नागपूरचा इतिहास भोसले राजघराणे ३० जुलै २०२६
नागपूरकर भोसले
महाराज जानोजीराजे भोसले यांना ३० मार्च इ.स.१८६० रोजी इंग्रज हुकमतीने राजा बहादुर हि पद्वी व सनद देऊन देऊर प्रांताचे वतंन जे ३०० वर्षांपासून भोसले राजघराण्याकडे होते ते कायम केले. तसेच राजघराण्यांचे १२५ वर्षांपासून असलेल्या विदर्भ प्रांत व नागपूर प्रांतच्या वतनास इंग्रज हुकमतीने मान्यता दिली.या सनंदीने वरील प्रांताचे एकूण ५८००० वार्षिक उत्पन्न महाराज जानोजीराजे-२ यांना प्राप्त झाले.इंग्रज हुकमतीने महाराज जानोजीराजांना १ लक्ष ५ हजार रूपये वार्षिक वेतन दिले मात्र नागपूर राज्याचे वार्षिक राजस्व इंग्रजी चलनात ४०००००० पाउंन्ड होते! महाराज जानोजीराजे विद्या विभुषित होते. त्यांना जनमानसात फार मानाचे स्थान होते. महाराज जानोजीराजे दुसरे यांचे ५ डिसेंबर इ.स.१८८१ रोजी निधन झाले. महाराज जानोजीराजे यांचेनंतर नागपूरकर भोसले राजघराणे दोन पातीत विभागले गेले.महाराज रघुजीराजे -चैाथे यांची थोरली पाती व राजे लक्ष्मणराव यांची धाकली पाती!
राजे लक्ष्मणंराव यांना राजे प्रतापसिहं, राजे राजारामसिहं, राजे विजयसिहं व राजे तेजसिहं असे चैाघे पुत्र होते. इ.स.१९६२ मध्ये राजे राजारामसिहं यांचे पुत्र दिलीपसिहं यांना छत्रपती शहाजीराजे यांनी दत्तक घेऊन शाहुराजे असे त्यांचे नामकरण केले. महाराज रघुजीराजे चैाथे यांना फतेहसिंहराव व राजे जयसिहंराव असे दोघे पुत्र होते.
सध्या महाराज रघुजीराजे पंचम आणी मुधोजीराजे चैाथे व राजे जयसिंहराव नागपूरकर भोसले घरण्याच्या थोरल्या पातीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महाराज रघुजीराजे पंचम आणी मुधोजीराजे चैाथे हे महाराज फतेहसिंहराव यांचे पौत्र आणी महाराज अजितसिंहराव यांचे पुत्र होत.