Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०४

वैभव शिरखेडकर जुलै 5, 2026
0
1000657017.png
लक्ष्मणराव संजयच्या दुकानाच्या चाव्या घेऊन जातात आणि दुकानात पोहचल्यावर त्यांची जी काही पुस्तके असतात ते घेऊन घरी वापस येतात. 
संजयचे किराणा आणि शेतीसंबंधित लागणाऱ्या साहित्याचे दुकान असते. बरेचदा संजयच्या या व्यवसायात लक्ष्मणरावसुद्धा हातभार लावतात. संजय त्याच्या मित्राच्या लग्नासाठी बाहेरगावी गेला असल्याने दोन दिवस त्यांनी दुकानाचे काम बघितले. 
संजय ज्या दिवशी येणार असतो त्या दिवशी लक्ष्मणरावांची फार धावपळ झालेली असते. त्यामुळे त्यांनी दुकान बंदच ठेवलेले होते. तशी संजयची इच्छा असते. जरी संजय कुठेही असला तरी, घरात काय सुरु आहे, कुणाला कशाची गरज आहे याची त्याला खडा न खडा माहिती असते. 
बाबा तुम्ही आज दुकान उघडू नका तुम्हाला इतरही कामे असल्याने ते महत्वाचे आहेत असे त्याने सकाळीच टेलिफोनवर सांगून ठेवलेले होते. जरी वेळ असला तरी दुकानात जाऊच नका असेसुद्धा त्याने सांगितलेले होते कारण वडिलांनी आता विश्रांतीकडे लक्ष द्यावे अशी त्याची इच्छा असते. पण लक्ष्मणराव मानणारे कुठे.. तरीही स्वतःच्या व्यवसायासंबंधित काहीही काम आले तरी ते जात असत. जोपर्यंत माझ्याकडून होत आहे तोपर्यंत मला ऍक्टिव्ह राहू द्या असे त्यांचे नेहमीचे म्हणणे. म्हणून संजयसुद्धा त्यांना बरेचदा नाही म्हणू शकत नव्हता.  
दुपारच्या वेळेस जरा विश्रांती घेऊन ते स्वतःची काही कामे आटोपतात. सायंकाळची संध्या आटोपून, चौकातल्या हनुमान मंदिरातून दर्शन घेऊन घरी आल्यावर, ते संजयची वाट बघत असतात. 
संजय सांगितलेल्या वेळेपेक्षा उशिराच म्हणजे रात्री साडेआठ वाजता घरी पोहचतो. तो आलेला आहे हे सुमनबाईंच्या लक्षात येते, का रे उशिर झाला फारच; असे त्या स्वयंपाकघरातून बोलतात. 
हो आई जरा गाडीलाच उशीर झाला निघायला, नाहीतर ठरलेल्या वेळेवरच आलो असतो. 
हो हो .. ठीक आहे, ठीक आहे. मी फक्त सहज विचारले उशीर झाला का रे म्हणून. 
आईचा बोलण्याचा स्वर जरा वेगळा आहे हे संजयच्या ध्यानात येतं. आणि तो लक्ष्मणरावांना हळूच म्हणतो, 
बाबा, आज एवढ्या हिवाळ्यात तापमान जास्त होतं का हो इकडे.
लक्ष्मणराव हळूच हो म्हणून त्याला फ्रेश व्हायला सांगतात आणि तो देवासमोर हात जोडून आईला जेवणाची ताटे मांडायला मदत करतो. 
या गुरुजी जेवायला, सुमनबाई लक्ष्मणरावांना आवाज देते. 
तिघेही जेवायला बसतात, संजय बोलायला लागतो. 
बाबा.. आज तुमच्या सुमनबाईंची तब्येत बरोबर नाही का हो. 
कार्ट्या जरा शांततेत जेवण कर, मला काही नाही झालं. 
लक्ष्मणराव माय लेकात चाललेल्या संभाषणावर हळूच हसत असतात; हे बघून सुमनबाई म्हणतात, 
आणि तुम्ही हो.. जरा एकतर खदखदून हसून घ्या नाही तर जेवण तरी करा. 
हो बाबा जरा जेवण करून घेऊ आणि नंतर मी न्यायनिवाडा करतो काय भांडण झालं तुमच्या दोघात त्याचा. दोघांकडेही बघून संजय म्हणतो. 
ओह न्यायमूर्ती, जरा पहिले स्वतःच्या लग्नाचं बघा. नाहीतर तुमचे छोटे बंधू मोठ्या बंधुंसारखी कुणी अप्सरा घेऊन येईल आणि गायब होईल. आणि तुम्ही राहाल तसेच. संजयवर चिडून सुमनबाई म्हणतात.
हो माऊली, होईलच की लग्न. आणि मी काय बघायचं, संजय म्हणतो. 
तू काय बघायचं म्हणजे, जरा तुझ्या ओळखीच्या पाळखीच्यांना सांग की जरा. 
सुमनबाई, तो तीन दिवसांपासून आजच आला आणि तू काय बडबड लावली. लक्ष्मणराव सुमनबाईंना समजावतात.
आई, बाबा जरा ऐका माझं. प्रयत्न करताय ना तुम्ही सगळे तर होईल ना. कधी कधी काही गोष्टी उशिरा पण फार चांगल्या होतात. 
उशिरा म्हणजे कधी रे संज्या.. आमच्याएवढे झाल्यावर की पुढच्या जन्मात. पुन्हा एकदा संजयला सुमनबाई बोलतात. 
आई.. होईल सगळं ठीक असे म्हणत तो जेवण आटोपतो व आईला बाकी कामात मदत करून, वडिलांशी काही महत्वपूर्ण गोष्टींवर चर्चा करून थोड्यावेळात ते तिघेही झोपी जातात. 
लक्ष्मणरावांना मात्र व्यवस्थित झोप लागायला तयार नसते. ज्याचा दोष नाही त्याला उगाच आज ऐकावे लागले याचे त्यांना वाईट वाटलेले असते. 
लक्ष्मणरावांचा त्यांच्या तिघाही मुलांवर, मुलीवर, जावई, सून व नातवंडांवर खूप जीव असतो. पण सुमनबाईंचे वागणे त्यांना पटत नसते. तसा तो तिचा स्वभावच आहे हे त्यांना ठाऊक जरी असले तरी एवढ्यात सुमनबाई जरा अति चिडचिडपणा करत आहे हे त्यांच्या लक्षात येते. मोठ्या सुनेचे जवळ नसणे, बाकी दोन मुलांच्या लग्नाची चिंता हे कारण असले तरी, ती दोन्ही बाजूंचा का विचार करत नाही हे लक्ष्मणरावांना समजेनासे होते. पण सर्व आपल्यासारखे नसतात हे सुद्धा त्यांना तेवढेच ठाउक असते. तरी आपल्यामुळे कुणी दुखावू शकते एवढी जाणीव सुद्धा सुमनबाईंना का होत नसेल, हा प्रश्न नेहमी लक्ष्मणरावांच्या मनात प्रश्न करून राहिलेला असतो. 
बाबा झोपा की आता. सर्व चांगलेच होणार असे संजय लक्ष्मणरावांना म्हणतो. बाबांना अजून झोप लागलेली नाही हे त्याच्या लक्षात आलेले असते. 
तर मग पुढे काय होणार, लक्ष्मणराव आणि कुटुंबियांसाठी सकाळचा सूर्य काय बातमी घेऊन येणार.. हे पुढील भागात बघूया.

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: वैद्यक शास्त्रातील एक शल्य
Next: कदर जाने ना..
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.