

४आशिरगड  २०० सरंक्षक दळ    

बागड प्रांत

५ नर्मदापूरचा राजगड- ५०० सरंक्षक दळ 

६ नरसिंहपूरचा चैारागड २५० सरंक्षक दळ 

नागपूर प्रांत   

७ सावलीगड- ४०० सरंक्षक दळ  

८ छिन्दवाडयाचा देवगड -४० सरंक्षक दळ 

९ सिवनीचा किल्ला -५० सरंक्षक दळ  

१०बालाघाटाचा प्रतापगड

११ वैनगंगेवरचा वैरागड ५०  सरंक्षक दळ  

१२पौनारचा पवनगड ३० सरंक्षक दळ  

१३ भंडारयाचा   अंबागड ३० सरंक्षक दळ  

१४ लांजीचा लांजीगड ३० सरंक्षक दळ  

विदर्भ प्रांत

१५ बैतुलजवळ खेडला किल्ला  

१६ आकोट जवळ महाकालीगड अथवा नरनाळा ५०० सरंक्षक दळ 

१७ गविलगड५०० सरंक्षक दळ

१८ माहुरगड  

१९ माणिकगड कटक प्रांत

२० बाराभटीचा किल्ला  बालासोर अथवा  बालेश्वर बदंर  ओधिशा 

वरील २० गड-किल्ले सुरक्षततेच्या दृष्टीने महत्त्वाचे गड-किल्ले होते. त्या व्यतिरिक्त गढजत , छत्तिसगढ व कटक प्रांतात अनेक गड-किल्ले होते.त्याच प्रमाणे विदर्भ प्रांतात उमरेडचा किल्ला,नगरधनचा किल्ला  बेतुलवाडीचा किल्ला, आमनेरचा किल्ला,अचलपूरचा किल्ला,बाळापूरचा किल्ला अस अनेक दुय्यम गड-किल्ले होते.

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: वंचित
Next: पारू काकू

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.