कथा
योग्य वेळी, योग्य निर्णय आणि योग्य पर्याय………..
बरेचदा आपण आपल्या जवळ असलेल्या संसाधनांचा योग्य उपयोगासाठी पर्याय निवडतांना थोडा भावनिक थोडा व्यावहारीक पर्याय विचार केला तर तो योग्य ठरतो. उदाहरणार्थ महाभारतातील एक निर्णय आणि त्या मागील निवडणुकीत झालेल्या त्रुटी, पूर्ण संपवून घेण्यासारखे आहे. आणि ती कश्यामुळे झाल्या ह्याचे विवेचन करू या.
१. महाभारताचे युद्ध आता अटळ झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सर्व शांतीचे पर्याय विचार करून झाले होते. दोन्ही बाजूचे सैन्य एकमेका समोर उभे असून समोरच्याला हरवणे हाच विचार होता. दुर्योधन ह्याने सेनापती निवडण्यासाठी सभा घेतली. ह्यात भीष्मपिता, आचार्य द्रोण, कर्ण, अश्वत्थामा आणि मामा शकुनी होते. आता कोणाला सेनापती निवडायचे हे पर्याय विचारधीन होते. पण नेहमी प्रमाणे दुर्योधन मामा शकुनी चे ऐकणार हे पक्के होते. सर्वात अनुभवी, हस्तिनापुर शी एकनिष्ठ (आताच्या व्यतिरेखे प्रमाणे सांगायचे झाल्यास कट्टपा होते), सर्व शत्र संपन्न असे भीष्मपिता. आणि एक बाजू त्यांची कमजोर होती ती म्हणजे जे सर्व गांधारी पुत्र तसेच सर्व कुंती पुत्र ही प्रिय होते. तिथे त्यांच्यावर प्रहार करताना ते थोडे भावुक होणार. तसेच गुरु द्रोणाचार्य यांच्या बाबतीतही होते. कर्ण हा कुंती पुत्र होता तसेच त्याने कुंती वचन दिले होते की तिचे ५ पुत्र जिवंत राहणारच एक तर अर्जुन किंवा तो स्वतः. त्यामुळे इथे सुद्धा भावनिक दृष्ट्या एक बाजू कमकुवत होतीच. आता राहिला होता अश्वत्थामा. ह्याचे कुंती पुत्राशी तसा काही भावनिक स्पर्श नव्हता. आणि ते गुरुद्रोनाचार्यांचा पुत्र त्यामुळे सर्व शत्र अस्त्र संपन्न होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चिरंजीवी आहे(आहे या साठी की अजून जिवंत आहेत).
पण मामा शकुनी हे कोणत्या कारणाने इथे आहे हे दुर्योधनाला समजलेच नाही. त्यामुळे त्यांनी भीष्मपिता यांना पाठिंबा देऊन सेनापती बनविण्याचे सुचविले नव्हे सांगीतले. (शकुनी मामा कोण आणि इंद्रप्रस्थ मध्ये कशासाठी आलेत हा वेगळा विषय आहे पुन्हा कधी या वर बोलू)
असेच सर्व निर्णय दुर्योधनाने घेतले, भीष्मपिता हे शिखंडी च्या हातून बाणाच्या शय्येवर, द्रोणाचार्य दृष्टधूम च्या हातून बळी चढले, कर्ण त्याच्या शापामुळे अर्जुनाच्या हस्ते मारल्या गेला. ह्या सर्वांच्या पूर्वीच्या कर्म आता समोर येऊन ते युद्धातून बाहेर पडले. पण असे काही अश्वत्थामा च्या बाबतीत नाही. पण आत्ता त्याला सेनापती बनविले. आता पर्यंत अर्ध्यापेक्षा सैन्य बळी चढले होते.
कारण पर्याय योग्य असून सुद्धा सर्व बाजूचा विचार न करता एकामागून एक सेनापती निवडून घेतले. सर्व बाजूचा विचार करण्यासाठी आपण कोणाच्या तरी(मामा शकुनी) आहारी/ प्रभावाखाली निर्णय घेत होतो हे कळण्याआधी सर्व संपून गेले होते..
म्हणुन कुठेही निर्णायक पर्याय निवडतांना सर्व बाजूने विचार करा. निर्णय घेण्यासाठी असणारे उपलब्ध पर्याय ह्याचा जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू. तोलून मापून पर्याय निवडा.