Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

कलंदर ( रसग्रहण )

ऐश्वर्या डगांवकर मार्च 10, 2026 1 minute read
0
gumohor-water
आज वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनानिमित्त 
     कलंदर (रसग्रहण)
माझ्या साम्राज्यात आता
     मीच भूप मीच प्रजा 
माझ्या देवळात झालो
      मीच देव मी पूजा.
माझ्या मनात शलाका
      विश्वगर्भ आकाशाची 
माझ्या प्रज्ञेतुनि उदे
     भागीरथी प्रकाशाची.
दूरतेला आली आता
     माझ्यापाशी जवळीक 
धरतीच्या मातीमधे
       स्वर्गाशी हो सोयरीक.
नीतिरीतीची देहली
      गेले ओलांडून मन
मुक्ततेत झाले सार्‍या
       श्रृंखलांचे विसर्जन.
माझ्या आत्मतेस नाही
        आता अहंतेचा पार 
झाले अनंताचे घर
          त्याला जीवनाचे दार.
                      कवी -कुसुमाग्रज
  अर्थ –एकांतात रहाणारा,जगापासून निःसंग
            फकीर
भाव –अध्यात्मिक, ईश्वराशी तादात्म्य साधणारा
शलाका–आत्मतेज आणि ईश्वर यांना साधणारी तेजोरेषा
भागिरथी –म्हणजे गंगा जी सर्वांचा देह मन शुद्ध करते
धरतीच्या मातीमध्ये स्वर्गाशी सोयरीक -म्हणजे– मनुष्याचा ईश्वराशी जोडणारा संबंध
श्रुंखला —कडी .नीतीपरंपरा,रितीरिवाज, नातीगोती मोहमायेची बेडी .
अनंताचे घर —ईश्वराचे घर .श्री विष्णू भगवान यांचे घर जे मनुष्याला मोक्ष देतात.
वरील सर्व उपमांनी नटलेली ,अध्यात्मिक मार्गावर नेणारी ,तालबद्ध,सुंदर लय साधणारी कवीवर्य कुसुमाग्रज यांची 'कलंदर ' कविता सारगर्भित रचना आहे.आत्मभान दर्शवते.मी आणि देव म्हणजेच आत्मा आणि परमात्मा यांच्यातील अद्वैत भाव दाखवणारी श्रेष्ठ
कविता आहे.कवी स्वतःला हरवून बसले आहेत. त्यांचे मन त्यांचे न रहाता एका वेगळ्याच जगात वावरत आहे.जिथे तेच राजा ,तेच प्रजा तेच देऊळ तेच देव आहे पूजा आहे.यावरून आशाताईंनी गायलेले गाणे आठवते
'  मी मज हरपून बसले आता '.कवी सांगतात,
शरीर हेच त्यांचे राज्य त्यातील इंद्रिये मन बुद्धी ही त्यांची प्रजा आणि या शरीररूपी देवळात माझा आत्मा माझा देव आहे या सर्व इंद्रियांच्या साह्याने ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मी त्या ईश्वराची पूजा करत आहे म्हणजे मीच देव आहे मीच पूजा आहे.माझ्या मनात आकाशातील विश्वगर्भ म्हणजे ईश्वराशी माझ्या आत्म्याला म्हणजे माझ्यातील देवाला जोडणारी एक तेजोरेषा आहे .आत्मभान जागृत करणारी एक प्रकाशमय ज्योत आहे ,ती माझी प्रज्ञा आहे म्हणजे बुद्धी .तिच्यातून निर्माण झालेली भागीरथी म्हणजे गंगा ती माझ्या भौतिक आवरणाला ,माझ्यातील षड्रिपूंना शुद्ध करत आहे.त्यामुळे मला दूस-या गंगेची आवश्यकता नाही. मला स्वतःला काय चांगले काय वाईट ही सारासार बुद्धी तर आलीच आहे पण त्यापेक्षाही मला माझ्या जीवनाचे गूढ कळले आहे.मला हा मनुष्यजन्म का मिळाला आहे याचा उद्देश काय आहे ह्याचे आत्मभान आले आहे.
आतापर्यंत दूर असलेला ईश्वर ,असाध्य वाटणारा माझ्या जवळ आला आहे ,मी ईश्वराच्या जवळ पोचायच्या मार्गावर आहे.मातीतून जन्म घेतलेला मी आकाशातील ईश्वराशी सोयरीक  साधायच्या प्रयत्नात आहे .अत्यंत साधारण असा मी वाटेतील सर्व अडथळे दूर सारून अनंताकडे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे .त्यासाठी नीतीअनीती,रुढीपरंपरा,नातीगोती, षड्रिपूंचे मायाजाल या सगळ्यांची श्रुंखला म्हणजे बेडी तोडून किंवा सगळ्या माझ्या प्रज्ञागंगेत विसर्जित करून मुक्त झालो आहे .आता माझ्यात अहंकाराचा लवलेशही उरला नाही.
आता मला फक्त एकच ध्यास आहे ईश्वराचा
त्याच्या घरी म्हणजे अनंताकडे जायचा.अनंत म्हणजे भगवान श्रीविष्णूंचे घर जे मनुष्याला मोक्ष प्रदान करतात.मला माहित आहे त्याच्याकडे जातांना सर्व पाशमुक्त, बंधमुक्त होऊनच जाता येते .हे केवळ मनुष्य
जन्मातच सहजशक्य आहे.परंतु त्यासाठी आपले ईश्वराशी असणारे नाते लक्षात घ्यावे लागते.या गोष्टीचे भान मला आले आहे .'मी कोण, कुठून आलो ,कुठे जायचे ,माझ्या जीवनाचा उद्देश काय' हे सर्व जाणून
घेतले पाहिजे .त्यालाच आत्मभान म्हणतात. असे आत्मभान लाभलेला मनुष्य सर्व जगापासून दूर एकटा आपल्याच विश्वात रमणारा फकीर असतो.त्याचे विश्व
म्हणजे फक्त तो आणि ईश्वर (आत्मा आणि परमात्मा).
          
 

लेखक

  • ऐश्वर्या डगांवकर

    पूर्वाश्रमी-वर्षाराणी दाणे
    शिक्षण-- शालेय आणि महाविद्यालयीन -धुळे
    बी. ए. ऑनर्स इंग्रजी विषयात
    पूना युनिव्हर्सिटी महाराष्ट्र.
    व्यवसाय --लेखिका /कवयित्री --मराठी हिंदी गृहिणी,कथाकथन,रसग्रहण
    भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५

Post navigation

Previous: अर्धा तास भाग २
Next: हे सांगायलाच हवे – पुस्तक परिक्षण
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.