क्षमाशील जपाची माळ व्हायचं की तलवारीची तेजाळ धार व्हायचं;
अनिर्बंध बनून गती मिळवायची की नियंत्रीत राहून शक्ती कमवायची…
हे तुम्ही ठरवायचं!
गार्गी बनून ज्ञान वाटायचं की मंथरा बनून विष कालवायचं;
कसाब बनून आग लावायची की कलाम बनून अग्निपंख पसरायचे…
हे तुम्ही ठरवायचं!
शतखंड हम्पी पाहून बोटं मोडायची की त्याच हाताची वज्रमूठ बनवायची;
बाजीरावाची फक्त मस्तानी आठवायची की त्यांचं अपराजित अजेय पौरुष स्मरायचं…
हे तुम्ही ठरवायचं!
'खानावळी'च्या मेषपात्रांचे गल्ले भरायचे की 'उरी'च्या 'धुरंधर'ला उचलून धरायचं;
'जोधाचा अकबर' बघायचा की येसूबाईंचा 'छावा' कवटाळायचा…
हे तुम्ही ठरवायचं!
आपले निर्णय निव्वळ आपले असतात;
इतरांच्या तालावर नाचायचं की स्वतःच हे शिवधनुष्य उचलायचं…
हे फक्त तुम्ही ठरवायचं!
गौतम सोमण
२० जानेवारी २०२६
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जानेवारी२०२६