Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

स्त्रीचं मानसिक आरोग्य – भाग १

श्रद्धा सुदामे ऑगस्ट 3, 2025
sraddha-sudame-3aug

  “ती”चा भावनिक हिंदोळ्यावरील “प्रवास एकटीचा”

ताप,सर्दी याबरोबर आपल्या मुलीचं मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचं आहे कायमच माझ्यातील “ती”ला वाटत आलं आहे. मुली बालपणापासूनच खूपच संवेदनशील असतात.उदाहरणार्थ लहान मुलांसाठीचे शो टेलिव्हिजनवर पहाताना कार्यक्रम संपत आला की बाय बाय म्हणत कार्टूनला लहान मुली डोळे पुसत हुंदके देत बाय म्हणतात. कारण लवकरच कुठल्याही परिस्थितीशी मनाने एकरूप होणे हा त्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे.लहान मुलांसाठी घर, टी.व्ही. हेच मर्यादित विश्व असतं. म्हणूनच शाळेत जाताना पहिल्यांदाच घराबाहेर पाऊल पडतं तेव्हा मुलींना अश्रू आवरणं कित्येक दिवस अवघड जातं.ह्या मुली चित्रपट बघताना सुरूवातीला भावनिक दृश्य आली पडद्यावर की हमसून हमसून रडतात.मन म्हटलं की संवेदना येणारच.मुली मुलांपेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि आई म्हणून प्रत्येक स्त्री पोटच्या मुलीला भावनिक आधार देतेच.पण जसजसे बाहेरचे विश्व, अनुभव आणि वय या गोष्टी वाढत जातात “ती” मुलगी भावनांवर विजय मिळवते.बागडू लागते.

आणि एकदिवशी “ती” किशोरवयात प्रवेश करते.तिचा नवीन वळणावरचा एकटीचा प्रवास सुरु होतो.शारिरीक बदल तिच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याचा ताबा घेतात. अशावेळी हार्मोनल संतुलन राखणं कठीण होतं.कधी “ती” झुंज देते कधी कोसळते, मनाने खचते.ज्यात “ती” चा आत्मविश्वास जाऊ लागतो. कमकुवत मन न्यूनगंड देखील निर्माण करु लागतं. वर्गातील मुले, शिक्षक यांच्यासह जग शत्रू भासू लागण्याचा “ती” चा तो नाजूक असा काळ.ज्यात गरज असते “ती”ला जपण्याची.कधी आकर्षण तर कधी तिरस्कार असं “ती” चं  मानसिक द्वंद्व सुरु होतं.

किशोरवयीन मुली तारूण्यात पाऊल टाकतेवेळी अनोळखी स्पर्श टाळतात.अंगं चोरतात.या कृती बाह्य वाटत असल्या तरी त्या मुलीच्या अंतरंग उमलत असतानाचा मानसिक आंतरिक बदल असतो. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून  वेळोवेळी समुदेशन करणं मनाचं आरोग्य सुदृढ करण्याकरता फायदेशीर ठरतं.

त्यात व्यक्तीचा स्पर्श कसा ओळखायचा.गुड टच,बॅड टच ह्याचे ज्ञान वयाच्या पहिल्या पाच वर्षांत समजावून सांगितले तर भविष्यातील धोके टाळले जातात. उदाहरणार्थ शाळेत नेणारा रिक्षाचालक, बस ड्रायव्हर,  शाळेतील शिपाई ,डिलीव्हरी बाॅईज,यांची भीती किशोरवयीन मुलींमध्ये बरेच वेळा निर्माण होते व मानसिक दडपण येते.मुली अशावेळी अबोल, शांत रहातात किंवा लाजतात.शाळेतही एकट्या राहतात, टिफीन एकटेच खातात वगैरे.त्यांना बोलतं करणं,मनातील भीतीदायक विचारांना वाट मिळणं गरजेचं आहे.

अशावेळी तिच्या इमोशनल मदतीसाठी दुसरी “ती”धावून येते.अर्थात ती “ती” ची आईच असते. शेवटी “ती”चे दर महिन्याचे मानसिक आणि शारीरिक तणावाचे ते चार दिवस सुरु होतात.शारिरीक पीडा आणि मानसिक वेदना यात ती एवढीशी स्त्री होऊ पाहणारी मुलगी झुरत राहते.परत समुदेशन महत्त्वाचे ठरते यावेळी जे मनोबल वाढवते. शाळेतील शिक्षिका, वर्गातील मित्र मैत्रीणी सगळ्यांच्याच सहकार्याची गरज अपेक्षित असते.

निसर्गनिर्मित शारीरिक बदल ही मातृत्वाची दैवी देणगी आहे आणि हे भाग्य फक्त स्त्रीला ईश्वराने बहाल केलंय कारण स्त्रीच  प्रसंगी कणखर आणि कोमल भूमिका समर्थपणे पार पाडू शकते बाळा. मी पण तुझ्यासारखीच मानसिक आव्हानांना सामोरी गेलेय.वंशवृध्दी स्त्रीची नैसर्गिक परंपरा आहे.हे आईचे बोल ऐकून किशोरवयीन “ती” आत्मविश्वासाने आणि  अभिमानाने भावनाविवश न होता तारुण्यातील आयुष्यात पुढचं पाऊल टाकते.

क्रमशः

श्रध्दा सुदामे (कौन्सेलर)

लेखक

  • श्रद्धा सुदामे
    श्रद्धा सुदामे

Tags: सुरपाखरू प्रयोग२०२५ रंग उमलत्या मनाचे

Continue Reading

Previous: ये दोस्ती हम नहीं छोडेंगे
Next: उमटती ज्ञानाची पाऊले….
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.