||तलावाचे गाऱ्हाणे||
तलावाला लागली,
माणसाचीच दृष्ट,
पशुपक्षी अन् मासे बिचारे,
पाण्याविना तळमळतात सारे.
नागपूर हे एक ऐतिहासिक शहर आहे. आणि या शहराच्या आसपास जवळजवळ दहा ते बारा तलाव होते, पण आता पाच ते सहा तलाव राहिले आहेत. उतरले आपले अस्तिव कधीच गमावून बसले आहे. काही मानवी चुका आणि अतिक्रमण कारणीभूत तर काही नैसर्गिक कारण. पण आता त्यावर रहिवासी वस्त्या सुद्धा झाल्यात आणि त्यांच्या खुणा सुद्धा उरल्या नाहीत. आता मोजून चार ते पाच तलाव आहेत.
नागपूरला आणि त्यातही शुक्रवार तलाव आणि अंबाझरी तलाव आपल्या अस्तित्वासाठी झगडता आहेत. शुक्रवार तलाव सौंदर्य करण्याच्या पूजा खाली दबला आणि आता त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आता तलाव आणि दुसरा नंबर आहे अंबाझरी.
अंबाझरी ही नैसर्गिक आपदा, शेतीमधील कृत्रिम खत ज्या मध्ये नाइट्रोजन, फास्फोरस और जहरीले प्रदूषक खात अतिवापर यामुळे जलकुंभी वनस्पतींचा सामना करते आहे.
या जलकुंभी वनस्पतीने अंबाझरी तलावाचे अस्तित्व धोक्यात आणले आहे कारण ही वनस्पती वायुमंडलातले ऑक्सिजन आणि पाण्यात ऑक्सिजन दोन्हीही शोषून घेऊन पूर्ण तलावभर पसरते आणि त्यातील सर्व जल जैविक प्रजाती धोक्यात येतात किंव्हा मृतही पावतात आणि त्यामुळे पाणी हे सडले जाते
सद्यस्थितीत हीच अवस्था अंबाझरी तलावाचे झालेली आहे NMC आणि बाकीचे NGO स्वयंसेवक तलावाच्या सफाईसाठी प्रयत्न करतात पण आणखी हात जोडलेत तर हे अजून लवकर होईल आणि आपली एक धरोहर वाचवता येईल.