खिडकीतले आकाश
खिडकीतले आकाश ही कल्पनाच मुळी संकुचित असल्याचा आभास निर्माण करते.परंतु तसं नसून ती अमर्याद पण आहे.हे प्रतीकात्मक आहे.खिडकीच्या चौकटीतून दिसणारे आकाश मानवी मर्यादेचे आणि निसर्गाच्या अथांगतेचे प्रतीक आहे.
खिडकी आपल्याला आकाशाचा एक छोटासा तुकडा दाखवते.जो आपल्या घरातील आयुष्यातील बंदिस्तपणाची जाणीव करून देत असतो.परंतु हेच आकाश आपल्याला बदलते
ऋतू,ढगांचे रंग ,पावसाची सर आणि चांदण्या रात्रीची सुखद जाणीव पण करून देत असतं.खिडकीतले आकाश ही कल्पना मनाला शांत करणारी तर कधी स्वप्नांना जवळ करणारी
त्याचप्रमाणे संवेदनशील कवी मनाला कवितेच्या जवळ घेऊन जाणारी असते.ते अथांग आकाश आपल्या मर्यादित विश्वातून दिसणारे असीम स्वप्न असते.
लहानपणापासूनच खिडकीचे अप्रूप वाटते.मग ती घराची असो वा ट्रेनची अथवा बसची. बाहेरचे सौंदर्य टिपत केलेला प्रवास एक वेगळंच आत्मभान करवणारा असतो.खिडकीतून बाहेर पाहताना अनेक आंबटगोड स्मृती नजरेसमोर तरळत असतात.बाहेरची पळती झाडे पहाताना आपण नकळत भूतकाळात रमत असतो. खिडकी हे प्रत्येकाच्या मनाचे प्रतिबिंब पण असते.प्रत्येकाच्या मनात एक स्मृतींची खिडकी
असते.जेव्हा वाटेल तेव्हा तिचे दार खोलून आत शिरता येते आणि बाहेरही पडता येते.ती फक्त आपली वैयक्तिक असते.तिच्यात दूसरं कोणी डोकावून शकत नाही.तिच्यातून दिसतं ते फक्त आपल्या अंतरातील आकाश .
पहाटेच्या वेळी खिडकीच्या पडद्यातून येणारी सूर्याची कोवळी किरणे आणि हलका निळा रंग मनाला आल्हाद दायक आणि नवीन उमेद देणारा असतो.तेच दुपारचे कडक उन आजूबाजूची शांतता आणि एकांत दर्शवते.तर
सायंकाळी आकाशात उमलणा-या विविध रंगी छटा आणि सूर्यास्त होताना पहाणे हा एक सुखद अनुभव असतो.रात्रीचे आकाश कधी चांदण्यांनी भरलेले तर कधी पौर्णिमेचा चंद्र भावूक करून जातो.म्हणूनच कवी -कवयित्रींनी
त्याच्या वर अनेक कविता आणि गाणी लिहिली आहेत.वर्षाऋतूत मात्र आकाशाचे रूप वेगळेच भासते .काळे ढग ,ढगांचा गडगडाट,वीरांचा कडकडाट आणि खिडकीच्या काचेवरून ओघळणारे पावसाचे थेंब तरूणांच्या मनात अनेक भावना जागृत करतात.
तसं पहायला गेलं तर प्रत्येकाचा खिडकीतून आकाशाकडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो आणि तो वयानुसार बदलत पण असतो.
बालवयात खिडकीत बसून पाऊस पहायला आवडतो.रात्री लुकलुकणारे तारे पहायला एक वेगळीच गंमत वाटते.तेच तरुणपणी खिडकीतून आकाशाव्यतिरिक्त बरंच काही पहायला आवडतं.चंद्राकडे पहाताना तारुण्य सुलभ भावना मनात उचंबळून येतात.तर एखाद्या नवविवाहितेला प्रियकराची वाट पहात खिडकीत बसायला आवडतं.पत्येकाच आकाश हे वेगळंच असतं.' तिचे आकाश ' या संग्रहात
प्रवीण दवणे यांनी मानवी मनाचे आणि स्त्रीच्या भावविश्वाचे तरल चित्रण केले आहे .
खिडकी आणि स्त्री यांची सांगड घातली तर लक्षात येतं की प्राचीन काळापासून स्त्रियांचे विश्व म्हणजेच खिडकी कारण त्या काळात स्त्रियांना बाहेर जाण्याची परवानगी नसायची.
मग मुलांची नव-याची वाट त्या खिडकीतून डोकावत पहायच्या.
खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाची जीवनाशी सांगड घालू शकतो.सकाळचे आकाश
निरागस निष्पाप लहान मुलांसारखे.दुपारचे कडक उन जीवनातील चटके सहन करायला
लावणारे तर सायंकाळचे आकाश जीवनातील विविध छटा अनुभवून तृप्त झाल्यासारखे निवांत शांत.' या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या ' मुलाबाळांची आतुरतेने वाट पहायला लावणारे!
सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५.