Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

त्यांचे संवाद : २

तुषार जोशी ऑगस्ट 20, 2025
smiling-couple
This entry is part 2 of 2 in the series त्यांचे संवाद

त्यांचे संवाद
  • त्यांचे संवाद – १
  • त्यांचे संवाद : २

(अविनाश)

ती : अहो, ऐकलं का ?
तो : हं, बोल काय म्हणतेयस ?
ती : बरेच दिवस झालेत, मंदीरात गेलो नाही आपण
तो : मग जावूया की आज
ती : आज काय विशेष ?
तो : वुमेन्स डे आहे ना आज ?
ती : चला, चावट कुठले. बर ठीक आहे, जावू या आज
तो : वा, काय सुंदर आहे हे शंकराचं मंदीर
ती : अहो अहो….बघा तर खर
तो : काय झालं ?
ती : बघा ना, फलका वर काय लिहीलय
तो : कुठे काय ?
ती : वाचून दाखवू ?
तो : हं
ती : “मंदीरात जाण्याचा रस्ता डावी कडून आहे, ज्या कुणाला वाचता येत नसेल त्यांनी समोरच्या दुकानात विचारावे”
तो : हा हा हा
ती : काय झालं हसायला ?
तो : काही नाही, चल, दर्शन घे लवकर, घरी जायचय लवकर
ती : (घरी आल्यावर) अहो पण हसलात कां ?
तो : असंच…चल जेवायला वाढ, भूक लागलीय
ती : अच्छा, आत्ता कळल कां हसलात ते
तो : सांग बघू ?
ती : फलकावर लिहीलं होत, ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी समोरच्या दुकानात विचारावे
तो : हो
ती : अहो पण दुकान बंद असेल तर ?

(श्वेता)

तो: आता मात्र मला रडू येतंय.
ती: का हो? एकदम?
तो: आपण किती मोठी चूक केलीय, आणि ती सुधारावी ह्या करिता आपण काहीच करू शकत नाही असं जेव्हा लक्षात येत तेव्हा रडूच येतं..
ती: असं का बोलताय? अशी कुठली चूक केली तुम्ही?
तो: काही नाही. जाऊ दे. भात वाढ.
ती: एकदम भात? अहो इतका काय मनाला लावून घेताय? नीट जेवा तरी!
तो: मनाला लावून घेऊन उपयोग काय? चूक तर झाली ना (पुटपुटतो) आणि ह्याची जाणीव पण महिला दिनी झाली…
ती: काय बोललात?
तो: कुठे काय?
ती: ह्म्म्म! आत्ता आलं लक्षात तुम्ही काय चूक केली ते…
तो: कमाल आहे? तुझ्या लक्षात आलं?
ती: हो तर! बायको आहे मी तुमची! चांगली ओळखते तुम्हाला..
तो: असं? सांग तरी काय चूक केली मी?
ती: काही नाही.. तुम्हाला वाचता येत असूनही तुम्ही दुकानदाराला विचारायला गेला असाल आणि नेमकं दुकान बंद असेल म्हणून तसेच घरी आला असाल कधीतरी… वेंधळे आहातच तुम्ही! बर झालं ना मी होते बरोबर आज?
तो: अगं…तू काय बोलतेयस….
ती: जाऊ देत हो! आता वाईट वाटून घेऊ नका..होतात चुका! ….मग ? पोळी घेताय ना?

(तुषार)

तो: हो बाई वाढ ती पोळीच आता, पोळी तरी मस्त करता येतेय ((लोकांकडे बघून मनात म्हटल्यासारखे).. हे आमचे नशीबच) ती करायला डोके लावावे लागत नाही हे किती छान आहे.
ती: अगबाई, आता डोक्याने लाटलेल्या पोळ्या पण असतात की काय?
तो:  (दोन्ही मुठी वळून, दात चावून) इ इ इ इ, देवा वाचव रे बाबा, महिला दिनाला तरी काही प्रकाश पाड इकडे
ती: कळतय मला बरं, ते मंदिरातले वाक्यावरून मी तुम्हाला चिडवले म्हणून तुम्ही वैताग करता आहात ना?
तो: नाही गं बाई, चल तुला सांगतोच समजावून, हे बघ ते मंदिरातले वाक्य आहे ना..
ती: त्याचे काय?
तो: तो ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी लिहिलेला विनोद आहे
ती: अहो एवढं कळतं म्हटलं मला
तो: काय म्हणतेस, तुला हे आधीच कळलं होतं?
ती: मग काय, डावीकडेच उभे असलेल्या कोणी वाचले तर तो रस्त्यावरच नाही का जायचा ते वाचून, दिशाभूल नुसती, त्यापेक्षा ते वाचता न येणाऱ्यासाठी तरी बरोबर लिहून ठेवयेल नाही?
तो: केविळवाणे डोळे करून… वाव हे तर मला पण सुचले नाही
ती: मग काही शिका, आणि माझ्यासारखे तुम्ही पण हारलिक्स घ्यायला लागाच रोज
तो: महिला दिनाला धन्य झालो बुवा
ती: पण काय हो किती दुष्ट असतात ना लोक, वाचता येते अश्या लोकांसाठी विनोद लिहिला आणि वाचता येत नाही त्या लोकांसाठी सरळ सरळ लिहून त्यांच्याशी दुष्टपणा नाही का केला त्यांनी, निरक्षर लोकांना काय विनोद अनुभवण्याचा हक्कच नाही काय?
तो: जाऊ दे. भात वाढ…

(८ मार्च २०१३)

त्यांचे संवाद

त्यांचे संवाद – १

Authors

  • तुषार जोशी
    तुषार जोशी

    तुषार जोशी पर्सिस्टंस्ट सिस्टिम्स कंपनीमधे चीफ आर्किटेक्ट पदावर कार्यरत आहेत.  ते मराठी कविता आणि ललित लेख लिखाण करतात.

  • श्वेता पेंडसे

    अभिनेता, लेखक, निवेदन, सूत्रसंचालक श्वेता पेंडसे यांचा नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मधे सक्रिय सहभाग आहे

Tags: संवाद प्रयोग

Continue Reading

Previous: त्यांचे संवाद – १
Next: सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा……
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

  • ललित

मधुरव- बोरू ते ब्लॉग

सुषमा ठाकूर मार्च 3, 2026
1000550629.jpg
  • ललित

अर्धा तास

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026
  • ललित

अक्षरयात्री

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026

ताजे लेख

  • मधुरव- बोरू ते ब्लॉग
  • अर्धा तास
  • अक्षरयात्री
  • वर्तुळ
  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

  • ललित

मधुरव- बोरू ते ब्लॉग

सुषमा ठाकूर मार्च 3, 2026
1000550629.jpg
  • ललित

अर्धा तास

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026
  • ललित

अक्षरयात्री

अपर्णा शेंबेकर मार्च 2, 2026
Screenshot_20260302_154909_WhatsApp.jpg
  • ललित

वर्तुळ

हेमंत नाईक मार्च 2, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.