राहुल ने फर्स्ट इयर हे डिस्टिंक्शन मध्ये पास केलेला. आणि दुसऱ्या वर्षाचे दुसरे सत्र हे चालू असतानाच, वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिकारी कॅम्पस सिलेक्शन साठी मुलाखती घ्यायला लागलेत. याच प्रक्रियेमध्ये राहुलच्याही मुलाखती झाल्यात. आणि त्याला एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कॉस्ट अकाउंटिंग विभागात, कंपनीचा प्रस्ताव सुद्धा आला. थोडक्यात काय तर त्याची नोकरी सुद्धा पक्की झाली. हे सगळे पास होण्याच्या आधीच झालेत. त्यातही अंतिम सत्र डिस्टेन्शनमध्ये पूर्ण झाले.
घरी आनंद आनंद झाला. कारण वडिलांच्या सांगण्यानुसार त्याने नोकरी स्वीकारली, आणि व्यवसायाचा विचार मनातून काढला. असे वरवर जरी दिसत असले तरी सर्वच आनंदी होते. काही दिवस परिवारासोबत घालवून तो नोकरीवर रुजू झाला.
पै पाहुण्यांचे, नातेवाईकांचे आणि राहुलच्या मित्रांचे अभिनंदनाचे संदेश येता-येता थकत नव्हते. त्यातच वडिलांचे एक मित्र एका रविवारी घरी येऊन वैयक्तिकरित्या अभिनंदनसाठी आले.
नंतर दुसऱ्या रविवारी वडिलांनी त्यांचे मित्र कशासाठी आलेत हे सांगते झालेत. मुळात त्यांना एक मुलगी होती, आणि त्याच मुलीचे स्थळ घेऊन वैयक्तिक भेटण्यासाठी म्हणून आले होते. पण त्यांनी सुद्धा एक प्रश्न विचारला हा नोकरीच करणार आहे की पुढे जाऊन व्यवसायाकडे वळू शकतो? आणि राहुलची पुन्हा एकदा घालमेल सुरू झाली.
नोकरी की व्यवसाय?
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६