इचिगो इची
The Book of Ichigo Ichie : Art of Making the
Most of Every Moment, the Japanese Way
: Hector Garcia and Francesc Miralles
मी हे पुस्तक वाचायला घेतले आणि अगदी सुरुवातीलाच मला श्री संत तुकाराम महाराजांच्या पत्नीची आठवण झाली . जेव्हा तुकाराम महाराज सदेह वैकुंठी जाण्यासाठी पुष्पक विमानात बसतात ,तेव्हा त्यांना वाटते की , पत्नीलाही सोबत घ्यावे आणि ते तिला बोलावतात . ती माऊली म्हणते की , म्हशीला चारा देऊन मग जाऊया, आणि नंतर परत येते तर विमान उडून गेलेले असते . आपल्याही जीवनात असे काहीसे सदैव घडत असते. जे ज्या वेळी आपल्यासाठी हात जोडुन उभे असते , ते तेव्हाच घेतले पाहिजे , अन्यथा नंतर जन्मभर हात चोळत बसावे लागते . वर्तमानातच पूर्णतः जगण्याची ही जपानी वृत्तीच ह्या पुस्तकाची मुख्यधारा आहे.
वर्तमानात कसे जगायचे , ह्यासाठी ह्या पुस्तकात “ chanoyu – way of tea “ ह्या जपानी बौद्ध स्तुपातील चहा घेण्याच्या कार्यक्रमाबाबत उदाहरण दिले आहे. चहा हा आपल्या पंच इंद्रिय ( Taste,Smell , Sight, Touch,Sound ) वापरुन घेतला , तर त्याचा आनंद नक्कीच वेगळा असतो. आपण वर्तमानात जगतांना प्रत्येक बाबतीत भूतकाळातील दुःखद अनुभव आणि भविष्यातील भीतीदायक घटनांचा विचार न करता वर्तमानात आनंदाने सहज जगू शकतो,हे ह्या पुस्तकात सोप्या पद्धतीने मांडलेले आहे. खऱ्या अर्थाने पहिले तर , आपण जन्मभर फक्त मृत्युचाच विचार करीत असतो, तेवढाच विचार ( असलेला उपलब्ध क्षण ) जगण्याचा केला तर, आपले जीवन खुप सोपे होत असते. जन्मापासुन मृत्यूपर्यंत एकदा जगलेला तो क्षण परत कधीही येणार नसतो, हे साधे सत्य आपण का विसरतो, हे समजण्यापलीकडे आहे. मृत्यु जरी एक दिवस येणारच आहे , तर त्या दिवसापर्यंत आपण जगण्याचे सोडुन देतो का ? , हाच विचार आपण केला पाहिजे. मृत्यु तर क्षणिक असतो, पण जगणे तर क्षणोक्षणी असते ना, हे आपण का विसरावे ? हेच ह्या पुस्तकात सुचविले आहे.
समाज जीवनात खुप यशस्वी होऊन जगणारे लोक पाहिले तर, त्यांच्या आयुष्यात एक मुख्य धारा असते. हे लोक पाहिले मला काय करायचे आहे ( Ikigai/ mission /love ) हे ठरवतात, मग ते ध्येय मनात जपत ठेवत , अन्य दुसरा कोणताही विचार न करता , त्यासाठी प्रखर परिश्रम ( kaika / passion ) घेतात ,आणि तिसरे म्हणजे त्याच रस्त्यावर प्रयत्नरत राहण्यासाठी आणि आपल्या ठरलेल्या ध्येयाच्या स्वप्नपुर्तीसाठी आवश्यक वेळ देतात (10,000 hours rule) , ह्यानंतर त्यांच्या जीवनातील आनंदाचा वसंत बहरणे , हे नक्की असते,आणि हे असे सामान्यतः सर्वांसाठीच असते. हे सुरू करायला ह्या लोकांमध्ये वयाचे कोणतेच बंधन नसते आणि हे लोक भुतकाळ वा भविष्याचा विचार न करता फक्त वर्तमानात जगत असतात .The present time is the best present we have , हेच ह्या पुस्तकामधून शिकायला मिळते .