*स्वरस्वामिनी आशा!!*
.. ✍️ हेमंत नाईक
काल संगीत शिखरावर असलेला एक तेजस्वी तारा निखळला…
सर्वांच्या आवडत्या आशाजींचे दुःखद निधनाची वार्ता रसिकाना दुःखात लोटून गेली.
आशाजींनी गायिलेल्या अगदी भक्ती गीतापासून लावणी,गझल,उडत्या चालीची रोमँटिक गीत अजूनही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे.
८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशाजींनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. गझल, भजने, शास्त्रीय संगीत ते पॉप साँग्स असे विविध संगीत प्रकार त्यांना अवगत होते.. यात एकापेक्षा एक अप्रतिम गीत त्यांनी गायिले आहेत.
लहानपणी पितृछत्र हरपल्यावर आशाजींनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले.. त्याच्या कौटुंबिक आयुष्यातही बरीच वादळ आली असली तरी त्या नेहमी हसतमुख असायच्यात. आशाजी आणि त्यांचा मधुर आवाजाचे चाहते जगभर आहेत.
दुबईला वयाच्या ९०व्या वर्षी तीन तासांचा सुपर डुपर हिट स्टेज परफॉर्मन्स आशाजींनी दिला होता. हा पण एक विक्रम असेल.
दादासाहेब फाळके पुरस्कार,पद्मविभुषण,
सात वेळा फिल्मफेअर अवार्डस , दोन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त केले असले तरी,
_”मी गायिकेपेक्षा एक चांगली माणूस म्हणून लोकांना आवडते…हाही एका मोठा पुरस्कार आहे.”_
हे उदगार आशाजीचे नव्वदाव्या वाढदिवशी दुबईला आयोजित केलेल्या खास शो मध्ये काढले होते.
आशाजीचे आवडते गाणे कॊणते? अशी विचारणा या प्रसंगी झाली तेव्हा त्यांनी आपले सहगायक स्व. किशोरकुमार यांनी गायिलेले आनंद बक्षी यांनी लिहिलेले ,
“जिंदगीके सफरमे
गुजर जाते हैं
वो मकाम
वो फिर नाही आते
वो फिर नाही आते.. “
हे गीत गायिले होते.
जीवनाबद्दल खूप काही हे गीत शिकवून जाते.
त्यांची सर्व गीत मधुर आणि उत्तम!! .. पण आशाताईची मुलाखत ऐकणे म्हणजे सर्वांनाच एक पर्वणी असायची .. गजरा माळलेला हसतमुख चेहेरा आणि जे मनातं आहे ते त्या स्पष्ट दिलखुलास बोलायच्यात त्याचा गप्पीष्ठ स्वभाव आणि साधेपणा मनमोकळेपणा मुलखतीत स्पष्ट दिसायचा.आज त्या काळाच्या पडद्याआड परत न येण्यासाठी गेल्यात. , पण त्यांची मधुर गीत आणि गोड बहुआयामी आवाज आमच्या आणि येणाऱ्या सर्व पिढीच्या मनावर कायम अधिराज्य करत राहील हे मात्र नक्की.
स्वर स्वामिनी आशा!!
जीवनदीप विझता
आशा निघून गेली
सुरांचा दीप अक्षय
मनात तेवून गेली!!
प्रसन्न नित्य चेहरा
हास्य दिलखुलास ते
जे मनात ते ओठी
सहज सुंदर ते जीणे!!
वय वाढले जरी ते
मन तरुण नित्य होते
सरस्वतीची सुपुत्री
भाग्य विलक्षण होते!!
मेहफिल अनेक झाल्या
गोड सुंदर उडता आवाज
सुर तुझे ऐकण्या स्वर्गी
सजविला इंद्राने दरबार!!
दुःख कोसळले धरेवर
सुरही आज कोमजलेले
संवादिनीही मूक रडली
दुःखात सारे सर्व चाहते!!
आदरणीय स्व.आशाताईना,
भावपूर्ण श्रद्धांजली..
🙏🙏🙏
✍️हेमंत नाईक
१३ एप्रिल २०२६
सोमवार
सुरपाखरू #अक्षरयात्री#२०२६