चैत्र गौरी
चैत्र महिन्यातील शुद्ध तृतीयेला पार्वती शंकरासह माहेरी येते. तिचं हे माहेरपण अक्षय तृतीये पर्यंत असते. लेक माहेरी आली की तिच्या आईला लेकीसाठी, जावयासाठी काय करू आणि काय नको असं होऊन जातं. आणि ही तर साक्षात जगत जननी आदिमाया अन्नपूर्णा.तिच्या येण्याने सर्व वातावरण प्रसन्न
होतं .मग तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात. तिच्या येण्याप्रित्यर्थ घरोघरी उत्सव
साजरा केला जातो . त्याचप्रमाणे पूर्वी मुली मुलाबाळांच्या परीक्षा आटोपल्या की माहेरी यायच्या .तेवढंच त्यांना सासरच्या रामरगाड्यातून सुटका मिळायची.त्या आल्या की त्यांच्या कौतुकात, सरबराईत माहेर पणाचा एक महिना कसा निघून जायचा हे कळायचं देखील नाही. मग आई आपल्या लेकीचे कौतुक नातेवाईकांमध्ये करायला आसुसलेली असायची . त्या साठी ती हळदीकुंकवाचा कार्यक्रम करायची. सगळ्या आया, बाया, मुली, सुना यांना आमंत्रण जायचे. उंची मखमली गालिचे किंवा मोठ्या सतरंज्या अंथरल्या जायच्या. घरात एका कोप-यात मातीचा डोंगर बनवून त्यावर किल्ला बनवून आरास रचली जायची .त्यावर मातीचे सैनिक ,पशुपक्षी ,पाण्याचं तळं बनवण्यात बालगोपाळ मंडळी रमायची.मग तिथेच चैत्रगौरीला कधी झुल्यात तर कधी पाटावर किंवा चौरंगावर बसवण्यात येत असे. तिच्याभोवती सुंदर रांगोळी रेखाटली जायची फुलोरा टांगला जायचा. त्यात विविध प्रकारच्या पापड्या,चिरोटे, करंज्यांचा नैवेद्य दाखवला जायचा.बाहेर अंगण रांगोळ्यांनी भरून जायचे. खाण्याची तर रेलचेल असायची .चविष्ट अशी आंब्याची डाळ, फिकट हिरव्या रंगाचे साखर, मीठ, विलायची, बर्फ घालून केलेले आणि काचेच्या ग्लास मध्ये शिगोशीग भरलेले थंडगार फेसाळलेले कैरीचे आंबट – गोड पन्हे त्यावर केशर . मोगऱ्याचा भरगच्च गजरे, सानुल्या हाताच्या आकाराचे बत्तासे, तांबूस पिवळ्या रंगाची भिजवलेल्या चण्याची ओटीची रास, केवडा – खस -मोगरा अत्तराचा फाया अत्तरदाणीत ठेवला असायचा तर गुलाबदाणीत गुलाब जल भरले जायचे .कैरीचा आकार असलेल्या कुयरीत नवीन हळद कुंकू भरलं जायचं.सर्वत्र त्याचा घमघमाट पसरला असायचा. जरीकाठी साड्या घालून डोक्यावर भरगच्च मोग-याचा गजरा घालून बायका तयार व्हायच्या. बांगड्यांचा नाजूक किणकिणाट, नवविवाहितेला उखाण्याचा आग्रह केला जायचा .लहान मुलींचे खणाचे परकर पोलक घालून नटणं -मुरडणं .एक वेगळाच उत्साह असायचा.नंतर एकमेकींच्या आग्रहाने सर्व सुवासिनी उखाणे घ्यायच्या. हसण्या खिदळण्याच्या आवाजात सारा परिसर नादमय व्हायचा.कोणी गाणे म्हणायचे. एकूणच काय आनंदी आनंद. मग यथेच्छ डाळ करंजी पन्ह्याचा आस्वाद . त्यानंतर सुवासिनींना हळदीकुंकू लावून हातावर अत्तर लावायचे आणि मग गुलाबदाणीने गुलाबजलाचे तुषार अंगावर शिंपडले जायचे.हरभ-याने ओटी भरून बत्तासा दिला जायचा मग समारोपाची सुगंधी सुपारी.अहाहा!चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाचा थाटमाट काही वेगळाच असायचा या हळदीकुंकवाची एक विशेषता ही पण असते की हळदीकुंकू झाले की नंतर पुरूषांना पण डाळकरंजी खाण्यासाठी आमंत्रण दिले जाते. मग पानसुपारीचा कार्यक्रम होतो.तसं म्हणायला गेल तर चैत्राच हळदीकुंकू पण त्यात लहान थोरांपर्यंत सर्व भाग घ्यायचे.रस रंग गंध घेऊन आलेली चैत्रगौरी मनाला नवचैतन्य देऊन जाते.
चैत्रगौर म्हटली की मला माझ्या लहानपणीची आठवण येते.माझं माहेर धुळ्याचं.तिथे चैत्र महिन्यात एकवीरा देवीची जत्रा भरायची.एक महिना असायची.मग दर शनिवार रविवारी जत्रेत मोठी माणसं आम्हाला घेऊन जायची .तिथे रहाटपाळण्यात बसायचो.तो पाळणा उंचावर गेला की आपण सा-या जगाचे राजा असल्याची भावना मनात यायची .खाली पाहिले की सारे जग आपल्यासमोर थिटे भासायचे.बर्फाचा गोळा ,भेळ,ऊसाचा रस,कुल्फी एक ना अनेक गोष्टींची मागणी करत जत्रेत तासनतास फिरायचो.पाय दुखले की वडिलांच्या खांद्यावर बसून फिरायला एक आगळीच मजा यायची.प्रंचड गर्दी असायची.मोठ्यांचे हात घट्ट पकडून असायचो.हात सुटला तर हरवून जाण्याची भिती मनात सतत असायची. गंमत अशी की त्या गर्दीत दरवेळेस एखादं लहान मुल हरवायचच.मग एकच धावपळ व्हायची. कोणाला तरी ते लहान मुल सापडायचं .मग पोलीस कर्णावरून सूचना द्यायचे.मग त्याचे आईवडिल त्याला धपाटे मारायचे.मग त्या मुलाच रडणं आणि ते थांबावं म्हणून परत त्याला बर्फाचा गोळा दिला जायचा.
सर्व सावळा गोंधळ असायचा पण त्यातही मजा
यायची.आज चैत्रगौरीवर लिहीताना हे सर्व क्षणार्धात नजरेसमोर आल.पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीत मन रमलं.बालपण हे
रम्य असतं !
सौ ऐश्वर्या डगांवकर.पुणे
पूर्वाश्रमीची वर्षाराणी दाणे .धुळे
भ्रमणध्वनी -9329735575.