Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

सुपारी

सायली कराडे जुलै 30, 2026 1 minute read
0
WhatsApp_Image_2026-07-30_at_8.34.27_AM-removebg-preview.png

#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६

खरं तर सँडविच असं शीर्षक देणार होते पण एक तर तो इंग्रजी शब्द आणि त्यात मला जो परिणाम साधायचा आहे तो साधला जाणार नाही. 

चला तर आज एका घराची गोष्ट सांगते – घरात मध्यमवयीन पालक – जेनेरेशन एक्स च्या शेवटी अथवा मिलेनियल्स च्या अगदी सुरुवातीचा जन्म – तेही खेड्यातील वातावरणांत वाढलेले – मुलं मात्र जेनेरेशन झेड – माफ करा हं – जेन झी! मग काय खटके उडणारच तेही रोज. कधी सुरसुरी, कधी लवंगी तर कधी सुतळी फटाका, कधी अनार तर कधी थेट रॉकेट. त्यात पालकांची खंत – “आम्ही कधी अशी उलट उत्तरं आमच्या पालकांना दिली नाही. पण आम्हाला मात्र सतत उलटी उत्तरं मिळत असतात.” आता हे चित्र थोड्या फार फरकाने सर्व घरात इतकं सारखं असतं की ‘कहानी घर घर की’ पासून तर ‘घरोघरी मातीच्या चुली’ अन् ‘बेलाला पाने तीनच’ असं सगळं आठवावं. 

आता कळलं असेल तुम्हाला की शीर्षक ‘सँडविच’ ऐवजी ‘सुपारी’ का ठेवलं? कारण या पालकवर्गाची त्यांचे पालक आणि त्यांची अपत्य या दोन अडकित्त्याच्या पात्यामध्ये अडकलेल्या सुपारीसारखी अवस्था झालेली आहे. सँडविचमध्ये कसं स्टफिंग का फीलिंग जे काय म्हणतात ते दोन पावांच्या मध्ये फसलेलं, दबलेलं असतं, पण सुपारीचं तसं नाही – ती अडकित्त्यात अडकून बिचारी कातरल्या जात असते – बारीक बारीक बारीक, रोज थोडी थोडी.

बेबी बूमर्स आई-वडिलांनी ठोकून पिटून जबाबदाऱ्यांसाठी तयार केल्यानंतरही आज ४०, ५०, ६० च्या वयातल्या जेनेरेशन एक्स मुलांना अजूनही ७०, ८०, ९० च्या घरातल्या आई वडिलांकडून अजूनही थोडं काही चुकलं की ओरडा खावा लागतो. अन् समोरच्या जेन झी कडून ‘तुम्हाला काय समजतंय यातलं’ म्हणून वाभाडेही काढल्या जातात.. दोन्हीकडून पिचलेली अशी ही बिचारी जेनेरेशन एक्स. 

आज मागची पिढी ९० च्या घरात चालली म्हटल्यावर आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली अफाट कष्ट उघड्या डोळ्यांनी बघून झाल्यावर त्यांना काय जबाबदारीचं ओझं सोपवणार? आणि समोरची पिढी तर खांदे झुकवून अन् पाठीला बाक आणून बसलेली – माफ करा – लोळत पडलेली. त्या खांद्यांवर काही टाकायचं धाडस करायला कोण धजावणार? फार काही मोठ्या जबाबदाऱ्यांची गोष्ट नाही चाललेली इथे. घरकामांबद्दल बोलतीय मी.

मागच्या पिढीची संध्याकाळ कधीचीच सुरू झालीय अन् पुढच्या पिढीची सकाळ उगवेपर्यंत सगळी कामं आटोपलेली असतात. मधल्या मध्ये जेनेरेशन एक्सचा सूर्य मात्र जळून जळून खाक होण्याच्या प्रतीक्षेत उजेड पाडत राहतो.

यांना कोण समजून घेणार? बेबी बूमर्स नी प्रचंड कष्ट करून कुटुंब वर आणलं म्हणून त्यांना समजून घ्या, जेन झी नवीन पिढी आहे, त्यांची स्वप्नं आहेत, महत्वाकांक्षा आहेत त्यांना समजून घ्या. चुली फुंकण्यापासून तर मायक्रोवेव आणि विजेवर चालणारी शेगडी बघून झाली पण हातून रांधणं काही सुटलं नाही अजून. सिग्नल साठी एखादी झापड मारावी लागेल किंवा घरभर फिरवून आवडीचं ठिकाण शोधून द्यावं लागेल अशा रेडियो पासून तर ओ टी टी प्लॅटफॉर्म पर्यंत करमणुकीची साधनं उपभोगून झाली असतील पण ही करमणूक हातात कुठलंही काम नसताना करता येण्याएवढी फुरसत मात्र या पिढीला अजूनतरी गवसली नाही. 

अधून मधून या अखंड तळपणाऱ्या सूर्याचा कधी राक्षसी तारा तर कधी श्वेतबटू होतो – एखादे वेळी कृष्ण विवर देखील. पण ते तेवढ्यापुरतंच. परत त्यांनी घेतलेल्या त्यांच्या कर्तव्याच्या सुपारीची, उचललेल्या विडयाची आठवण येते अन् येतात परत आपल्या सूर्य रूपात का मग सुपारी रूपात?? 


WhatsApp_Image_2026-07-30_at_8.34.27_AM-removebg-preview.png

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: Live From The Field
Next: छुपा वंशवाद
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.