Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

माघार….

हेमंत नाईक जुलै 4, 2026 1 minute read
0
1001088235.jpg

व्हाट्सअपवर काल एक इंग्लिश कथा वाचण्यात आली, एव्हरेस्ट वर चढाई करणाऱ्या या चार मित्रांबरोबर अजून बरेच गिर्यारोहक होते. रात्री चढाई सुरु झाल्यावर दुपारी एकच्या आत सर्वांनी परत येणे गरजेचं होत. कारण दुपारी एक नंतर  वातावरणात खूप बदल होतो तेथे. त्याच्या लीडरचे तसें सर्वाना सक्त आदेश होते.

नियोजित वेळी चढई सुरु झाली रात्री बर्फ भुरभूर पडणे सुरु होते.. सकाळी नउ वाजता लक्षात आले की आता एक वाजेपर्यत एव्हरेस्ट शिखरावर जाऊन परत निघणे अशक्य आहे,हे बघून गियारोहकाबरोबर चार पैकी तिन मित्रांनी परतण्याचा निर्णय घेतला. तें माघारी निघाले. एक मित्र मात्र जिद्दी निघाला त्याने चढाई चालूच ठेवली.  शिखरावर थोडा उशिरा पोहचलो खरा पण न परतण्यासाठी. बर्फाच्या वादळात एव्हरेस्ट शिखरावर तो कायमचा विसावला.
शेवटी लेखक विचारतो यात कोण बरोबर  माघार घेणारे की शिखर जिंकणारा???
यावर दोन्ही बाजूनी बोलणारे असू शकतात . “जान है तो जहाँन है ” या उक्ती प्रमाणे अशावेळी माघार घेणे उचित ठरते. 
जेव्हा लढाईत जन्मभूमीच्या रक्षणासाठी लढाताना जीवाची परवा न करता सैनिक आपले बलिदान देतो माघार घेणे त्यांना माहित नसते.
वर्तमानात युक्रेन रशियात तीन वर्षाचे युद्ध कोणीच माघार घेत नसल्याने सामान्य जनतेचे हाल आणि युक्रेन सारख्या सुंदर देशाची वाताहात होत असल्याचे टीव्ही चॅनेल वर आपण पाहतो . असो.
कधी कधी माघारही ही यशस्वी ठरते. रणछोडदास म्हणून कृष्णाला गुजरातमध्ये ओळखले जातें त्या मागे पौराणिक कथाही असतील. जेथे साक्षात देवही माघार घेतो तर  माणसाने घेतली तर काय फरक पडतो. निर्णय घेणे आवश्यक आहे. माघार अपयशाची निशाणी नसते ती भविष्यातील यशाची नांदी असतें म्हणूनच तिला यशस्वी माघार असे आपण म्हणू शकतो. जास्त मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पाऊले मागे यावे लागते.
एक किस्सा आठवतो माझ्या मित्राचा मुलगा अभियांत्रिकीला दाखल झाला खरा पण गणिताचा आणि त्याचा छत्तीसचा आकडा असल्याने इंजिनिअरिंगचे गणित M1,M2,M3,M4 हे पार करणं त्याच्या समोर मोठे आव्हान होते. त्याने प्रामाणिकपणे प्रत्येक परीक्षेत लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी एकच वर्गात तीन वर्ष गेल्यावर त्याने माघार घेतली. नंतर बी फ़ार्म ला प्रवेश घेऊन आज मोठी एजन्सी चालवतोय त्याच्या क्षेत्रात तो शिखरावर आहे.त्याने अभियांत्रिकीतून घेतलेली माघार यशस्वी ठरली होती. कधी वाटाणारे अपयश त्याला नव्या यशाच्या क्षितिजाकडे नेत होते.
माघार केव्हा घ्यायची हे ज्याला कळतंय तो हुशारच म्हणावा लागेल. खूप चढ असेल तर क्षणिक विसावा घेऊन पुढे जावे आणि तरीही तें शक्य नसेल तर मार्ग बदलला तरी काही फरक पडत नाही… फक्त लढावू वृत्ती हवी.
हल्ली बरेच विदयार्थी अमेरिकेत खर्चिक उच्च शिक्षण घेऊन आवश्यक व्हिसा वा नोकरी न मिळाल्याने भारतात परत येताय, आईवडिलांनी केलेला मोठा खर्च आणि तेथे व्यतित केलेला बहुमूल्य वेळ,  त्यांना कदाचित वैफल्यग्रस्त बनवत असेलही, आज त्यांना ती आज मोठी माघार  वा सेट बॅक वाटतं असली तरी,त्यात त्यांचे आणि आपल्या भारत देशाचे उज्वल भविष्य दडले आहे हे मात्र नक्की.
माघार घेतली म्हणुनी 
नाव कुणाला ठेवू नये 
जमिनीवर  आलो जरी 
उडायचे विसरू नये..
प्रयत्नांनी म्हणता म्हणे 
वाळूतूनही तेल गळे 
वास्तव काय जाणुनी 
अविरत ते कार्य करे..
मोठा धोंडा मार्गामध्ये 
मार्ग बदलवा वेळेवर 
डोके आपटणे तेंथे व्यर्थ 
खुशाल घ्या यशस्वी माघार..
..हेमंत नाईक 
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: माझी सायकल- एक प्रेमकथा
Next: लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०३
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.