Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

“ओंजळ”

हेमंत नाईक जुलै 29, 2026 1 minute read
0
1001120270.jpg
      आज काय आणि कशा वर लिहावं हा विचार करून थकलो दोन्ही हात जोडून चेहेरा झाकून शांत डोळे मिटून आरामखुर्चीवर पहडलो असताना डोळे उघडले तर दिसली माझ्या हाताची *”ओंजळ “*.
       आणि 
       तीच मला आज लिहिण्यासाठी विषय देऊन गेली.
       शाळेमध्ये असताना आता नेतात तशी शाळेत पाण्याची बाटली घेऊन जाण्याची पद्धत नव्हती. नळाला पाणी असायचे एका हाताने नळ पकडायचा आणि दुसऱ्या हातची ओंजळ करून पाणी प्यायचो तेव्हा मला ओंजळीची ओळख झाली.
     त्या आधी  देवाचं तीर्थ आणि सत्यनारायणाचा प्रसाद उजव्या हातांच्या ओंजळीत घे असा आईचा आदेश नेमकी ओंजळ म्हणजे काय ते सांगून गेले होता.
     अशी तळहातावर खोल भाग करून एक हाताची ओंजळ कशी वापरायची हे लक्षात आले.
     पण देवीच्या कुळाचार  पूजनासाठी पाच घरी जोगवा मागून धान्य आणायची अशी प्रथा आमच्या घरात होती. बहुतेक आपल्यातील अहंम जाण्यासाठी असावी तेव्हा दोन्ही हाताची “ओंजळ”  ही दिलेले स्वीकारण्यासाठी आणि दुसऱ्याला काही देण्यासाठीही उपयोगात आणायची असते हे समजलं.
      जीवनात देण आणि घेणं हे अविरत सुरु असते जो देतो तो दाता आणि जो घेतो तो याचक हे कार्य करणारी असते ती “ओंजळ” , दात्याची वरती आणि यांचकाची खाली.
   विं दा  करंदीकर यांची देण्या घेण्यावरची सुंदर कविता आठवली.
देणाऱ्याने देत जावे 
घेणाऱ्याने घेत जावे 
एकदिवस घेणाऱ्याने 
देणाऱ्याचे हात घ्यावे 
      विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ह्या ओळींचा अर्थ असा होतो की प्रत्येक वेळी व्यक्तीने घेणाऱ्याच्या भूमिकेत असू नये.एखादी व्यक्ती   आपल्याला काही देत आहे म्हणून आपण सतत घेत राहावे आणि एक दिवस देणाऱ्याच्या हातही घ्यावे म्हणजे त्याच्या अंगी असलेले दातृत्व घेऊन आपणही देण्यास सुरवात करावी.
        जर कोणाकडून एखादी चांगली गोष्ट मिळत असेल तर त्याचा मोबदला म्हणून आपणही त्याच्यासाठी काहीतरी करायला हवे हा भावार्थ कवीने सांगितला आहे.
       तीन वर्षांपूर्वी,एका मित्राने त्याच्या सिमला पर्यटनाचा एक फोटो पोस्ट केला होता, त्याच्या साठी नंतर सिमला येथे काढलेला. त्याचा फोटो आज आठवला. तो  त्याची ताज्या गुलाबी फुलांनी पूर्ण भरलेली ओंजळ त्याच्या पत्नीच्या ओंजळीत रिती करत होता. इथं न कुणी दाता होता न कुणी याचक. फक्त आणि फक्त प्रेम व्यक्त होण्यासाठी ओंजळीचा वापर झाला होता. त्याचे ते सुखी आणि आनंदी जीवनाचे सार्थ जीवनचित्र होते.
       विवाहाच्या लाजाहोमाच्या विधीत वधू याच ओंजळीचा उपयोग  सायलीच्या लाह्याची अग्नीत आहुती दिली जाते. हा विधी वधूचे नवीन कुटुंबातील आगमन आणि तिच्या त्यागाचे व समर्पणाचे प्रतीक मानला जातो.
      अशा या प्रेमाच्या ओंजळीवर या ओळी लिहून माझ्या मनातील शब्दाची ओंजळ रिती करतो.
ओंजळीत माझ्या..
गुलाबी फुले ती,
प्रेमाचा तोच रंग..
हा योगायोग नाही..१
सुखद क्षणाच्या या
अविस्मरणीय स्मृति,
जपे ओंजळीत साठा..
हरवायच्या नाही .२
ओंजळीत लपला..
रात्री चंद्र भुतलीचा
रात्रीचा तो दिवस..
मावळला नाही..३
ओंजळीत जपल्या..
फुलांच्या त्या माळा  ,
मोगऱ्याचा तो सुगंध..
विसरायचा नाही..४
काळाने ओंजळीला..
थरकाप दिला जरी तो 
धर हात घट्ट हातात..
घाबरायचे नाही ..५
प्रेमाच्या ओंजळीचे ..
हेमंत सांगे मर्म 
याचक बनून कुणाचे ..
प्रेम मिळत नाही..६

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: व्यवहार कौशल्य शिक्षणाचे माझे गुरुवर्य
Next: खुर्ची
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.