Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

कट्ट कड कट्ट!!

हेमंत नाईक जुलै 12, 2026 1 minute read
0
1001098370.jpg
          लेखाचे हे शीर्षक वाचून तुम्हाला कोडं पडलं असेल, टेलिग्राफ विभागाशी संबंध असलेल्यांना मात्र हे  गोड शब्द, त्यांच्या तारयंत्राची सांकेतिक भाषा होते, हल्ली मोबाईल च्या रोज होणाऱ्या उत्क्रांतीत कधी काळी तातडीने  संदेश देणाऱ्या तार विभाग बंद होऊन खूप वर्षे झालीत  तरी  आज आठवण म्हणून  तोच विषय घेऊन लिहितो. 
            कालच भुसावळ येथे रेल्वेसंग्राहलयात ठेवलेली टेलिग्राफ मशीन बघण्यात आली आणि मला लेखासाठी विषय मिळाला.
            पूर्वी तार आली की सर्वप्रथम काळजीच वाटायची काही अशुभ तर घडले नाही ना? उघडताना तणाव असायचा..
             नाही म्हणायला लग्नाला, “ब्लेसिंग टू न्यूली मॅरीड कपल.. ” किंवा    यशाचे अभिनंदन करण्याच्या तारा  येत असत.. किती शब्द त्यावर तारांचा खर्च अवलंबून असायचा.. त्यांची परत एक्सप्रेस आणि ओर्डीनरी हे दोन प्रकार होते..काही फिक्स्ड मजकूरच्या तारा ही असायच्यात त्यात फक्त्त तो ठराविक नंबर टाकला की त्या क्रमांकाचा मजकूर तार रूपाने पाठवाला जात असे.
               मला एस. ई.ला असताना माझा मित्र क्षितिशने पाठवलेली फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाल्याची, ती तार बहुदा माझ्या आयुष्यातील अखेरची तार..
               भुसावळ येथे रेल्वेचाही स्वतंत्र टेलिग्राफ विभाग होता त्यावेळी भुसावळच्या कोट्यातून आरक्षण न मिळाल्यास तारे मार्फत आधीच्या स्टेशनंहुंन  बर्थ आरक्षित करत असत. मित्राचे वडील याच विभागात कार्यरत असल्याने त्या ऑफिस मध्ये त्याच्या बरोबर बऱयाच वेळा  जाण्याचा योग आला. त्यावेळी या यंत्राचा कडकट्ट हा आवाज आणि ती सांकेतिक लिपी ऐकण्यात आली.
                 त्यावेळी एक पर्टीक्युलर ठेक्यात ते मशीन कट्ट कड कट्ट असे आवाज काढत समोर दूरवर तोच आवाज  येऊन त्या सांकेतिक लिपीचा अचूक इंटरप्रिटिशन करत असत. तेव्हा खुप आश्चर्य वाटत असे.
               संदेश वहनाचा इतिहास तसा खूप जुना आहे, अगदी खूप वर्षा पूर्वी घोडेस्वार संदेश घेऊन जात असे त्यास सांडणीस्वार म्हणायचे राज दरबारीं पाठवण्यात आलेल्या पत्रास खलिते हा शब्द रूढ झाला होता .. इतिहासात कबुतराच्या पायाला चिठ्या बांधून संदेश पोहचवले जात असल्याचीही नोंद आहे …
              मैने प्यार किया या सलमान भाग्यश्री च्या पहिल्या चित्रपटात त्यात चित्रित झालेले
“कबूतर जा जा जा,
कबूतर जा जा जा
पहले प्यार की पहली चिट्ठी
साजन को दे आ..” 
हे सुपरहिट झाले होते. या हिंदी गाण्याचीच कल्पना  घेऊन काहीतरी मराठीतून  लिहीत आहे.
प्रेमपत्र …
प्रेमाचा संदेश घेऊनी जा
कपोता प्रेमपत्र घेऊनी जा..
प्रेम गुपित मनातच दडले
समोर तू येता वाचा बसते 
कागदावर लेखणी उतरवे
शब्दरूपाने प्रेम अवतरते 
पंख फुटले आज प्रेमाला
प्रेमाचा संदेश घेऊनी जा
कपोता प्रेमपत्र घेऊनी जा..
होकाराची वाट तुजला 
नकार  माझा कधी नव्हता 
प्रेमाची माझी अबोल भाषा
नजरेतुनी तुला का कळेना
प्रेमकोडे हे सोडवण्या
प्रेमाचा संदेश घेऊनी जा
कपोता प्रेमपत्र घेऊनी जा..
प्रियेला प्रिय संदेश देण्या 
मेघ मिळाले कालिदासाला
माझ्यासाठी तू मेघ बनूनी
लवकर तू उडत उडत जा 
प्रेमाचा संदेश घेऊनी जा
कपोता प्रेमपत्र घेऊनी जा..
दुरावा जरी काही दिसांचा
भासतो कैक युगांयुगाएवढा
ऐलतिरी वाट पाहे एकटी 
पैलतिरी का तूझा निवारा
प्रियकराला बोलावण्या  
लवकर उडत तू जा 
कपोता प्रेमपत्र घेऊनी जा..
             अजूनही जोधपूरच्या एक राजवाड्यात अशा प्रशिक्षित कपोत(कबुतर)पक्षासाठी सुंदर कोरीव काम केलेले पिंजरे अजूनही जतन करून ठेवले आहेत.
              1830 च्या दशकात सॅम्युअल मोर्स नावाच्या अमेरिकन व्यक्तीने विविध अक्षरे दर्शविणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या लांब आणि लहान पल्सचा कोड वापरण्यासाठी डिझाइन केलेली टेलिग्राफ प्रणाली विकसित केली तेव्हा पहिली विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक टेलिग्राफ मशीन तयार करण्यात आली. कोड मोर्स कोड म्हणून ओळखला जाऊ लागला. संदेश पाठवण्यासाठी, ऑपरेटरने एक स्विच दाबला, सिग्नल पाठवला, ज्याने रिसीव्हिंग मशीनला वायरसह विद्युत प्रवाह पाठवला.
                1876 ​​मध्ये, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, एक स्कॉटिश डॉक्टर, एका नवीन प्रकारच्या टेलिग्राफवर काम करत असताना त्याने चुकून त्याच्या कपड्यांवर काहीतरी सांडले आणि त्याच्या सहाय्यकाला बोलावले, ज्याला त्याचा आवाज वायरवरून ऐकू आला. टेलीग्राफप्रमाणेच, टेलिफोन तारांमधून वाहणारी वीज वापरतो, परंतु तो कोडऐवजी ध्वनी पाठवतो. जेव्हा तुम्ही टेलिफोनवर बोलता, तेव्हा रिसीव्हर तुमचा आवाज विद्युत प्रवाहात बदलतो आणि नंतर दुसर्‍या टोकाला विद्युत प्रवाह परत आवाजात बदलतो. दूरध्वनीवरून दुतर्फा संभाषण करण्याची क्षमता.लोकांना जवळ आणते.आज तर सर्वच बाबतीत क्रांती झालेली दिसते 
तार संदेशाचे होते
एक कधी माध्यम..
काळाच्या ओघात 
विसरले त्यास जन ..
कट्ट कड कट्ट  ही 
गोड सांकेतिक भाषा.
जाणकार होते भाषेचे
अनेक या भारत देशा 
गरज हीच शोधाची 
असतें ती जनक..
गरज मात्र नसताना
शोध तो विफल..
साम्राज्य या शोधाचे 
कधी धरेवर होते..
नवशोध  लागता रे 
अस्तास सारे गेले..
गरज नसे ज्याची
ते नित्य नाश पावते..
ओढ रहस्याची तेथे 
मानवी मन धावते..
जाणुनी हे सर्वंकाही 
दिवस तुमचा क्षणिक ..
उद्या तिचं जागा घेई 
दुसरा सरस तो सबळ..
बदल हाच तो खरा
जीवनाचा असे मंत्र..
उत्क्रांती म्हणतात
याला जे जाणकार..
         आज तर संदेशवहनाच्या शास्त्राने अगदी कबुत्तरापासून ते व्हिडीओ कॉल पर्यत खुप प्रगती केली आहे आपण कधी समोरासमोर प्रत्यक्ष फोन वर बोलू शकू ही कधी न काळी अशक्य वाटणारी कल्पना… प्रत्यक्षात अनुभवण्याचे भाग्य आपल्या पिढीला मिळाले आहे.
                 पूर्वी जसे देव अंतर्धान पावून लगेच दूरवर प्रगट होत असल्याचे किस्से पुराणात ऐकले आहे…
                 तसें मॅटरचे ट्रान्सफर तरंगांद्वारे झाले तर ? हा एक वेडा विचार मनात लेख लिहीतांना उगाच मनात आला..
               जेव्हा पृथ्वी गोल आहे या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला तेव्हाही प्रथम  वेड्यात काढले आहे.
              *अशक्य वाटणारी कोणतीही गरजेची गोष्ट आणि त्या बद्दल वाटणारी जिज्ञासा ही शोधाची जननी आहे.*
              “बघूया,भविष्यात अजून काय बघायचे बाकी आहे ते  !!!”
✍️हेमंत नाईक
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: नागपूरचा इतिहास – १२
Next: देव बरें करूं……..२
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.