Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap

आज श्वेतासाठी साडी घ्यायला जायचे होते. तिच्या पदवीदान समारंभासाठी. खरं तर परवाच एक छानशी फिकट मेहंदी रंगाची साडी आणली. परंतु पदवीदान समारंभासाठी पांढरी किंवा मोतीया रंगाची साडी परिधान करायची असते हे उशिरा कळले.

आज शनिवारचा दिवस. सकाळी ११ वाजता जायचे ठरले.  फटाफट नाश्ता करून दुपारच्या स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक न करता गेले असते तर यांनी बाहेर जेवणाचा घाट घातला असता. खिशाला चाट व पोटाची वाट लागायला नको म्हणून मी घरीच स्वयंपाक करायचे ठरवले. घाईघाईने कुकर लावला. पोळ्यांसाठी कणीक भिजवली. माझ्या आवडीची पालकाची डाळ घालून भाजी करायचं ठरवले. पालक फोडणीला घातला. डाळ, मीठ, पाणी घातलं. घरी परत आल्यावर उकळी घेऊ असे म्हणत झाकण ठेवले.

घाईघाईत निघालो. कुठे जायचं म्हणजे घरातली आवराआवर करताना घरातल्या गृहिणीची किती तारांबळ उडते हे सांगायला नको.
पहिल्या दुकानात मनासारखी साडी मिळाली नाही म्हणून दुसरे दुकान गाठले. सुदैवाने मनासारखी साडी मिळाली. हुश्श झाले. त्या खुशीत समोरच्या दुकानातले नॅचरल आईस्क्रीम खायची संधी कशी सोडणार? मलबेरीचे आईस्क्रीम फारच भारी होते. पुन्हा कधी मिळेल याची शाश्वती नाही म्हणून फॅमिली पॅक घेण्यासाठी पुन्हा दुकानात शिरले.

उद्या महाशिवरात्र म्हणून उपवासाचे खाद्यपदार्थ व दोन-चार दिवसांत अंदमानला फिरायला जायचे म्हणून दुकानात खरेदीला गेलो. सगळी खरेदी आटोपून घराकडे निघालो. एव्हाना दोन वाजले. पोटात कावळे ओरडू लागले. घरी गेल्यावर मस्तपैकी आवडत्या पालकाच्या भाजीवर ताव मारायचा या विचारानेच तोंडाला पाणी सुटले. घरी पोहोचलो. पार्किंगमध्ये असतानाच मला भाजलेल्या दाण्यांचा खमंग वास येत होता. उद्या शिवरात्र म्हणून दुसऱ्या मजल्यावर राहणारी माझी वहिनीच दाणे भाजत असेल असा अंदाज बांधला. परंतु जिन्यातून चढताना ती स्वयंपाकघरात दिसली नाही. एक मजला चढून वर आलो. मुलीने दार उघडले तर तो वास आमच्याच घरातून येत होता. मी क्षणभर हादरले. कुठून, कसला वास येतो याचा अंदाज बांधत दोघी चटकन घरात शिरलो. लक्षात आले गॅस चालूच होता. घाईघाईत निघताना अनावधानाने गॅस बंद करायचा राहिला होता. चटकन गॅस बंद केला. झाकण उघडू की नको या विचारात थोडे उचकवून बघितलेच. अग्निदेवतेने आपला कार्यभाग साधला होता. गॅसवरच्या कढईत पालकाच्या भाजीचा मागमूसही नव्हता. बिचारीचा चेहरा काळाकिट्ट झाला होता. तेवढ्यात जराशी खाशीही सुटली.

काय बोलणार? डोक्याला हात मारून घेतला. थोडक्यात, अनर्थ होता होता टळला होता. जराशी घाई किती महागात पडली असती या विचारानेच पटापट खिडक्या उघडल्या.

बऱ्याचदा असं होतं गॅस बंद करण्याचा विचार करतो पण प्रत्यक्षात त्यावर अंमल झालेला नसतो. का होत असावे असे? आतापर्यंत अशाप्रसंगी घरातच असल्यामुळे थोडक्यात करपण्यावर निभावले होते. परंतु आज तब्बल अडीच तासाने घरी परतलो होतो. त्यावर झाकण असल्यामुळे व गॅसची ज्योत मंद असल्यामुळे बाका प्रसंग टळला.

या प्रसंगावरून यांच्या मित्राकडची नुकतीच घडलेली घटना आठवली. बायकोने गॅसवर तूप कढत ठेवले व साफ विसरली. काही वेळाने हे महाशय स्वयंपाकघरात पोहोचले व त्यांनी तूप उकळत असल्याचे पाहिले. अशा वेळी सूज्ञ माणूस सुद्धा समय सूचकता दाखवण्याचे भान हरपून बसतो. सांडशी लावून भांडं गॅसवरून उतरवताना घात झाला. उकळते तूप त्यांच्या पायावर सांडले. हे ऐकून जीव कळवळला होता. स्वयंपाक करताना गृहिणीला बऱ्याचदा चटके सहन करावे लागतात, परंतु असे उकळत्या तूपाने पायास स्नान घातले तर जीव जळणारच की.
मी बऱ्याचदा दूध तापत ठेवून दुसऱ्या रूममध्ये काम करायला लागते आणि इकडे उकळून उकळून त्या दुधाची बासुंदी होते. कधी फोडणीसाठी कढईत तेल तापत ठेवते नि दुसरे काम हातासरशी वेगळे करण्याच्या नादात असते. अन् ते तेल भडकते.

अशा घटना घराघरात घडतच असणार. नव्हे घडतातच. ‘घरोघरी मातीच्या चुली’. त्यांच्याकडे जरासं दुर्लक्ष झाले की त्या आपला बडगा दाखवणारच. याला गृहिणीचा धांदरटपणा म्हणावा की कामाचा ताण ? रोज करत असलेल्या तारेवरच्या कसरतीत कधी तरी चुकभूल होणारच ना. माणूस आहे यंत्र नाही. अहो, यंत्र सुद्धा कधी कधी असहकार नोंदवते.

सतत घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या, कुटुंबातील सदस्यांना हवे-नको बघणाऱ्या या गृहिणीची त्रेधातिरपीट उडणारच ना!
यापुढे घरातून निघताना सगळ्यांनी स्वयंपाकघरातील गॅस बंद आहे ना याची खात्री करूनच बाहेर पडायचे असे मी फर्मान सोडले.
बाहेर जेवायला लागू नये यासाठी केलेली धावपळ व्यर्थ ठरली. आता हॉटेलातून एखादी भाजी मागवावी या हेतूने कॉल केला तर घरपोच डिलिव्हरीसाठी किमान पाऊण एक तास तरी लागेल असे सांगण्यात आले. तेव्हा  मुकाट्याने पिठले करायला घेतले. आज पालकाची भाजी नाही तर पिठले खाण्याचा योग होता असे म्हणत त्यावर मस्त ताव मारून क्षुधेस तृप्त केले.

लेखक

  • वंदना लोखंडे

    मूळ गाव धुळे. इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीधर. लिखाणाची आवड.

    प्रकाशित साहित्य :

    * आतापर्यंत ९ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
    * त्यापैकी 'किलबिल', 'प प पक्षी', 'ओवी कुठे चालली शॉपिंगला', 'ओवी कुठे चालली डे केअरला', हे बालकविता संग्रह
    * स्मृतिपाखरे हा ललितलेखसंग्रह
    * हिंदोळा यात लग्न, डोहाळजेवण व बारसे याप्रसंगाची स्त्री गीते
    * गीत संजीवन, मंजिरी हा भक्तिगीतसंग्रह व 'सप्तरंगी उखाणे' 'प प पक्षी' यातून अक्षरओळख व चारोळीतून छायाचित्रासहित पक्ष्यांचीओळख अशी अनोखी संकल्पना आहे.

    वंदनलिपी- या ब्लॉगवर ललितलेखन.

    काव्यसूर- या यु-ट्युब चॅनलवर लहान मुलांसाठी संगीतबद्ध गाणी चित्रफितीतून सादर केली जातात.

Tags: सुरपाखरू प्रयोग२०२६ अक्षरयात्री२०२६

Continue Reading

Previous: पसारा
Next: “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.