Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

जेव्हा बोट मिळाली नाही, पण ‘श्री’ भेटला

अनघा जोशी जानेवारी 1, 2026 1 minute read
0
anagha-shree-one

क्षितीजा अलिकडले!

श्री…

एकावेळी अदभूत, तर दुस-यावेळी प्रखर वास्तविक! असा कसा आहेस बरं तू? सारखा माझ्याशी खेळ करणारा. सतत परीक्षा बघणारा. जितका जीव सुखावणारा, तितकाच जीवाचा आकांत करावयास लावणारा. माझा जीव खात जीवास जपणारा ही तूच. दुःख व सुख ही जगण्याची दोन टोकं धरून दोरीवर उड्या मारत राहताना, माझी दमछाक पाहत प्रसन्न हसणारा! ‘भोळा मी भोळा’ म्हणणारा.

तुला माहितेय का… तुला पाहताना माझं नक्की काय होत असते ते? आधी जेव्हा जेव्हा पाहत असायची, तेव्हा हे आणि हेच जाणवलं की, तू आला आहेस कृष्णपावा घेऊन माझ्या जीवनात. राधा बनून मग मी कधी झुलत राहिले, तर कधी झुरत. भावनिक स्थित्यंतर कोणतंही असो, तल्लीन होऊन आजही असते जगत. मला भरवसा, की तू एकदिवस मला क्षितीजापलिकडील सुखानुभूती देशील. हो, ती तर तू देशीलच, देणार आहेसच. त्याकरिता आधी तू मला संयम शिकवतो आहेस.

असं का वाटतयं ते सांगते, ऐक-

काल २०२५ वर्षांचा अखेरचा दिवस म्हणून काळेश्वर येथील गोदातीरी कसल्या ओढीने गेले मी. इतक्यात, अं.. पाचेक वर्ष झाली असतील, हा परिपाठ सुरू केलाय मी. आणि तो मला नेमाने जपायचा पण आहे. होईल तितके वर्ष. तुला वाटत असेल, कोणता नेम आहे हा माझा? तर माझा हा नेम म्हण, किंवा पण म्हण, अथवा छंद म्हण. तर तो असा आहे – दरवर्षी ३१ डिसेंबरचा सुर्यास्त आणि ०१ जानेवारीचा सुर्योदय कॅमे-यात टिपायचा. तर या उर्मीच्या ओघात सुरू केलेल्या पहिल्या वर्षापासून मला या दोन वेळेचं जे निसर्गचित्र मिळत असतं, ते माझ्या मनात हर्ष तर निर्माण करतच, पण त्याचे अर्थ ही समजावत असतं. ते अगदी जीवनाशी निगडित होऊन जातं. माझ्या भावनिक जगाशी ते खरंखुरं उतरत जात आहे, असा संकेत देत रहातं.

तर काल जेव्हा तिथे पोहचले, नेहमीप्रमाणे बोटींग पॉईंटला आले. ‘नदीची सैर करायची आहे, मला घेऊन चला’, असं नावाड्यास सांगितले. एका माणासासाठी होडी नेणं अशक्य, म्हणून त्याने झिडकारून लावलं. काय करावं आता? नाईलाज झाला माझा. घाटावरील पाय-यावर बसले गुपचुप. किंचीत खट्टू होऊन. जमेल तसे फोटो किल्क करीत राहीले.

हळूहळू तेथील पुर्ण पात्रावर नजर वळू लागली. दोन्ही तीरांत सामावलेला तो भवताल आणि अवकाश माझं लक्ष वेधून घेऊ लागला. यावर्षीच्या सुर्याची मावळती लाली. तो रंग अधिक गहिरा गूलाबी, केसरकांतीचा झालेला दिसत राहिला. पाण्यांत उतरलेला लांब लाल बिंबपट्टा, तो त्राणात उतरताना प्राणात प्राण येऊ लागला. कुणाचा…! या उतरलेल्या प्रतिबिंबामुळे पात्र कसे दोन भागात विभागले गेले होते. त्यात मश्गूल असताना, प्रथमतः फक्त मावळतीच्या सुर्यावर खिळलेली नजर जरा फिटली. दिसू लागली दोन बदकांची जोडी. प्रतिबिंबाच्या अलिकडल्या भागात खेळणारी. एकाच दिशेने जात, कधी दूर कधी जवळ जात येत राहणारी. आकोड्याचं वा प्रश्नचिन्हांचं वळण असलेली त्यांची ती मान. अणकुचीदार चोच. त्याचं पाण्यात दिसणारं रुप व पाण्यावर असलेलं त्यांचं शरीर मिळून, ते कसं ओंकाराकाराच्या दर्शनी भागासारखं दिसू लागलं. पिसांचं गुबगुबीत शरीर आणि पावलांची वल्वह, यामुळे पाण्यात जी दाटसर शुभ्र रेष बनली, त्यामुळे कुणीतरी आकाशात अस्त्र सोडावं असं ते बनलं.

पण जास्त महत्वाचे हे की, ती जोडी एकमेकांसोबत कशी मस्त वेळ घालवित आहे, याच एक नवल डोळ्यांत भरून घेत होतेच. त्याकरिता पक्ष्यांच्या भल्या मोठ्या थव्यानेही मला साथ दिली. त्या बदकजोडीस पाहत पाहत तो आपापला गेला उडून दूर दूर. मी मात्र त्याच्यांत रमलेली. दुस-या बाजूला त्या भागात तीनेक होडी दूरवर जाऊन स्थिरावलेल्या दिसत होत्या. तीरावर असलेली दाट झाडी. त्याच्या तटबंदीत किल्ल्याची सुरक्षितता मनास जाणवू लागली. नदी पुलावर केलेली बल्बची रोषणाई आशा मनात बांधू लागली.

इतक्यात काळेश्वराच्या मंदीरातील आरतीचा आवाज. एकसारखा होणारा घंटानाद तिकडे मन वेधत राहीला. गंगा आरती घेताना वातावरणात कधी नव्हे तो आलेला एक नवल विशेष वाटावा असा तो गारवा अधिक जाणवू लागला. तूझ्यासोबत क्षितीजापलिकडील विश्व साधण्यापुर्वी, क्षितीजा अलिकडलं हे भव्य दिव्य जगणं तर समजून घे, असं तू सांगू लागलास. श्रीकृष्णाचं ब्रम्हांडरूप पहायचंन तूला? मग हे तुझ्या सभोवतालचं जग, त्यातील सा-या चराचराचं जगणं आधी नीट समजून घे. तीरावर निवांत बसूनच ते अनुभवणं शक्य होत गं, माझ्या राधेराणी!

बोटीच्या प्रवासाचं सुख हरवलं वाटणारी मी, मग प्रसन्न चित्ताने साथीदारासह मस्त गाडीत बसून घरी आले. मनात एकच भाव दाटलेला- देखिला आज विस्तिर्ण देखावा!

तुझी वेडी, मी

लेखक

  • अनघा जोशी
    अनघा जोशी
Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Post navigation

Previous: तुम्ही खरोखर आजारी आहात की तुम्हाला ‘रुग्ण’ ठरवलं जातंय? वाचा एक डोळे उघडणारे सत्य!
Next: डोक्यावर गाठोडं आणि चेहऱ्यावर हास्य… कुठे गेला असेल बसवप्पा?
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
CTJ98482648147111441.jpg
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 0

ताजे लेख

  • हास्य!!
  • मुकी होत चाललेली घरे
  • २३ एप्रिल…
  • संत नामदेव
  • तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
CTJ98482648147111441.jpg
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 0
gumohor-water
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.