Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Live From The Field

राधा जोशी जुलै 18, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                             १८ जुलै २०२६

नागपूरकर भोसले

                        नागपूर राज्याचा उत्कर्ष

महाराज रघुजीराजे-२ यांनी स्वतंत्र नागपूर  मंदिर वास्तुशैली विकसित केली .

                      नागपूर मंदिर वास्तुशैलीची विषेशता

१ मंदिराची रचना हेमाडपंती पद्धितीची  असून  मुख्य मंदिर  हे चैाकोनी अथवा चांदणी आकाराचे असते. गर्भगृह अंतराळ व सभामडंप हे तिन मंदिराचे मुख्य अंग आहेत.शिखरांची उंची साधारणपणे  मंदिराच्या उंचीच्या दुप्पट असून गर्भगृहावर त्रिरथ पद्धतीचे शिखर असतं.मुख्य शिखरावर आमलक कलश व आयुध असून मुख्य शिखरासह दोन उपशिखर असतात.मंदिराचा  सभामंडपावर साधे छत असत व  अंतराळावर  शुकनक असतो.

२ मंदिराचा आयताकृती सभामंडप खांबांवर आधरा असे.या सभामंडपाचे खांब सुरूळी आकाराचे असून खांबांच्या खालाचा भाग हा कमळाच्या आकाराचा असे. 

३ खांबांमधल्या कमानि चंद्रकोरीच्या अकाराच्या आहेत .कमानिचे काठ दुहेरी असून त्यावर चंद्रकोरींच्या आकारांच्या नक्षी कोरल्या असतात. मंदिरावर बाहेरून भोवताल नक्षींदार पट्टे महंरपी कोनाडे आहेत 

४ मंदिर आवारा विस्तर्ण असून भोवताल झाडांची बाग . मंदिर आवाराभोवताल तंटबंद्धी असून तटबंद्धीत पुर्वेस भव्य  महाव्दार व उत्तरेस आणखी एक दरवाजा असे. महाव्दारावर नगराखाना असे. महाव्दाराकडून मंदिरकडे  जाण्यास फरसबंदी मार्ग असे.मंदिर परीसरात पाण्यांची सोय असे. 

५ मंदिरासह तलाव व बाग निर्माण केली जात असे

वरील मुलभूत  विषेशतांच्या  आधारावर  मंदिर रचना केली जात असली  तरी  महाराज रघुजीराजे-२ यांनी  सर्वपरिचीत नागर विसरा  द्रविड  भुमीज आदि मंदिर वास्तुशैलींच्या  काही विशेषता घालून मंदिर वास्तुशैली विकसित केली. त्यामूळे प्रत्येक   मंदिर  अनोखे घडले! सिताबर्डी टेकडीखालचे महादेव मंदिर हे  नागपूर मंदिर वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण  आहे. या  मंदिराचे शिखर नागर ओडिसी पद्धतीने बांधले आहे. तेलंगखेडीचे  शिव मंदिराच्या सभामडंपाचे सगंमवरी खांब हे जोड-खांब आहेत. सभामडंपाचे दुहेरी खांब असून कोपरयावर चैाहेरी खांब आहेत. 

इ.स. १७८३ मध्ये महाराज रघुजीराजे-२ यांनी मातोश्री चिमांबाईसाहेब यांचे आज्ञेवरून तेलंगखेडी येथे शिव मंदिर व तलाव बांधला आणी  व्यकोंजीराजानी चारबाग निमार्ण केली नंतर महाराज रघुजीराजे-२ यांनी इ.स. १७८८ मध्ये सक्करदारा येथे श्रीलक्ष्मी नारायण मंदिरासह पायरयांची विहीर तसेच सक्करदारा बागं व विस्तिर्ण तलाव  निर्माण केली  होती  सक्करदराचे श्री लक्ष्मी नारायण मंदिराचे शिखर  हे  विसरा पद्धती असून  खजुराहोचे सुप्रसिद्ध  खंडिया महादेव मंदिराच्या शिखराप्रमाणे आहे. पिस्त पद गंधी मस्तक व खपुरी असे शिखराचे पाच अंग किवां भाग आहेत मुख्य शिखराचे  भोवती अनेक उर्धशिखर आहेत.गर्भगृहास जाळीच्या खिडक्या आहेत.मात्र प्रदिक्षणा मार्ग नसून या मंदिराचा गाभारा निराधार प्रसाद पद्धतीचा आहे. मंदिराचे सभामंडपात ४ ओळीत ३२ लाकडी खांबांचा नक्षीदार लाकडी कमानिदार मडप होता.जागृतेश्वर मंदिर व केळीबागेतील शिवमंदिराचे शिखर भुमीज पद्धतीचे आहेत. शुक्रकरवार तळयावरचे शिव मंदिराचे शिखर हे  नागर पद्धतीचे रेखाशिखर आहे. मंगळवार पेठ किवां मगंळवारीचे श्री लक्ष्मी नारायण मंदिर   तुळशी बागेतले श्री मुरलीधर मंदिर असे अप्रतिम मंदिरे महाराज रघुजीराजे.२ यांनी बांधले  

पाय-यांची विहीर!

महाराज रघुजीराजे दुसरे यांनी त्यांचे कारकिर्दीत तांडापेठेत मगंळवारीत जुनी बुधवारी  येथे राजबक्षा मारोती मंदिर परिसरात  नंदनवनात पाय-यांच्या विहरी बांधल्या. तसेच पारडी छावणी परिसरात श्री मुरलिधर मंदिर व पाय-यांची विहीर बांधली देवलापार येथे हि पाय-यांची विहीर आहे.

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: रेडिओ
Next: मुकी होत चाललेली घरं
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.