Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

राममधुरिमा

हेमंत नाईक मार्च 29, 2026 1 minute read
0
Screenshot_20260329_193156_WhatsApp.jpg
सोमवार, ३०. ०३. २६
नुकताच रामनवमीचा राम जन्मोत्सव आपण सर्वांनी जोरदार साजरा केला असेल . अयोध्येतही राममंदिरात श्रीरामाची विशेष पूजा रामनवमीस झाली. या दिवशी बरोबर बारा वाजता श्री रामाच्या बालमूर्तीवर सूर्याचे किरण पडतात. अशी सुंदर रचना अयोद्धेतील मंदिराची केलो आहे. या सोहळ्यानिमित्त सर्वत्र जल्लोष आणि भक्तीपूर्ण वातावरण आहे. श्री राममंदिर उभारणीच्या काळात आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत हे आपले भाग्य आहे. 
“मधुरिमा” या शब्दाचा अर्थ गोडवा, मधुरता, मोहकता किंवा सौंदर्य असा होतो. हा शब्द संस्कृत भाषेतील ‘मधुर’ या शब्दापासून आला आहे, जो गोड, रसाळ अशा अर्थांसाठी वापरला जातो.रामकथा रसाळपणे सुंदर गेयता राखून पुरुषोत्तम लिखीत, “राममधुरिमा” या खंडकाव्यात   सहा खंडात लिहिली आहे.
*प्रभंजनासम चले लक्ष्मण*
*सौदामिनी जणू सीता सुलक्षण*
*बहुप्रतीक्षित प्रथमघनासम*
*येती रघुपती स्वयं दयाघन l*
*धारा झरती केव्हा रिमझिम*
*ऊन पसरते  मधूनच स्वर्णिम*
*निसर्ग दाखवी विपरीत विभ्रम*
*जीवनातल्या सुखदुःखासम l*
*ओहळातुनी जाता घननिळं*
*ओहळ झाला तो गंगाजळ*
*उद्धरल्या त्या सगळ्या वस्तू*
*जया स्पर्शीले प्रभुपदकमळ l*
. _*पुरुषोत्तम*_
(राममधुरिमातून)
श्री विष्णुच्या नऊ अवतारात पुरुषोत्तम म्हणून संबोधणारा आदर्शता म्हणजे काय हे सांगणारे,नित्य आचरणारे,सुराज्य प्रस्थापित करणारे दशरथपुत्र श्रीरामजी हे आम्हा सर्वांचे आराध्य दैवत. त्यांच्या पदकमलाने पावन झालेली आमच्या भारत देशाची माती अन आम्ही सर्वं भारतीय धन्य  आहोत.
पुरुषोत्तम श्रीरामाच्या जीवनाचे वर्णन गेय मराठी पद्यात करणाऱ्या रचनाकारचे नावही पुरुषोत्तम आहे आणि त्यानी लिहिलेले “राममधुरिमा” हे खंडकाव्य ही उत्तम!
सत्यवचनी राम सर्वांचे नित्य हृदयात वसतात, त्यांचे आपण मनोभावे नित्य पुजन करतो, पण आता या कलीयुगात निज स्वार्थाने त्यांची सत्याची आदर्शाची शिकवण सर्रास विसरतो आहोत प्रसंगी स्वतः दिलेल्या वचनांना तिलांजलीही दिली जात आहे .
रामराज्याची वर्णन करणाऱ्या या ओळी वचनास प्राणापेक्षा जास्त महत्व देतात.
*_”रघुकूल रीत सदा चल आई_* 
*_प्राण जाये पार वचन न जाई_’*
भारतदेशाची अस्मिता असणाऱ्या श्रीरामजीना अयोध्यानगरीत त्यांचे जन्मस्थांनी विराजमान केले गेले .आपल्या पिढीने हा सोहळा बघतला आहे खरोखर भाग्यवंत आहोत आपण.
रामनवमीस सजलेल्या  अयोद्धेस पाहून जगदीश खेबूडकरांनी बऱ्याच वर्षपूर्वी लिहिलेलं दत्ताजी डावजेकरांनी संगितबद्ध केलेले आणि आशाजींनी सुमधुर स्वरात गायिलेले हे मराठी गीत आठवते.
*_आज अयोध्या सजली सजली_*
_फुले प्रीतिची आनंदाच्या अश्रूंनी भिजली_
_श्रीरामाच्या पूजेसाठी_
_आज अयोध्या सजली सजली_
_गुढ्या पताका तोरण साजे_
_रूपे घेती अवयव माझे_
_अभंग नौबत कंठामधुनी दाही दिशा गाजली_
*_आज अयोध्या सजली सजली_*
राममंदिर उभारणीपासून तर अगदी राममंदिराच्या लोकार्पणापर्यत, अगदी आजही राजकारणी मंडळी त्याचा राजकारणाचा धर्म  इमानदारीत पालन करीत असले तरी श्रीरामाचे खरे भक्त मात्र त्याच्या भक्तीत नेहमीच तल्लीन आहेत.
आता राजकारणातील पक्ष सहजासहजी एकमेकांना श्रेय देत नाही आणि श्रेय मागूनही मिळत नाही हे जरी खरं असले तरी केलेलं चांगलं कार्य हे लपूनही राहू शकत नाही हे ही तेवढेच सत्य आहे.
आज “राममधुरीमा” या खंडकाव्याबद्दल लिहितो आहे. मराठीतून अत्यंत सोप्या सुंदर मराठी पद्यात लिहिलेल्या राममधुरिमा खंडकाव्याच्या ध्वनीमुद्रणाच्या उदघाटन सोहळ्यास जाण्याचा योग मला आला होत . सुमारे २४०० ओवीतून प्रभू श्रीरामाचे ओवीबद्ध जीवन दर्शन राममधुरिमात सहा खंडात केले आहे 
*राममधुरिमा* च्या ध्वनीनिमुद्रणाच्या लोकार्पण सोहळ्यास मंचावर बरीच मान्यवर मंडळी विराजमान होती औरंगाबाद येथे निराला बाजार येथील तापडिया सभागृहात नंतरचे दोन तास श्रीराम भक्तीत सर्वं भक्त या काव्याचा स्वरानंद घेत होते.
*विश्वजननी ज्याची माता*
*विश्वरूप जो ज्ञानदेवता*
*नमितो मी श्रीगणेश मंगल*
*सर्वां आधी  सिद्धी दाता l*
*सहाय्य होवो सह्यवासिनी*
*ममतामयी जी जीवनदायीनी*
*सदैव ठेवो कृपादृष्टी ती*
*माझ्यावर श्री असुरमर्दीनी* 
*सीमा माझ्या माहित मजला*
*म्हणून विनवितो देवी तुजला*
*तुझ्या प्रसादे मिळो पूर्णता*
*एकांतातील या रचनेला l*
*शब्दांच्या नुपूरांची रुणझुण*
*करीत रचना करू दे नर्तन*
*नर्तनातं त्या होवो मंगल*
*श्रीरामचे जीवन दर्शन l*
*शब्ददेव हो तुम्हास वंदन*
*मंजुळ होवो तुमची रुणझुण*
*प्रसन्न होवोनी कृपा करावी*
*करण्या वर्णन श्री रामायण l*
*वंदन करितो मी सर्वांना*
*जगातल्या चरचरांना*
*माझी अहंता जावो वितळून*
*रेखित असता रघूपती जीवना l*
*आदिकवी श्री वाल्मिकी मुनिवर*
*तुलसीदास श्री भक्त कविवर*
*या दोघांना वंदन करुनी*
*रामकथा मी रचितो मधूर l*
*जगात जे जे कविजन गाती*
*प्रभुची सगळी असे आरती*
*अंतरीच्या निरांजनी त्यांच्या*
*प्रेमावेदना ज्योती तेवती l*p
*_… पुरुषोत्तम_* 
परमेश्वराकडे केलेल्या या प्रार्थनेने सुरुवात असलेल्या राममधुरिमा हे खंडकाव्य लिहिताना देवी शारदा   पुरुषोत्तमांवर प्रसन्न झाली असल्याचे प्रत्यन्तर  राममधुरिमा वाचताना पदोपदी येते.
प्रसिद्धी पराडमुख असलेले माझे पच्यांशी वर्षांचे काका प्रा. पुरुषोत्तम सदाशिव नाईक ज्यांनी १९८४ पासून अनेक वर्ष रामभक्तीने आत्मसुखासाठी लिहिलेलं श्री रामकथेचे हे काव्य, जे नंतर जवळपास पंचवीस तिस वर्ष वहीत सुंदर अक्षरांत कपाटबंद होते फक्त्त आणि फक्त्त त्यांच्या पुरतं.त्या वहीची पानेही अगदी पिवळी पडली होती, २०१५ ला त्यांनी आठ वर्षांपूर्वी मुलींच्या आग्रहामुळे घरातल्या घरात आपल्या नातवाच्या सोबत रामनवमीस अत्यंत साधेपणाने “राममधुरिमा” हे खंडकाव्य काकांनी प्रकाशित केले होते.. त्याची हजार प्रतिची प्रथमवृत्ती आता संपत आली असली तरी राममधुरिमा या खंडकाव्यातील  संपूर्ण रामायणाचे रसाळ गेय वर्णन वाचून, औरंगाबाद येथील गायक कलाकार प्रभावित झाले, राममंदिर पूर्ण होत असताना,त्यांनी राममधुरिमा संगीतबद्ध करून,  सुरेल स्वरात त्याचे लोकार्पण केले. ही श्री प्रभूरामाचीच कृपा आहे. औरंगाबादच्या शास्त्रीय गायिका सौं.आरती पाटणकर अय्यगार, गायक श्री नितीन गायकवाड, संगीतकार श्री शैलेंद्र टिकारीया आणि त्यांचे सहकारी यांनी खूप मेहनत घेऊन सुंदर श्रवणीय अल्बम तयार केला आहे.
राम मधुरिमाच्या शेवटच्या चरणात पुरुषोत्तम हे सर्वावर प्रभूची कृपा असण्यासाठी लिहितात,
*”राममंधुरिमा हे रामायण*
*करतो प्रभुच्या चरणी अर्पण*
*प्रसन्न होवो प्रभू सकलावर*
*उजळो जग हे सगळे कणकण l”*
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर आणि श्री रामायण युगानेयुगे सर्वांना नित्य आदर्श व प्रेरणादायी ठरणार आहे.
*जय श्रीराम.*
🙏🙏🙏🙏
..हेमंत नाईक

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: पेशन्स लेख
Next: नोकरी की नातं? आधुनिक स्त्रीसमोरचा गुप्त संघर्ष
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0

ताजे लेख

  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”
  • सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
Screenshot_20260406_113022_WhatsApp.jpg
  • ललित

“विसरणं एक दैवी वरदान!!!”

हेमंत नाईक एप्रिल 5, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.