Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 1 minute read
0
IMG-20260412-WA0052.jpg

*स्वरस्वामिनी आशा!!*

.. ✍️ हेमंत नाईक 
काल संगीत शिखरावर असलेला एक तेजस्वी तारा  निखळला…
सर्वांच्या आवडत्या आशाजींचे दुःखद निधनाची वार्ता रसिकाना दुःखात लोटून गेली.
आशाजींनी गायिलेल्या अगदी भक्ती गीतापासून लावणी,गझल,उडत्या चालीची रोमँटिक गीत अजूनही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे.
८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशाजींनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. गझल, भजने, शास्त्रीय संगीत ते पॉप साँग्स असे विविध संगीत प्रकार त्यांना अवगत होते.. यात एकापेक्षा एक अप्रतिम गीत त्यांनी गायिले आहेत.
लहानपणी पितृछत्र हरपल्यावर आशाजींनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले.. त्याच्या कौटुंबिक आयुष्यातही बरीच वादळ आली असली तरी त्या नेहमी हसतमुख असायच्यात. आशाजी आणि त्यांचा मधुर आवाजाचे चाहते जगभर आहेत.
दुबईला वयाच्या ९०व्या वर्षी तीन तासांचा सुपर डुपर हिट स्टेज परफॉर्मन्स आशाजींनी दिला  होता. हा पण एक विक्रम असेल.
दादासाहेब फाळके पुरस्कार,पद्मविभुषण, 
सात वेळा फिल्मफेअर  अवार्डस , दोन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त केले असले तरी,
_”मी गायिकेपेक्षा एक चांगली माणूस म्हणून लोकांना आवडते…हाही एका मोठा पुरस्कार आहे.”_
हे उदगार आशाजीचे नव्वदाव्या  वाढदिवशी दुबईला आयोजित  केलेल्या खास शो मध्ये काढले होते.
आशाजीचे आवडते  गाणे कॊणते? अशी विचारणा या प्रसंगी झाली तेव्हा त्यांनी आपले सहगायक स्व. किशोरकुमार यांनी गायिलेले आनंद बक्षी यांनी लिहिलेले ,
“जिंदगीके सफरमे 
गुजर जाते हैं 
वो मकाम 
वो फिर नाही आते 
वो फिर नाही आते.. “
हे गीत गायिले होते.
जीवनाबद्दल खूप काही हे गीत  शिकवून जाते.
त्यांची सर्व गीत मधुर आणि उत्तम!! .. पण आशाताईची मुलाखत ऐकणे म्हणजे सर्वांनाच एक पर्वणी असायची .. गजरा माळलेला हसतमुख चेहेरा आणि जे मनातं आहे ते त्या स्पष्ट दिलखुलास बोलायच्यात त्याचा गप्पीष्ठ स्वभाव आणि साधेपणा मनमोकळेपणा मुलखतीत स्पष्ट दिसायचा.आज त्या काळाच्या पडद्याआड परत न येण्यासाठी गेल्यात. , पण त्यांची मधुर गीत आणि गोड बहुआयामी आवाज आमच्या आणि येणाऱ्या सर्व पिढीच्या मनावर कायम अधिराज्य करत राहील हे मात्र नक्की.
स्वर स्वामिनी आशा!!
जीवनदीप विझता 
आशा निघून गेली 
सुरांचा दीप अक्षय 
मनात तेवून गेली!!
 
प्रसन्न नित्य चेहरा 
हास्य दिलखुलास ते
जे मनात ते ओठी 
सहज सुंदर ते जीणे!!
 
वय वाढले जरी ते 
मन तरुण नित्य होते
सरस्वतीची  सुपुत्री 
भाग्य विलक्षण होते!! 
मेहफिल अनेक  झाल्या 
गोड सुंदर उडता आवाज 
सुर तुझे ऐकण्या स्वर्गी 
सजविला इंद्राने दरबार!!
दुःख कोसळले धरेवर 
सुरही आज कोमजलेले
संवादिनीही मूक रडली 
दुःखात सारे सर्व चाहते!! 
आदरणीय स्व.आशाताईना,
भावपूर्ण श्रद्धांजली..
🙏🙏🙏
✍️हेमंत नाईक 
१३ एप्रिल २०२६
सोमवार
सुरपाखरू #अक्षरयात्री#२०२६

Yahoo Mail: Search, organise, conquerqqq²४qq

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
Next: सगळ्याच गोष्टींची विपुलता
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
Screenshot_20260406_113022_WhatsApp.jpg
  • ललित

“विसरणं एक दैवी वरदान!!!”

हेमंत नाईक एप्रिल 5, 2026 0

ताजे लेख

  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”
  • सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
Screenshot_20260406_113022_WhatsApp.jpg
  • ललित

“विसरणं एक दैवी वरदान!!!”

हेमंत नाईक एप्रिल 5, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.