Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

लक्ष्मणराव आणि कुटुंब – ०८ मकरंद आणि लक्ष्मणरावांचा ‘सेन्सिबल संवाद’

वैभव शिरखेडकर जुलै 9, 2026
0
gumohor-water
बुधवारी दुपारी २.३० पर्यंत जावई मकरंद आणि मुलगी प्राजक्ता लक्ष्मणरावांकडे पोहचतात. सुमनबाई आणि  लक्ष्मणराव अगत्याने दोघांचे स्वागत करतात. बऱ्याच  गप्पा टप्पा झाल्यावर लक्ष्मणराव आणि त्यांचे जावई यांच्या  वेगळ्या गप्पा चालतात.

काय बाबा एकदम छान स्थळ आलेलं दिसतयं संजयसाठी.  

हो मकरंदराव अगदी छान, म्हणजे मला तर असं वाटतयं हे लग्न जुळणारचं

हो जुळायलाच पाहिजे बाबा, आम्हीच सोसायचं का? साळ्यानेही सोसू दे की.. मकरंदराव हसून म्हणतात.

तुमचं म्हणजे मकरंदराव आमच्यासारखच बुवा, अगदी हास्यकल्लोळ आणि एकाहून एक भारी पंच. एकदम छान सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचा.

पण बाबा, माझी बायको तर म्हणते की, मला काही सेन्सच नाही.

तुमच्या बायकोला म्हणा जावई बापू, जर मला सेन्स नाही तर मग बिना सेन्स चा ह्युमर करतो का ..

बाबा, तिला ते नाही समजणार, तेवढा सेन्स नाही तिला.. मकरंदरावांनी हे असे म्हटल्यावर, दोघेही जोरात हसायला लागले.

अहो, गुरुजी काय झालं एवढं हसायला, भांडे पडतील ना घरातले. तुमच्या हास्य कंपनाने. सुमनबाईंचा स्वयंपाकघरातून आवाज आला.

बाबा, आई पण ह्युमर करतात की  थोडाफार..

एवढ्या वर्षांची संगत आहे राव, तिला पण जमते थोडेफार. आणि तुमच्या बायकोला पण जमेल की सेन्स आल्यावर.

आणि बाबा तुमच्या मुलीला पण.. पुन्हा दोघे खदखदून हसतात.. आता प्राजक्ता थेट समोरच्या हॉल मध्ये येऊन बघते की  नेमके काय सुरु आहे ते.

काय हो ? काय झालं एकदम, बाबा काय जोक मारला ह्यांनी.

अरे प्राजु बेटा काही नाही, असेच जुन्या गोष्टी आठवून हसत होतो दोघे.

बाबा एवढे कसे हसत होते तुम्ही दोघे, भूकंप आला असता तर.. प्राजक्ता एकदम निरागसपणे म्हणते.

काय जावई, जमते की  हिला पण आणि तुम्ही म्हणता …

पुढे काय बाबा, माझ्याविषयी मकरंद काही म्हणत होते का..

नाही रे बेटा, ते फक्त एवढचं म्हणत होते की, प्राजक्ताला सगळं जमते पण तिला सेन्स ऑफ ह्युमर नाही.

हे ऐकल्याबरोबर मकरंदराव जोऱ्यात हसायला लागतात.

तेव्हा  प्राजक्ता म्हणते, नाही तर नाही. मला वाटते माझ्या प्रिय बाबांकडेच  तो आहे. एवढे म्हणून प्राजक्ता पुन्हा तिच्या कामात लागते.

इकडे मकरंदराव सासऱ्यांना म्हणतात, बाबा तुम्ही तर घाबरवले होते एकदम..  तसा माझ्या संगतीचा परिमाण झाला आहे हे त्या भूकंपवाल्या तिच्या वाक्यावरून दिसला मला.

दोघांच्या चर्चा सुरु असतांना संजय सुद्धा घरी येतो आणि संजयला बघताच या हो नवरदेवा असे म्हणून प्राजक्ता भावाला हाक मारते.

ओह प्राजे अजून जुळायचे आहे हो लग्न त्याचे, आधीच नवरदेवा नको.

आई, हे लग्न जुळणारचं! बाबा म्हणत होते.

त्यांना काय ते जरा अती उत्साही आहेत. जरा मुलगी बघून मग ठरवूया ना काय ते.

जा बोलावं तुझ्या लाडक्या बाबांना आणि मकरंदरावांना सुद्धा. या म्हणा जेवायला हसणे झाले असेल तर.

सुमनबाईंच्या मनातील तो मुलीच्या सावळेपणाचा विषय अजुनही कायम असतो.. त्या फक्त एकांगी विचार करत असतात. पण सगळे फार आग्रही असल्याने त्यांना पण गुरुवारच्या मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला जाणे भाग असते.

क्रमशः

लेखक

  • वैभव शिरखेडकर

    वैभव शिरखेडकर, नागपूर
    नागपूरला खासगी क्षेत्रात नौकरी. विविध विषयांवरचे पुस्तके वाचनाची आणि हिंदी, मराठी कविता लिखाणाची आवड. नागपूर विश्वविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी.

Post navigation

Previous: आनंद
Next: ‘तंबोरा’ एक जिवलग….१
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.