Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

नागपूरचा इतिहास – १०

राधा जोशी जुलै 10, 2026 1 minute read
0
gumohor-water

नागपूरचा इतिहास                             ११ जुलै २०२६

नागपूरकर भोसले

राजश्री मुधोजीराजे भोसले हे नागपूरकर भोसले राजवंशाचे मुळपुरूष होत.  राजश्री शहाजीराजांनी  इ.स.१६४२मध्ये मुधोजाराजे यांना  देऊर  प्रांताचे वतन दिले  व त्याचें बंधु रूपाजीराव यांची सातारा प्रांती भैरवगड येथे नेमणुक केली मुधोजाराजे यांना थोरले सबाजीराव पुरसोजीराव व धाकले बापुजीराव असे तिन पुत्र होते नंतर इ.स.१६४५ मध्ये शहाजीपुत्र शिवाजीराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्य स्थापनेची मुर्हूतमेढ रोवली

मग शिवाजीराजांनी आज्ञा  केली असता रूपाजीराव  मुधोजाराजे  सबाजीराव बापुजीराव व पुरसोजीराव हे  सैन्यासह स्वराज्याच्या सेवेशी रूजु झाहले.

पूढे इ.स.१६७४साली शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक सोहळा सपंन्न झाला.या समारंभात सबाजीराव, बापुजीराव व पुरसोजीराव देऊरकर भोसले बंधुनी हिरीरीने सहभाग केला होता.सबाजीराव व पुरसोजीराव देऊरकर भोसले  बंधुनी चुलते रूपाजीराव यांचे सोबत अनेक  मोहिमात सहभाग३घेऊन  स्वराज्य स्थापनेत मोलाची कामगिरी बजावली होती हे लक्षात ठेवून राज्याभिषेक सोहळया निमीत्त्य  खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी  सबाजीरावांना  मौजे राक्षसवाडी तर्फ रासिन देह व मौजे पिपंरी कोलेहर तर्फ कडेवली देह हि दोन गावं इनाम दिले! 

तसेच पुरसोजीराव व रूपाजीराव यांचे नाव स्वराज्याचे नांमाकीत सरदारांच्या यादीत सामिल झाले.

नंतर इ.स.१६८०साली छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.त्यावेळी युवराज शंभुजीराजे पन्हाळागडावर होते. तेव्हा महाराजांची उत्तरक्रिया भोसले कुळाच्या सबाजीराव भोसले यांनी केली. महाराजांचे मृत्यूची खबर समजताच युवराज शंभुराजे  रायगडावर  आले आणी राजगादीवर बसले याप्रसंगी परसोजीराव हे रायगडावर हजर होते. नंतर छत्रपती शंभुजीराजांचे आज्ञेनुसार पुरसोजीराव हे जमावासह यदुदेशात गेले तसचे त्याचें दोघे बंधु  बापुजी व सबाजी भैरवगडास जाऊन  राहीले. त्यांचे  चुलते रूपाजीराव  छत्रपती शंभुजी महारांजाचे लष्करात रूजू झाले.

पूढे सरदार पुरसोजीरावांनी इ.स.१६८९ मध्ये मोगलांनी बळकाविलेला स्वराज्याचा  विर्दभ प्रांत  जिकूंन घेतला !  छत्रपती राजाराम महाराज यांनी इ.स. १६९९ मध्ये  पराक्रमाकरता पुरसोजीरावांना सेना साहेब सुभा  हि पद्वी व जरीपटक्याचे मिरविण्याचा मान देऊन राजदरबारी बहुमान केला.त्यामूळे  सरदार पुरसोजीराव भोसले  यांना स्वराज्याच्या लष्कराच्या महत्वाचें स्थान प्राप्त झाले.

इ.स. १७०८ चे पहिल्या महिन्यात शाहुराजे मोठया समांरभाने राजगादीवर बसले! याप्रसंगी  छत्रपती शाहु महाराजांनी सेना साहेब सुभापद् पुरसोजींरावाकडे पूर्वीपासून होते ते कायम करून  राजेश्री पुरसोजीं भोसेल यांसी विर्दभ प्रांताची सनंद दिली या सनदीने छत्रपती शाहु महाराजांनी पुरसोजीराजे यांना विर्दभ प्रांताच्या८  महालांची देशमुखीचे वतन करून दिल्हे

१ गविलगड महाल सरकार ४६ परगणे

२ नरनाळा महाल सरकार ३७  परगणे

३ माहुरगड महाल सरकार १९  परगणे 

४ पवनार महाल सरकार ५ परगणे 

५ कळंब महाल सरकार १९ परगणे

६  माणिकागड महाल सरकार ८ परगणे

७ खेलडा सरकार महाल २१परगणे

८  बैतुलवाडी महाल सरकार ९ परगणे  

 याशिवाय शके १६२९  सनंद पुरसोजी भोसले सेना साहेब सुभा याचें नावे गविलगड महाल सरकार नरनाळा महाल सरकार  पवनार महाल सरकार माणिकागड महाल खेलडा महाल सरकार   तेलंगणा सरकार  एकूण सहा सरकार दर शेकडो नव रूपयें अकरा आंणे मोकासाचे दिल्हे

विदर्भ प्रांताची सनंद प्राप्त केल्यानंतर सेनासाहेब पुरसोजींराजे कुटुंबासह  भाम  मुक्कामी  घर करून राहीले.पण दक्षिणेत स्वराज्याचे कामागिरीवर असताना   कृष्णा-वेणा सगंमी मौजे खेडसा येथे सेना साहेब सुभा पुरसोजींराजे भोसले हे इ.स. १७०९ मध्ये मृत्यूस पावले. 

लेखक

  • राधा जोशी
    राधा जोशी

Post navigation

Previous: ‘तंबोरा’ एक जिवलग……५
Next: वृद्धाश्रम
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.