Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

याला जीवन ऐसे नाव!

हेमंत नाईक जानेवारी 18, 2026
1768726703753.jpg

मुलाच्या घराजवळ असलेल्या ऑकलंड येथील डोळ्याचे पारण फेडणाऱ्या तमाकी नदीकाठी क्षितिजावर एकटा मावळणारा हळूहळू निस्तेज होत जाणारा सूर्य पाहतो आहे…आणि मी पण आज एकटाच नदीकाठी हिरवळीत असलेल्या बाकावर बसलो आहे थोड्या अंतरावर एक चायनीज बॅगपायपर या वाद्याने  सुंदर धून वाजवत असताना  माझे मन मात्र मागे भूतकाळात रेंगाळते आहे.जीवनाच्या वळणदार, उंच सखल वाटेवर खूप चालून आलो असलो तरी सर्व काही अगदी कालच घडल्यासारखं वाटतय सार!!

      ते रम्य बालपण..
      मामाच्या गावी झुकझुक गाडीतून जातांना येणारी मज्जा..
      शाळेचा तो पाहिला दिवस..
      शाळेतील निरोप समारंभ..
      कॉलेजातील सच्ची मैत्री..
      व्यवसाय नोकरीत यशस्वी
होण्याची धडपड..
      आणि
      मग आमच्या दोघांचा गृहस्थाश्रमात एकत्र प्रवेश..
      वडील म्हणून मुलाना बिनधास्त उडण शिकवण..
      त्यांची सातासमुद्रापार उंच भरारी पाहून मनातल्या मनात खुश होणारा मी ,आता आजोबा या गोड नव्या नात्यात केव्हा पोहोचलो, हेच कळले नाही.
      आयुष्यात  आता हे झालं की संपलं..असं प्रत्येक वेळी वाटत खरं..पण प्रत्येक वळणावर नविन क्षितिज समोर दिसते आणि त्यात गुंतण सुरूच असत. अगदी शेवटापर्यत!
     निवृत्तीनंतर ऑफिसमध्ये गेलो तर तुमची जागा कुणी दुसऱ्याने घेतली असते धंदयातही नकळत तुम्ही रिप्लेस होत असतात.  ‘Change is the life!” हे जाणूनहीअगदी सहस्त्रचंद्र दर्शन झालं तरी जीवनाचा मोह सहजासहजी सुटत नाही.
      बहुतेक सर्वजण जीवनाला गृहीत धरत असतात इथं पुढच्या क्षणाची गॅरंटी नसते  आणि अमरपट्टा घेऊन  आल्यासारखे सर्व वागत असतो. भांडण करायला तर क्षुल्लक कारणही पुरते.
     ऑफिसमध्ये गरज असते म्हणून विचित्र स्वभावाच्या खडूस बॉसशी जुळवून, “हा..हा..हि..ही..हू..हू..” करत खिदळणारे, घरी मात्र सख्ख्या नात्याशी, जन्मदात्यांशी जुळवून घेऊ शकत नाही. हे जीवनाच कटूसत्य अनेक वेळा दिसते. कदाचित जीवन किती छोटे आहे… याची जाणीव नसते त्यावेळी. ज्यावर त्यांना अभिमान वाटतो ते तारुण्य  कधी न कधी ओसरणार याची जाणीव असली पाहिजे. उगवणारा सूर्य मध्यान्हाला काही काळच असतो मग मावळतीचा प्रवास नक्की सुरु होतो.
     अगदी उच्च पदावर विराजमान असले तरी त्या पदाची त्याची साथ सदाकरिता  नसते.. अगदी जीवनाचे तसच असत!! जीवन आणि मरण यात अगदी एका श्वासाच अंतर असताना माणूस बऱ्याच वेळा स्वार्थाने अंध होऊन वागत असतो.
     कुणाला आपल्या संपत्तीचा तर कुणाला बुद्धीचा, आपल्या प्रसिद्धीचा, लोकप्रियतेचा, किंवा रूपाचाही गर्व असतो आणि त्यामुळे नकळत अहंकार बाळगून असतो पण शेवटी हे सर्व इथेच राहून जाते याची जाणीव फक्त्त शेवटास होते. जमिनीवर येतांना खाली मूठ बंद करून आलेला, आयुष्यभर कमवण्यासाठी धावधाव धावतो आणि जाताना ती मूठ देखील खुली ठेवून जावं लागणार आहे हे मर्त्य जीवनाच सत्य आहे. गेलेल्याच्या परिवाराच्या शोकास आवर घालण्यासाठी, आणि जीवनाची नश्वरता सांगण्यासाठी “राम नाम सत्य हैं..बाकी सब गत्य हैं l ” हा मंत्रही अंतिम यात्रेत म्हणतात.
      अंत्ययात्रेत स्मशानात गेल्यावर सर्व इथंच सोडून जायचे आहे या भावनेने सर्वांनाच क्षणिक स्मशान वैराग्यही येते पण तेथून परत घरी आल्यावर लागलीच या जीवनाच्या मोहाच्या मायाजालात माणूस परत गुंततो… तो त्याच्या स्वतःच्या अखेरपर्यंत!!
     आपल्या मर्त्य जीवनावर प्रकाश पाडणारी आणि अहंकार नको हे  जीवनाचे सत्य सांगणाऱ्या या ओळी लिहिल्यात.
“तेजस्वी उगवता सूर्य..
निस्तेज होऊन मावळणार!!”
_तारुण्यावर नका करू गर्व_
_अंत नक्कीच त्याचा जाण_
_तेजस्वी उगवता तो सूर्य_
_निस्तेज होऊन मावळणार.. १_
_येथे एक तू प्रवासी_
_चार दिवसाचा पाहुणा.._
_जाण यांची ठेव नित्य_
_जीवन क्षणिक जगताना..२_
_ना जमीन..ना संपत्ती_
_ना साथीला जोडीदार_
_रिकामाच आला तू रे_
_अगदी तसाच तू जाणार.. ३_
_जाणुनी हे सर्व काही_
_अजाण का तू बनतोस_
_मर्त्य खरे हे जीवन_
_अमर का तू समजतोस?.. ४_
_मिळते ते नक्की जाते_
_त्रिवार हे सत्य आहे.._
_प्रिय ते ही दुरावेल_
_मन घट्ट करुनी जाण..५_
_मिटणाऱ्या जीवनाचा_
_का तुला उगा गर्व.._
_राजा जरी इथे कोणी_
_अश्रू तो ही ढाळणार..६_
_गुंतले इथे सर्वंसारे_
_चिंतेच्या दाट गुंत्यात.._
_जीवनी शेवटपर्यंत_
_गुंत्यातच राहणार..७_
_समजण्याची ही संधी_
_नाही ती परत येणार.._
_गैरसमजात झोपलेले_
_नक्की धोका खाणार..८_
_मृत्यू कधी ना येईल_
_हा विचार आहे खोटा.._
_कुणाचीहीं नाही मात्र_
_मृत्यू पासुनी सुटका..९_
_श्वास शेवटचा जाता_
_नाते प्रिय सर्वं तुटणार.._
_आप्त मित्र मुलं पत्नी_
_सारे दूर दूर जाणार..१०_
_पुत्र मित्र आप्त फक्त्त_
_स्मशानी साथ येणार.._
_एकट्याचा प्रवास मात्र_
_इथूनच नक्की सुरु होणार..११_
_चितेवर तुला झोपवून_
_उरी जड लाकडे रचणार.._
_पुन्हा न दिसण्यासाठी_
_आप्त तुला झाकणार..१२_
_नाव तुझे ते मागे गेले_
_विसरले तुझे आप्तमित्र .._
_किती सुंदर नाव तुझे ते_
_तुला डेड बॉडी म्हणणार..१३_
_अग्निडाग  देऊनी त्वरेने_
_चिता उंच उंच भडकणार.._
_स्मृति सर्वं साऱ्या तुझ्या_
_बेचिराख होऊन जाणार..१४_
_ओमशांतीचा शांतिमंत्र_
_ओठी सर्वं पुटपुटणार.._
_लगबगिनेच सर्वं परत_
_दिनकार्या ते लागणार.१५._
_मुठ बांधून जगती आला_
_खुल्या हाताने तू जाणार.._
_भौतिक संचित तू रे केले_
_दुसऱ्यांसाठी ते राहणार ..१६_
_जे पुण्यकर्म केले तू रे_
_तेच साथीला येणार .._
_जन्मी या जरी ना मिळाले_
_फळ नक्की ते मिळणार .१७_.
_सुख दुःख आहे ते एक_
_सांगे गीतेत श्री भगवंत.._
_जशी करणी तशी भरणी_
_तसा तुला मिळेल लोक..१८_
_वाग जीवनी निर्मळतेने_
_दुखावू नको तू कुणास.._
_मोक्षप्राप्त नक्की  तुलारे_
_स्वर्गलोकी तू स्थिरावणार..१९_
_तारुण्यावर नका करू गर्व_
_अंत नक्कीच त्याचा जाण_
_तेजस्वी उगवता तो सूर्य_
_निस्तेज होऊन मावळणार.. २०_
       टीप : मूळ कल्पना अजीज नाझा  यांची गायलेली जीवनसत्य सांगणारी अर्थपूर्ण कव्वाली “चढता सुरज धीर धीरे ढलताही जायेगा ” यावर आधारीत आहे..
..✍️हेमंत नाईक

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Continue Reading

Previous: वटवृक्ष: एक स्मृतिगंध
Next: बुंद से गयी वो …
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.