गेल्या महिन्याभरापासून मी सगळीकडे हम्पीचा जप चालवला असल्याने काही जणांनी त्याविषयी पुस्तके सुचवायला सांगितले. हा लेख त्या उद्देशाने लिहिला आहे.
Hampi Vijayanagar लेखक: John M. Fritz and George Michell
तुम्ही हम्पी बघायला जाणार असाल (पहिल्यांदा असो वा कितव्यांदाही ) तर हे पुस्तक वाचलेच पाहीजे. यात हम्पीचा इतिहास, तेथील हंपीची मंदिरे आणि वास्तु, शिल्पकला आणि स्थापत्यकला याची सविस्तर माहिती दिली आहे . आणि त्यातील फोटोज तर अप्रतिम आहेत.
हे दोन्ही ब्रिटिश लेखक हंपीच्या अक्षरशः प्रेमात पडले होते. ३० वर्षांत त्यांनी अगणित वेळा हम्पीला फेऱ्या मारल्या. जॉर्ज मिशेल यांनी तर आपल्या मुलींची नावेही कृष्णदेवरायाच्या राण्यांच्या नावांप्रमाणे ठेवली होती. जॉन फ्रिट्झ यांचे हल्लीच २०२३ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्युपत्राप्रमाणे त्यांचे हिंदु पद्धतीने दहन करून अस्थी, रक्षा तुंगभद्रा नदीत विसर्जित करण्यात आली .
South India Under Vijayanagar: Art and Archaeology संपादिका: Anila Verghese –
A Forgotten Empire: Vijayanagar लेखक: Robert Sewell –
Vijayanagar: History and Legacy लेखक: S. Krishnaswami Aiyangar –
A History of South India: From Prehistoric Times to the Fall of Vijayanagar लेखक: K.A. Nilakanta Sastri –
अमुक्तमाल्यदा –
स्वतः सम्राट कृष्णदेवरायांनी तेलुगू भाषेत लिहिलेले हे महाकाव्य, त्यांच्या कारकिर्दीतील संस्कृती, धार्मिक जीवन आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची माहिती देते. (अनुवाद उपलब्ध.)
Krishnadevaraya लेखक Srinivas Reddy –
जर तुमची आवड स्थापत्य आणि कलेकडे अधिक असेल, तर फ्रिट्झ/मिशेल, आणि वर्गीस यांच्या पुस्तकांपासून सुरुवात करा.
याव्यतिरिक्त तुमच्या माहितीत चांगली पुस्तकें असतील तर जरूर सांगा.
गौतम सोमण
२५ जानेवारी २०२६
#सुरपाखरू #३० दिवसाच्या३० #जानेवारी२०२६