Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

आपल्या जिभेवर सरस्वती माता

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 1, 2026 1 minute read
0
gumohor-water
 #सुरपाखरू#३०दिवसात३० #जुलै२०२६                     

                         ||श्री गणेशाय नमः||

                                || श्रीराम||
खालील श्लोक वाचल्यासारखे किंवा ऐकल्यासारखी वाटतेय का? 
                     ||जिव्हां विद्यानिधि: पातु||
हो! हो !! बरोबर ही रामरक्षाचीच एक ओळ आहे. पूर्ण रामरक्षा मध्ये तुम्ही बघितला असाल तर प्रत्येक अवयवाला एक एक रामायणातल्या पात्राला काळजी घेण्यास सोपविला आहे पण जिव्हां/जीभ ही माते सरस्वतीच्या आधीनच ठेवलेली आहे. कारणही तसेच आहे हे एका उदाहरणांनी समजूया.
आपल्या पौराणिक कथेमधले राक्षस हे खूप समर्पित असतात, त्यांना जे हवे असते त्यासाठी ते काहीही करतात. रात्र दिवस अहोरात्र उपाशी राहतात. किंवा कुठलेही प्रकारची परीक्षा देण्यासाठी तयार असतात, गरज पडल्यास कुठल्याही गोष्टीचा त्यागही करतात. रावणाचा लहान भाऊ कुंभकर्ण अशाच एका ध्येयानी साधनेला लागला होता आणि ध्येय होते इंद्रासन आणि उपासक दैवत होते श्री ब्रह्माजी साहजिकच इंद्रासन म्हटले तर इंद्र आणि सर्व देवता घाबरून श्री ब्रह्माजींना शरण आले श्री ब्रह्मजनी म्हटले मी याबाबतीत तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. मग सर्वजण माता सरस्वतींच्या शरणाला गेले, आणि सर्व घटनाक्रम सांगितला. माता सरस्वतींना मदतीची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन माता सरस्वतीने त्यांना मदत करण्याची. इच्छा दर्शविली याच दरम्यान, कुंभकर्णाची उपासना पूर्ण होऊन श्री ब्रह्माजी त्यांना प्रसन्न झाले. आणि म्हटले की मग तुला कुठला वर मागायचा आहे. कुंभकर्णचे तर पहिलेच ठरलेलं होते त्याप्रमाणे तो जेव्हा इंद्रासन म्हणत होता, त्याचवेळी माता सरस्वती त्याच्या जिभेवर अंकित झाली, आणि इंद्रासन ऐवजी निद्रासन असे उच्चारण झाले. श्री ब्रह्माजींनीही लगेच तथास्तु म्हटले. पण लगेच कुंभकर्णचेही लक्षात आले, आपण इंद्रासन ऐवजी निद्रासन असे म्हटले. पण आता वेळ निघून गेली होती. तो श्री ब्रह्माजीं समोर गयावया करायला लागला, श्री ब्रह्माजींना त्याची दया आली, आणि त्यांनी एक उश्याप दिला. “तू सहा महिने झोपणार आणि सहा महिने जागा राहणार”. म्हणून रामायणाच्या गोष्टीनुसार कुंभकर्ण सहा महिने झोपतो आणि सहा महिने जागा राहतो.
तात्पर्य हे कि कुठल्याही वेळी आपल्या जिभेवर सरस्वती माता येऊन वास करू शकते. किंवा करते. त्यामुळे तुमच्या विचारात, बोलण्यात नेहमी सकारात्मकता ठेवा. कोणाबद्दल वाईट बोलणे टाळा, तुम्ही कुठल्याही गोष्टीची सकारात्मकता बाळगणे अपेक्षित आहे. हे माता सरस्वती तुमच्या जिभेवर असल्यामुळे जे तुम्ही बोलताय विचार करताय त्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद आहे.
आता तुम्ही म्हणाल प्रत्येक गोष्ट तू कुठल्यातरी पुराणोक्त गोष्टीचा संदर्भ घेऊनच बोलत असतोस. पण आत्तासुद्धा ह्याच गोष्टी आपण वेगवेगळ्या नावांनी, तेच म्हणत असतो. आश्चर्य वाटतं ना मी जे म्हणतोय ते??
सकारात्मक विचार करणे, हे होईलच याचा दृढ आत्मविश्वास ठेवणे, तीच गोष्ट घडते आहे अशी कल्पना करणे. जी गोष्टी तुम्हाला पाहिजे असते, तीच गोष्ट तुमच्या सकारात्मक ऊर्जेंनी तुमच्याकडे आकर्षित होते. आपल्या वर्तुळात सकारात्मक विचारांचा ओघ ठेवणे. संपूर्ण सृष्टी कल्पित केलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी मदत करते.
वरील शब्द खरच कठीण आहेत. इंग्रजी भाषेत आपण समजू या. 
Manifestation, Positive Vibes, law of attraction, Divine Universal Power will Help a completion of task.
आत्ता पटले जे मला वर काय म्हणाले. उदाहरणार्थ आपल्या सुरपाखर आणि त्यांच्या संकल्प ३० विना खंड ३० लेख प्रसिद्ध करणे पूर्णास येणे. नाही का!!

लेखक

  • सुभाषचंद्र टेकडपांडे

Post navigation

Previous: जो जे वांछील ते तो लिहो….
Next: नग्न भिक्षा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.