Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

निरांजन

डॉ. विनायक भावसार जुलै 17, 2026 1 minute read
0
gumohor-water

श्रीधरची दुसरी कविता:
*'निरांजन'*
कधी अचानक उतरते एक तिरीप 
अस्वस्थ अंधार चिरत
सरळ खोल आत,
आणि मग घेता येतो मोकळा श्वास मला …
मुक्तपणे तपासून बघतांना
प्रतिबिंब माझ्याच जाणीवा नेणीवांच !
कुठल्याही स्थापित संकेतांना
बांधील नसलेला मनाचा धूसर आरसा
दाखवून देतो स्वतंत्र, स्वायत्त
अस्तित्व भान माझं,
माझ्याच विचारानुभावातून प्रगटलेल …
ज्या गहन तिमिरातून
स्वत:लाच ओरबाडत,
झिडकारत, लाथाडत
शोध घेतलाय स्वत:चा ,
तो तिमिर जसा माझा
तसाच माझ्या जखमातूनच
वितळलेला, उधळलेला, उजळलेला
हा लख्ख प्रकाश देखील माझाच,
दाखवू नका त्यावर कुणी आपला
पिढीजात हक्क,
असू द्याना माझाच ताबा त्यावर !
कुठल्याही देवळातल्या सत्याला
आव्हान द्यायचं मी कधी
आणल नाही मनात,
माझ्या देव्हाऱ्यात तेवलेल्या
ह्या निरांजनाचा प्रकाश एव्हढा
कां छळतोय कुणाला ?
– श्रीधर जहागिरदार
 *****
श्रीधर, 
मला जे उमगलं आहे ते रेखाटतो आहे. वाच तू हे , आणि मला सांग कुठं मी कमी पडतो आहे, तुझ्या कवितेला आकलनायला.
*निरांजन*
अंधार अस्वस्थ करणारा, अज्ञानाचा, गोंधळाचा. लागतो प्रकाश, एखादी तिरीप तपासून बघायला.
तपासायचं, कुठलीही बंधन न ठेवता, जर तर नको! तपासताना बघायचं स्वत:ला प्रतिबिंबात.
आपल्याला स्वतःला बघायला प्रतिबिंबच तर असतात, संथ पाण्यावर उमटलेली, स्वच्छ काचेवरुन परावर्तीत झालेली, कधी कुणाच्या डोळ्यात दिसलेली. हो प्रतिबिंबच मदत करणार शोधायला, नाहीतर मी पाहणार कसा मला स्वत:ला!
प्रतिबिंब ते ही जाणीव, नेणीवाचं. जाणीव, मी आत बाहेरुन कसा? अनुभवांच विश्लेषण करीत विचारांच्या शिडीनं मनाच्या खोल डोहात उतरत शोधायची ती जाणीव नेणीवची प्रतिबिंबं.
आपल्याच व्यक्तीमत्वाची अपरिचित, अमूर्त, अतार्किक, अशब्द अशा नेणीवाचं शोधणं ते ही अबोध मनातलं, हे तुझ्यातला तो कवीच जाणे…
मनाचा आरसा धूसर असला तरी कुठलंही दडपण न ठेवता स्वत:च स्वरूप दाखवून देणारा. त्यात दिसणारं रूप स्वत:चं, आपलंच, स्वत:च शोधलेलं, अनुभवातून मुरलेलं, उरलेलं आणि विचारांनी पछाडलेलं. तो 'मीपणा'चा अनुभव, आत्म-भान!…आणि मग जाणवणारा मोकळा श्वास.
कठीण असतं हे मिळवणं. अंध:काराशी झगडणं सोपं नसतं. स्वत:ला झिडकारणं अशक्य असतं. ओरबाडणं, लाथाडणं सारंच कठीण, स्वत:च्या चिंध्या-चिंध्या करणं हे!
जखमांतून भळभळणारं असं बरंच निघतं. तिथूनच लाव्हा वितळावा, उधळून बाहेर यावा तसा निघतो, मला जाणवणारा मी, लख्ख प्रकाशासारखा… तोच मी, माझाच. कवीचं हे स्वत:ला सापडणं, आपल्या मनातही जीरतं.
प्रस्थापित का करतात जाच, येणाऱ्या स्वतंत्र विचारांचा? असतं की प्रत्येकाचं स्वातंत्र्य विचार करायचं. उभारले असतात आपले विचार, शोधली असतात तत्व आपली, स्वत:शी वाद घालून.
काळोख ही ओळखला असतो प्रयत्न करूनआणि उजेड ही शोधून काढला असतो…
निरांजन आपलं, आपल्यासाठी, आपलेच, प्रयत्नानं गवसलेलं मौल्यवान असं काही, अखंडपणे तेवत ठेवणारं. का कुणाला देणं घेणं त्याचं?
मागच्या अनुभवांचे पाश, सारे संभ्रम आणि इतरांच्या अपेक्षा ह्या सगळ्यातून सुटका होण्याचं निश्चितच आपण ठरवू शकतो.
स्वत:चं आणि भोवती असणाऱ्यांनी घातलेली बंधनं झुगारुन, सगळं काही बदलण्यासाठी शक्ती देणारा, एक वेगळा मार्ग तुझ्या कवितेत जाणवतो…
गुरुकृपेची आस सगळ्यांचं असते, मनंही गुरुचं कार्य करु शकते, असं जाणवून देणारी ही तुझी कविता.
१७ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६

लेखक

  • डॉ. विनायक भावसार

    सूरतच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून निवृत्त प्राध्यापक, फाॅरमॅकोलाॅजी विषयाचा; वयाच्या ७१ वर्षापर्यंत वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत.

    सूरत, इंदौर आणि मंडी ( हिमाचल प्रदेश) इथं आलटून पालटून वास्तव्य.

    वैज्ञानिक विषय आणि मराठी साहित्यात आवड आहे, थोडं फार लिखाणही करीत असतो. काही रचना पुरस्कृत. मागच्या वर्षी 'संस्कृतीचे अवशेष' हा अनुवादित कवितासंग्रह (अष्टगंध प्रकाशन ठाणे) प्रकाशित.

    संपर्क 8889500322
    bhavsarvinayak4@gmail.com

Post navigation

Previous: पदर
Next: नागपूरचा इतिहास – १७
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.