Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

स्वप्न

हेमंत नाईक जुलै 10, 2026 1 minute read
0
1001095068.jpg
             “सुरपाखरू”  या  समुदायाच्या डीपी वर असलेल्या सुंदर फुलपाखरावरून.. मला फुलपाखरू कविता आठवली .. त्यातील शेवटच्या दोन ओळी वाचून आज लिहिले गेले, असच काहीतरी मनाला वाटले ते…..
*” दूर पळणारी..आणि कधी कधी साकारणारी स्वप्ने ..”*
छान किती दिसते
फुलपाखरू ।।धृ।।
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसते
फुलपाखरू ।।१।।
पंख विमुकले निळे जांभळे
हालवुनी झुलते
फुलपाखरू ।।२।।
डोळे बारिक करिती लुकलुक
गोल मणी जणु ते
फुलपाखरू ।।३।।
मी धरू जाता येइ न हाता
दूरच ते उडतें
फुलपाखरू ।।४।
              “मी धरू जाता, येई न हाता… दूरच उडते.. फुलपाखरू ” या  ग. ह. पाटील यांच्या “फुलपाखरू” या कवितेतील ओळी प्रमाणे, 
              ” फुलांबरोबर खेळणारी उडणारी व हातात न येणारी फुलपाखरे ही मला दूर पळणाऱ्या स्वप्नावत वाटायला लागलीआणि मी लिहिणे सुरु केले.”
              “बऱ्याचदा आपली स्वप्ने पण आपण अगदी साकारण्याच्या टप्प्यात असतो, तेव्हा या उडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे ती स्वप्ने हुलकावणी देतात”….. म्हणून  स्वप्ने बघणे सोडायचे नसते “*
             “तू नही तर..और सही..और नही तो…और कही” ही सकारात्मक विचारसरणी हवी.”
              “मनी वसे ते स्वप्नी दिसें ” ही म्हण असली तरी ती पूर्णतः खरी नाही. जे मनी असतें ते फक्त्त न फक्त्त जागतेपणीच स्वप्न असतें. निद्रावस्थेत अगदी तिन्ही काळ एकत्र आणणारी… अगदी पुलं च्या पानवाल्याच्या कथेतील त्याच्या दुकानातील चित्रा प्रमाणे स्वप्न पडू शकतात. काही जणांना ती उठल्यावर आठवत ही नाही, आणि आठवली तर लागलीच ती विस्मृतीत जातात, काही मोजकीच लक्षात राहतात,अशीच काही  निद्रावस्थेत गमतीदार  स्वप्ने मला पडली.ती शेअर करतो.
                  झोपताना पडणारी स्वप्ने अगदी काहीही दाखवतात.  स्वर्गस्थ आप्त मित्र गप्पा मारून जातात अगदी परवा मी आणि अगदी जन्मापासून माझा जीवलग बालमित्र कै. उदय पाकिस्तान विरुद्ध बॅटिंग करून आलो.
                 मी आमच्या लाकडी जिन्यावरून घरगळत पडल्याचे एक स्वप्न बऱ्याचदा मला पडलेलं. मी खूप लहान असताना आमच्या लाकडी जिन्यावरून  बऱ्याच वेळा पडून कपाळावर टेंगळे आणायचो… असे आई सांगते, बहुतेक या गोष्टी मुळे ते पडत असावं.
                 “धावत धावत विमानासारखे  गल्लीतून दोन्ही हात फैलावत आकाशात झेप घेतलेली, पक्षासारखा आकाशात विहारतांना मी..आणि “अरे खाली ये रे ” म्हणून ओरडा करणारी मित्रमंडळी असेही एक लहानपणीचे  एक स्वप्न…बघताना हे एवढे सोपे आहे तर विमानाची काय गरज? हा प्रश्न स्वप्नातही मला पडला होता.”
                    राईट बंधू, यांचे मात्र ते “जागेपणीचे स्वप्न”,ज्याने आपल्याला प्रत्यक्ष पक्षाप्रमाणे, विमानात उडवले…हाच तो फरक, दोन प्रकारच्या स्वप्नामधला!
                  शक्यतो मी दुपारी झोपत नाही पण अशाच तीस वर्षापूर्वीच्या एका दुर्मिळ दुपारी मला स्वप्नावस्थेत, “मी गल्लीत एका कोपऱ्यात उभा आहे आणि कुणी साधू वा महंतांची सुंदर सजलेल्या टांग्यातून शोभा यात्रा चाललेली, सर्व भक्त नाचत आहेत आणि अचानक ते महंत त्या यात्रेतून टांग्यातून उतरतात आणि मला जवळ येऊन नमस्कार करतात, असे मलाच अचंबीत करणारे विलक्षण स्वप्न पडलेहोते.
                “कितीही मोठा झाला तरी सर्वापुढे नम्र  रहा”* हाच गर्भीतार्थ, मी त्यावेळी घेतला.. त्याचा! ही सर्व स्वप्ने माझी कल्पना शक्ती नाही, खरंच पडली होती ती मला.
                झोपेतील बहुतेक स्वप्ने तुम्हांला दचकून जागे करतात आणि दिवसा पडलेली स्वप्ने मात्र तुमची झोप उडवतात.
स्वप्नात अशक्य त्या 
गोष्टी घडून जातात 
जागेपणीची स्वप्न
झोप उडवून जातात 
स्वप्नआहे म्हणून जीवन 
पुढे पुढे ते  जाते 
शेवटास मात्र सर्वांचे 
स्वप्नं एक असते 
थकतात सारी गात्रे 
उपभोगून सुख दुःख 
प्रभूभेटीची इच्छा असतें 
नश्वर जग हेच  सत्य..
उद्याच्या लेखात मात्र या जागेपणाच्या स्वप्नावर  लिहिणार आहे.
क्रमश :
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६
✍️ *हेमंत नाईक .*
10 जुलै 2026
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: शिकवण्या
Next: नागपूरचा इतिहास – ६
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.