नागपूरचा इतिहास १७ जुलै २०२६
नागपूरकर भोसले
नागपूर राज्याचा उत्कर्ष
तेलंगखेडी तलाव
महाराज रघुजीराजे -२ यांनी बंदिस्त नागपूरनगराच्या पश्चिमेकडे तेलंगखेडी उपनगरात तलाव निमार्ण केला. नंतर महाराज रघुजीराजे -२ व बंधु सेना धुरंधर व्यंकोजीराजे यांनी विविध वनस्पती व झाडांच्या प्रजाती आणून तेलंगखेडी तलावाच्या बाजुला वनस्पती बाग निमार्ण केला. तेलंगखेडी तलावमूळे ८५ ऐकर भुभाग उपजावू क्षेत्राखाली आला होता पण तेलंग खेडी तलावाचे पाणी पिण्यास योग्य नसल्याने महाराज रघुजीराजे -२ यांनी आज्ञ फक्त शेतीकरता वापरण्याची आज्ञा केली होती पूढे पाणी तपासणीचे रासायनिक चाचण्या उपल्बध झाल्यानतंर तेलंगखेडी तलावाचे पाण्यात अमोनिया व अल्बुमिनिओड अमोनियांचे आरोग्यास हानीकारक प्रमाणात असल्याने ते पिण्यास योग्य नाही असे सिद्ध झाले!
शुक्रवार तळे
राजा चांद सुल्तान यांनी त्यांच्या कारकिर्दीत बंदिस्त नागपूर नगराबाहेर तळे खोदले पूढे महाराज रघुजीराजे यांनी तळयाभोवती पायरयांचा दगडी घाट आणी तळयाच्या पाळीवर जागोजागी कोरिव दगडी मंडपी परीसर सुशोभित केला आणी शुक्र्रवार तळे असे नामकरण केले !
शुक्रवार तळयात एक नैसर्गिक बेट आहे . महाराज रघुजीराजे दुसरे यांनी या बेटावर गणपती मंदिर बांधून राणी बाग निर्माण केली. महाराणी बाकाबाईसाहेब व महाराज रघुजीराजे हे या तळयात नवकानयन कारीत असत!
अंबाझरी तलावा प्रमाणेच शुक्रवार तळयाचे पाणी भुमीगत दगडी पाईप लाइनने नागपूरनगरास पुरविले जात असे. शुक्रवार तळयाच्या पाण्याचा उपयोग पिण्याच्या करीत होत असे पण इंग्रजाच्या काळात अर्थे तळे बुजवून त्या भागात ऐम्प्रस मिल बांधण्यात आली आणी ऐम्प्रस मिलचे सांडपाणी तळया सोडण्यात आले. ३ बागा बंदिस्त
बंदिस्त बाग
बागेच्या बाजूला देखणे मंदिर आणी समोर विस्तिर्ण तळे हि वास्तुरचना नागपूरनगराची खासियत होती महाराज रघुजीराजे -२ यांनी नागपूरनगराच्या परिसरात अनेक रमणिय बागा निमार्ण केल्या. बागा बंदिस्त असून बागे भोवती दगडी परकोट व परकोटात उत्तर अथवा पुर्वेकडे महाव्दार असे. हि बाग राजपूती चारबाग पद्धतीची होती बाग पाण्याचे निमुळत्या नरहारांनी असून चार चैाकोनी भागात विभागली मध्यावर कारंजांचा सगंमवरी हौद होता प्रत्येक नहरांच्या दुसरया टोकाला कोरीव सगंमवरी बारादारी अथवा निरिक्षण दालन होत तेलंगखेडी बागेत रंगमंच विश्रामगृह होते! प्रत्येक बागेत खास नागपूर शैलीतले कोरिव देखणे मंदिर आणी मंदिरापूढे दगडी घाट पाय-यांचा विस्तिर्ण तलाव राहत असे. बागेस तलावातून भुमिगत खापरी पाईप लाईन ने पाणी पूरवठा केला जात असे किंवा बागेच्या आवरात व्यापी म्हणजे पायरयांच्या विहीर अथवा कूप म्हणजेच विहीर बांधून . बागेस पाणी तुळशीबाग बेलबाग केळीबाग रामबाग सक्करदरा इंदुली बाग व तेलगंखेडी बाग या उल्लेखनिय बागा होत्या. सेना धुरंधर व्यंकोजीराजे यांनी नागपूरनगरात तेलंगखेडी येथे व सक्करदार येथे राजपूती पद्धतीची चारबाग निर्माण केली .