Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

जो जे वांछील ते तो लिहो….

हेमंत नाईक जून 15, 2026 1 minute read
0
1001066889.jpg
*जो जे वांछील तो ते लिहो..* मराठीत लिहून व्यक्त होणासाठी मार्गदर्शक ठरणारा कालचा नागपूर येथे आयोजिलेला कार्यक्रम उत्तम झाल्याच्या प्रतिक्रिया वाचल्यात. सर्व वक्ते, आयोजक तुषार सर आणि सर्वांचे अभिनंदन..
🙏🙏
देखणा नेटका अप्रतिम अशा अनेक विशेषणांनी या उपक्रमाचे कौतुक जाणकारांनी  केले आहे .
काहींचे विचार कदाचित काहीसे पटले नसतील.जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच साधकबाधक विचारांती निर्णयाचे नवनीत मिळते, पण एवढं सर्व करून आज घेतलेला निर्णय भविष्यात तो निर्णय म्हणजे एक मोठी चूक ठरु शकते.अगदी शास्त्रात देखील कित्येक काळ अचूक वाटाणारी मान्यता प्राप्त गोष्ट चूक ठरू शकते.पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्याला शास्त्रज्ञाला लोकांनी वेड्यात काढले होते.
व्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे.बोलणे लिहिणे कृती करणे ही व्यक्त होण्यासाठी उपलब्ध असलेली साधन.. त्यात काळाच्या पडद्यावर अनेक शतक टिकून राहणार साधन म्हणजे लिखाण. आपल्याला जसं आपण जेवणात जे आवडत तेच खातो न आवडणार  आपोआप बाजूला राहत. तस काहीस सर्व प्रकारच्या व्यक्ततेबद्दल आहे..तुम्हांला जे रुचत तेच तुम्ही व्यक्त करतात. त्यात लिहिणही आल. व्यक्ततेला बंधनात ठेवू नये, कोणास काय वाटेल म्हणून तुमच्या मनातले विचार वा लिखाण कोंडले जाऊ नये किंवा लोकांना ते पटत नाही आवडत नाही म्हणून ते लिखाण टाळण म्हणजे स्वतःशीच प्रतारणा केल्यासारखे आहे.
प्रेम कुणावर करावे हे सांगताना कुसुमाग्रजांनी अनेक दाखले दिले आहेत  तसेच अगदी एका शब्दापासून अनेक विषयावर लिहीण सहज शक्य आहे.
*जो जे वांछील ते तो लिहो..* यात लिहिण्याची क्रिया महत्वाची आहे. एखाद्या चित्रपटची कथा एकदम सुचत नाही जस जसं लेखक लिखाण करतो त्यात हळूहळू अनेक पात्र जन्म घेता आणि प्रसंगाची शृंखला विणली गेली अजरामर कथानक तयार होते. तसेच लिहिण्याबाबत आहे भावनांचे नवरस आपल्या भाषेत आपण लिहिण्यात उतरवू शकतो.
” वांछील ते तो लाहो ” 
प्रार्थना ही पसायदानची  
*”वांछील ते तो लिहो”* 
साद सुरपाखर घालती !
लिहिल जरी खूप काही 
रद्दी वाटते ती कुणाला 
उब त्या रद्दीचीही लेखकास 
जशी बाळाची आईला!
“सौ बका.. एक लिखा “
व्यवहार म्हणता त्याला 
इतिहास लिहिला जाता 
दाखला मिळे नवपिढीला! 
भाषा शुद्ध की अशुद्ध 
जरा ठेवावे ते बाजूला 
खान्देशीबोलीत बहिणाबाई 
सोडवे मनाच्या कोड्याला!
अनेक शब्द परकीय भाषेचे 
सामावले मराठीच्या पोटात 
सौंदर्य तिचे अजून बहरले 
बदल काळाचा खरा नियम! 
आनंदासाठी लिहणं हवे 
नको कौतुक फळाची अपेक्षा
गीतेतील कर्मयोग आचारा 
लिहिण्याचे कर्म ते नित्य करा!
सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व सुरपाखरांचे अभिनंदन.
🌹🌹🌹🌹
.. हेमंत नाईक

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: केल्याने पर्यटन..
Next: आपल्या जिभेवर सरस्वती माता
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.