Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

का आरशास..उगा मी टाळतो!!

हेमंत नाईक जानेवारी 22, 2026
1769036713787.jpg
का आरशास
उगा मी टाळतो!!
२२. ०१. २०२६
✍️हेमंत नाईक
खरं तर आज वेगळाच विषय घेणार होतो लिहीण्यासाठी पण आज आरशावरचे दोन सुंदर लेख वाचण्यात आले आणि मग माझा विचार बदलला.या संदर्भात आरशाची माझी पण एक आठवण लिहितो आहे.
कॉलेज व शाळेतील मित्रांच्या वाढदिवशी त्यांच्यावर त्याचे स्वभाववैशिष्ठ हेरून त्यांचेवर कवितेततून शुभेच्छा देण्याची सवय नकळत मला लागली होती.एकावर कविता केली दुसऱ्या मित्रावर नाही केली तर  चुकीचे ठरेलं या भावनेने जवळपास  सर्वावर चार पाच कडव्यातून त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत होतो. अचूक सर्वांनाच पटेल असे त्यांच्या गुणांचे वर्णन असल्याने सर्वांनाच आवडत होत्या त्या. बहुतेक सर्वांनी त्या जपून ठेवल्या असतील.
 ९ ऑगस्टला जन्म झाल्याने या क्रांतिदिनी माझा वाढदिवस,शालेय मित्र घरी येऊन साजरा करतात.  त्या दिवशी माझ्या सरकाऱी खात्यात मुख्य अभियंता असलेल्या एका मित्राने मला मोबाईलवर  वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना,
” तू सर्वावर लिहितो तुझ्यावरहीं लिहून पाठव. तू तुला कसा दिसतो हे आम्हालाही समजू दे.. वाटलसं तर आरशासमोर उभा रहा आणि लिही. तू तुझ्याबद्दल काय लिहीतो हे जाणून घेण्यास आम्हीही उत्सुक आहोत.”
असा संदेशहीं पाठवला होता.
मी क्षणभर आरशात खरोखरच स्वतःला बघून आलो आणि उत्तर लिहिण्यासाठी मोबाईलवर माझी सराईतपणे बोटे फिरू लागली.
” प्रिय श्रीकृष्णा,
सप्रेम नमस्कार,
तुझ्या शुभेच्छा प्रेमपूर्वक स्विकारतो..माझ्यासाठी त्या अनमोल आहेत.
🙏🙏🌹🌹🙏🙏
तू आरशात बघून स्वतःवर लिही असे म्हणलं खरं..आणि खरंच सांगतो काहीतरी लिहीण्यासाठी मला बीज मिळाले.
आरशाची ओळख अगदी लहानपणी झाली असली तरी बालपणी दुसऱ्याच्या डोळ्यावर सूर्याचा कवडसा चमकावणे असा खोडकरपणा मीहीं केला आहे.
तीन आरशांचा ६० डिग्री कोनात चिकटवून केलेला कॅलिडोस्कोपमध्ये बांगडयंच्या तुकड्यानी बनलेल्या अनंत रंगीत रचना बघत बघत बालपण वेगात गेले.
कॅलिडोस्कोप कांचेच रंगीत तुकडे तेच नेमके जरी असले तरी रचना मात्र खूप वेगवेगळ्या होतात एकदा झालेली परत तशीच निर्माण करणेहीं कठीण जाते.
सूर्यग्रहणाच्यावेळी आरशावर मधोमध गोल कापलेला कागद चिकटवून सूर्य ग्रहणाचे प्रतिबिंब भिंतीतीवर अनुभवणे इत्यादी करता करता तारुण्यसुलभ भावनेने कॉलेजला मात्र स्वतःला नीट ठेवण्यासाठी आरशाचा बऱ्यापैकी वापर करू लागलो. कधी न दिसणारे क्रिम, पावडर, सेंट आदीचा वावरहीं होता आरशाच्या जवळ तेव्हा. नंतर कामाच्या गडबडीत पुनः हळूहळू त्याचा संबंध हळूहळू कमी होत गेला होता. विसरलोच होतो जणू त्याला! अनेक प्रश्न सोडवताना स्वतः साठी वेळ द्यायचे विसरून जातो.
_खरच, आपण आरशात बघायला तयार असतो का?_
“वेळ नसल्यामुळे.. की खरं रूप आरसा दाखवतो म्हणून..” असे विचारचक्र मनात सुरु झाले आहे.
_बिलोरी आरसा आपलं बदलणार खरं स्वरूप दाखवत असतो तर अंतर्मनाचा आरसा केलेल्या चुका आणि घोडचुका..शब्दाच्या बाणाने उगीचच इतरांना केलेल्या जखमा.. तुम्ही किती स्वार्थी आहात याचीही जाणीव करून देत असतो. त्यामुळे नकळत आरसा बघणं आपण टाळत असतो._
आज मात्र आरशात बघून जे मला वाटल ते प्रामाणिकपणे लिहीतो आहे,
बिलोरी आरसा
नित्य खरं तेच बोलतो..
दोष दुर्लक्षण्यासाठी
का उगा मी टाळतो!!
अंतर्मनाचा आरसा
दिसें तो विसरता स्वार्थाला ..
दोष माझे अनेक
तो लागलीच सांगतो..
का त्याला मी
उगा टाळतो!!
पुरे कर लिहिणे आता
मित्र म्हणून मित्र झेलतो
व्यसनाधीन तू लिहिण्याचा
थांब थोडं  सांगतो
अतिरेक वाईट गुणांचाही
मर्म तो मला सांगतो
का आरशास मी
उगा टाळतो!!
स्वतःवर लिहिण्यासाठी
आरशात पाहिले खूप वर्षांनी
ओळख माझी पटेना
काळ सरला गेला काही
बदल हे सत्य.. ते
स्विकार सांगतो
का आरशास मी
उगा टाळतो!!
केसानी रजा घेतली
चंद्र मागे आला डोई
मन मात्र अजून हिरवे
मैत्रीने  खरी तरुणाई
जप ती , तो फर्मावतो
का आरशास मी
उगा टाळतो!!
गुण आरशात कमी ते
दोषाची यादी मोठी
सुधारण्या तयांना
जीवनभराची कसोटी
प्रयत्न ते चालू ठेवतो..
का आरशास मी
उगा टाळतो!!
पूर्णत्व मिळावयाला
जीवनभर धावतो
अपूर्णता म्हणजे जीवन
अर्थ आरसा सांगतो
कळून अजाण बनतो..
का आरशास मी
उगा टाळतो!!
मित्राच्या आग्रहास्तव
बघितले मी आरशात
जे वाटले खुशाल
उतरवले कवनात
बिघडणे सुधारणे
चालू मी ठेवतो
का आरशास मी
उगा टाळतो!!
🙏🙏🙏
.. हेमंत

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Continue Reading

Previous: भाषाशुद्धी : एक विचार
Next: दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी – सूर्योदय
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.