Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 2, 2026 1 minute read
0
gumohor-water
                 मानसिकता (लघुकथा)
   जेवता जेवता अचानक सारिका उठली. सारंगच्या मावशीने तिला विचारलं ,
” काय झालं मुली तू अचानक जेवण सोडून का उठली? तुझी तब्येत तर ठीक आहे ना ? तुला जेवण आवडलं नाही का ? दूसरं काही बनवू का?”सारिका कसनुसं हसत म्हणाली ,”नाही न..नको मला जास्त भूक नाही .जेवण चांगलं आहे.”अस म्हणत तिने थोडं रागानेच सारंगकडे
पाहिलं. सारिकाच्या चेह-यावरची अस्वस्थता सारंगच्या नजरेनं टिपली होती.सारिका एक डॉक्टर होती .सारंग तिच्या हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टर होता.अचानक इमर्जन्सी आल्याने त्या दोघांना एका छोट्याशा गावात यावं लागलं .त्याच गावात त्याची आत्या रहात होती.जातीनं ठाकूर असल्याने गावात तिच्या कुटुंबाला बराच मान होता.
            गावातील रोगी पहाता पहाता बराच वेळ झाला होता .सारंगने सारिकाला आत्याकडे जायचं का म्हणून विचारलं.सारिकाला संकोच वाटत होता. ती सारंगला म्हणाली ,” नको रे तू जाऊन ये. मी इकडेच कुठेतरी धाब्यावर जेऊन घेईन शिवाय आपल्याबरोबर ड्रायव्हर पण आहे.उगाच आत्याला कशाला त्रास?”
पण सारंगने तिला खूप आग्रह केला .खरंतर
तिलाही खूप भूक लागली होती .मग तिनंही जास्त आढेवेढे घेतले नाही. गावाबाहेर जरा एकाट रस्त्यावरच आत्यांचा बंगला होता.सारंगने चौकीदारला सांगून गाडी आत घेतली .    चौकीदारने आत निरोप पाठवला तसे आत्या आणि आत्योबा दोघंही बाहेर आले.सारंगला पाहताच आत्याला आनंद झाला.त्याने आत्या आत्योबांना वाकून नमस्कार केला.सारिकानेही हात जोडून नमस्कार केला.ते दोघंही आत दिवाणखान्यात गेले. दिवाणखाना चांगला प्रशस्त असून अनेक किंमती वस्तूंनी सजलेला होता.जमीनीवर अंथरलेला कश्मीरी गालिचा उच्च अभिरूची ची जाणीव करून देत होता.सारिकाला खूप संकोच वाटत होता.आत्याचंच घर असल्याने सारंग मात्र रिलॅक्स होता.त्यांच्या बरोबर आलेल्या ड्राईव्हरला मात्र चौकीदारने आत जाऊ दिलं नव्हतं. सारिकाच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.सारंगने आधीच फोन केल्यामुळे जेवणाची तयारी झाली होती.दोघंही जेवायला बसले.सारिकाने ड्रायव्हरला पण बोलावू का असं विचारल्यावर मात्र सारंग काहीच बोलला नाही. आत्याने त्याला इशा-याने आत बोलावलं.
आत्याचा हळू आवाज सारिकाच्या कानावर पडला .” तुला तर माहित आहे ना खालच्या जातीच्या लोकांना आपल्याकडं प्रवेश
नाही मग तू त्याला बंगल्याच्या आत कशाला आणलसं?बरं मी नोकराच्या हाती त्याचं जेवण पाठवते .जेवल्यानंतर त्याला थाळी धुवून बाहेरच ठेवायला सांग.”सारंग पडलेल्या चेह-यानं बाहेर आला.त्याच्या पाठोपाठ नोकराच्या हाती एल्युमिनीयमच्या थाळीत आत्यांनी बाहेर जेवण पाठवलं.सारिकाच्या मनात  सर्व पाहून उद्वेग दाटून आला.अजूनही ही मानसिकता .मग आपण तर…!
         सौ ऐश्वर्या डगांवकर.पुणे
            भ्रमणध्वनी- 9329736675.

 

लेखक

  • ऐश्वर्या डगांवकर

    पूर्वाश्रमी-वर्षाराणी दाणे
    शिक्षण-- शालेय आणि महाविद्यालयीन -धुळे
    बी. ए. ऑनर्स इंग्रजी विषयात
    पूना युनिव्हर्सिटी महाराष्ट्र.
    व्यवसाय --लेखिका /कवयित्री --मराठी हिंदी गृहिणी,कथाकथन,रसग्रहण
    भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५

Post navigation

Previous: अर्धा तास
Next: “विसरणं एक दैवी वरदान!!!”
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0

ताजे लेख

  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”
  • सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
Screenshot_20260406_113022_WhatsApp.jpg
  • ललित

“विसरणं एक दैवी वरदान!!!”

हेमंत नाईक एप्रिल 5, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.