Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

वर्तुळ

हेमंत नाईक मार्च 2, 2026 1 minute read
0
Screenshot_20260302_154909_WhatsApp.jpg
*वर्तुळ* 
✍️ हेमंत नाईक
लहानपणी शाळेत कंपासने जेव्हा कोऱ्या कागदावर पहिलं वर्तुळ काढलं तेव्हा त्याची दोन टोक जुळतानाचा आनंद अजूनही मला आठवतो आहे. आज तोच विषय घेऊन लिहितो आहे.
जस सूर्याच्या कक्षेत युगान युगे पृथ्वी गोलाकार फिरत आहे… वर्तुळाचा आणि जीवनाचा खूप निकटचा संबंध आहे.
सूर्य चंद्र तारे हे सर्वही गोलाकार आहेत
पावसाचे जमिनीवर पडून पाण्याचे पुरात वाहून जाऊन सागरास मिळणे आणि त्याची वाफ होऊन मेघाद्वारे परंत येणे हे जीवन चक्र परत परत अनुभवतो. 
पूर्वी जुनाट म्हणून हेटाळणाऱ्या फॅशन्स हल्ली लेटेस्ट  म्हणून पुन्हा डिमांड मध्ये  आहे.
राजकारणात कधीकाळी ३६ चा आकडा असणारे आज गळ्यात गळा घालून आहेत.बरं परत पुढे पुन्हा ते केव्हा काडी मोड घेतील याची शाश्वती नाही .
या व  खूप साऱ्या घडणाऱ्या गोष्टी चक्राकार आहेत परत परत घडणाऱ्या. अगदी आयुष्यातही बऱयाच वेळा हा अनुभव  येतो.सुख दुःख हे क्रमश:एकामागे एक नियमीत येत असतें.
पुनःरुपी जनन 
पुनःरूपी मरण 
असे जीवन मृत्युंचे देखील एक वर्तुळाकार चक्र आहे असे पुनर्जन्मात विश्वास ठेवणारे मानतात.
स्वतः गोल फिरून देवास नमन केल्यावर मंदिरात देवाभोंवती आपण वर्तुळाकार गोल प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.बारस्याच्या वेळेपासून पाळण्यात नाव   कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे म्हणून लहानपणीच गोलगोल फिरण्यांची ओळख होते. पुढे लग्न करताना एकमेकांना सातजन्म सात देण्यासाठी अग्निभोंवती जोडीदारासोबत घेतलली सप्तपदीही वर्तुळकारच. अगदी शेवटी  चितेभोंवती गोल फिरून मडके फोडण्यापर्यत या वर्तुळाची साथ असते.
भात्यातील बाण सुटला की सुटला तो परत येत नाही हे त्रिबाधित  सत्य असलं तरी जीवन मात्र बुमरॅग सारखं नित्य वर्तुळातच चालत.
पंचभूतापासून निर्माण झालेला मानवी देह हा शेवटी त्यातच विलीन होतो. 
म्हणूनच दुनिया गोल आहे असे आपण म्हणतो.
*वर्तुळ* 
_गोल किती सुंदर_
_वर्तुळ दिसें गोल.._
_चक्रामुळे गती रे_
_सांगे त्याचे मोल.._
_एका टिपक्यापासून_
_जेथे होते सुरवात.._
_तेथेच तयास अंत_ 
_तसाच जीवन प्रवास.._
_प्रश्न शोधतो उत्तर_
_उत्तरातून निर्मितो प्रश्न.._
_आम्ही खूप हा खेळतो_
_जीवनी गोल तोच खेळ.._
_दगड जर पडला_ 
_अथांग जलाशयात_
_वलंय ते जन्म घेई_
_गोल गोल वर्तुळाकार_
_अनुभवाच्या कक्षा_ 
_जणू वर्तुळाचे परीघ_
_परीघ कुणी ओलांडले_
_तर लागे नव्याचा शोध_
_चाकोरीबद्ध जीवन_
_जगणारे बहुसंख्य सारे.._
_चक्रव्युह ओलांडणारे_
_अभिमन्यू ते मोजके.._
_गोल वर्तुळाची आहे_
_तिचं तिचं रे कहाणी.._
_त्रिज्या त्याची रुंदवा_
_नाहीतर कंटाळवाणी.._
ही वर्तुळाची कहाणी  इथेच थांबवतो.
✍️ हेमंत नाईक
सोमवार

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
Next: अक्षरयात्री
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.