Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

अर्धा तास भाग २

अपर्णा शेंबेकर मार्च 9, 2026
0
aparna-ardha-taas
भाग एक पासून पुढे…
तिने ते वेगळे , चमत्कारिक पुस्तक शोधण्यासाठी एका मागून एक अनेक कपाटे धुंडाळली पण ते पुस्तक काही तिला सापडेना. ती अस्वस्थ होती. थोडी भीती आणि प्रचंड कुतूहल तिला स्वस्थ बसू देईना. साडेसहा वाजले होते. तिने मनाशी विचार केला की उद्या बाकी कर्मचाऱ्यांना या पुस्तकाविषयी विचारावे.  लगेच दुसरा विचार आला की हे विचित्र पुस्तक आपल्याला सापडले आहे त्याबद्दलचे वर्णन केले तर त्यांना ते पटेल का? या पुस्तकाबद्दल इतरांशी बोलणे योग्य आहे का? तिचा संभ्रम अजूनच वाढला. घशाला कोरड जाणवत होती. ती घटाघटा पाणी प्यायली. थोडी हुशारी वाटली. पण काहीही असो त्या पुस्तकाचा छडा लावायचाच हे तिने पक्के ठरवले. नेहमीप्रमाणे दिवे मालवून कुलूप लावून ती घरी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुस्तक शोधायचे म्हणून ती साडेनऊ वाजताच ग्रंथालयात पोहोचली. तिने कुलूप काढले. आपले सामान नेहमीच्या जागेवर ठेवले. पंखा सुरू केला आणि आपल्या खुर्चीवर येऊन बसली. आपला चष्मा टेबलवर ठेवता ठेवता सहज तिची नजर टेबलवर पडलेल्या पुस्तकावर पडली. तिला हवे असलेले पुस्तक टेबलावरच ठेवलेले होते. पण कोणी? कधी?
सानिका रोज घरी जाताना आपला टेबल व्यवस्थित आवरून, कागदपत्र टेबलच्या खणात कुलूप लावून जात असे. त्यामुळे ते पुस्तक टेबलवर कसे काय दिसले हे तिला कळेचना.
 पाच मिनिटे तिला आपल्याच हृदयाची धडधड ऐकू येत होती. ती स्तब्ध बसून होती. पुस्तकाकडे एक टक बघत होती. तेवढ्यात तिला ग्रंथालय स्वच्छ करणाऱ्या सुमन ताईंच्या बोलण्याचा आवाज आला. तिने पुस्तक पटकन आपल्या पर्समध्ये ठेवले.
  आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर हे पुस्तक नीट बघू असे तिने मनोमन ठरवले आणि ती एका विचित्र संभ्रमातच कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करत राहिली.
   साडेसहा पर्यंत उत्सुकता ताणून धरणे तिला अवघड वाटू लागले. अडीच वाजता तिने सीमाला सांगितले की तिला बरे वाटत नसल्यामुळे ती आज अर्धी सुट्टी घेऊन घरी जात आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटले. कारण सानिका फारच क्वचित सुट्टी घेत असे. तिने अडीच वाजता आपले सामान आवरले आणि ती ग्रंथालयातून बाहेर पडली.
  क्रमशः.  …….

लेखक

  • अपर्णा शेंबेकर

    अपर्णा शेंबेकर या नागपुरातील सोमलवार शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

Post navigation

Previous: “असाध्य ते साध्य करता सायास!!”
Next: कलंदर ( रसग्रहण )
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.