Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 1 minute read
0
CTJ98482648147111441.jpg

*२३ एप्रिल…*

(२३ तारखेला पुस्तकं दिन साजरा झाला.. त्या निमित्त हा लेख लिहिला.) 
माझी आई ९२ वर्षाची आहे तिला अजूनही वाचण्याची खूप आवड आहे त्यामुळे पुस्तकं बदलण्यासाठी भुसावळ येथे सार्वजनिक वाचनालयात जाण्याचं काम नेहमी सौभाग्यवती करते. काल मात्र मला वाचनालयात जाण्याचा योग आला. तेथील वाचक वर्ग  आज फार मोठ्या संख्येने कमी झालेला आहे.आमच्या लहानपणी कधीकाळी वाचकांनी ओसंडून वाहणारे भुसावळचे सार्वजनिक वाचनालय आता उंन्हाळ्यातील कोरड्या नदीप्रमाणे शुष्क झाले आहे.
खरंतर वाचन अजूनही खूप सुरु आहे पण ते मोबाइलवर व्हाट्सअप, ईबुकद्वारे किंवा वेब साईटवर.वाचनालयात पुस्तकावर बसलेली धूळ आणि भितीवर असलेले उधईचे जाळे बघवत नाही.
पुस्तकं बंद कपाटात  
बंदिस्त ज्ञान इतिहास 
वाचायला ना कुणी हो 
एकटा मी वाचनालयात!! 
शास्त्राची झाली प्रगती 
मोबाईल पुस्तके आजची 
नविन पुस्तकाचा गंध 
मोबाइलला कसा हो!
कधी वाचकाची गर्दी 
सर्व होते ते रसिक दर्दी
भितीवर आज उधई 
अनमोल पुस्तकं वाचवा हो!
बदल म्हणजे जीवन 
पुस्तकाला तेही लागू 
रूप त्याचे आज डिजिटल 
वाचून ज्ञान हो मिळवू!!l
आजकाल मोबाईलवर वृत्तपत्रे उपलब्ध आहेत त्यामुळे लहानपणी प्रत्येकाच्या घरी आवर्जून येणारे वृत्तपत्राची संख्या रोडावली आहे.पूर्वी कोपऱ्या कोपऱ्यावर असणारे वृत्तपत्रविक्रेतेही कमी झाले आहेत.
दिवाळीला दिवाळी अंक म्हणजे वाचनाची मेजवानी असायची आता फारच कमी दिवाळी अंक बाजारात येतात.. दिवाळी अंकासाठी खास वर्गणी घेऊन सुरु होणारे वाचनालये आता इथं नाही.
सर्वत्र असे निराशाजनक चित्र दिसत असल तरी परवा भुसावळला शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात एक बॅनर बघितले त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिले होते *”शांतता राखा.. भुसावळ वाचत आहे!”* आणि तिस पस्तीस अबालवृद्ध मंडळी आपल्या हातात आपापले पुस्तकं घेऊन वडाच्या झाडाच्या सावलीखाली वाचनाचा आस्वाद घेत होती.दर रविवारी बागेत स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे वाचन संस्कृती आणि पुस्तकं जपण्याचा हा वाचन वर्गाचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.
चांगला वाचक झाल्याशिवाय लेखक होऊ शकत नाही.. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. 
या शतकात टीव्ही इंटरनेट असे नविन क्रांतिकारी शोध लागले आणि वाचून मिळणारा अनुभूती जर प्रत्यक्ष समोर स्पष्ट दृकश्राव्य माध्यमातून आज सहज उपलब्ध होत असल्याने, ती समजण्यास सोपी वाटत असल्याने नविन पिढी पुस्तकापेक्षा या डिजिटल माध्यमाना प्राधान्य देतात.
पूर्वी जेव्हा प्रिंटींग नव्हती तेव्हा भ्रूजपत्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले.. नंतर पुस्तकं आली.. आताच्या ईबुकच्या जमान्यात ती मागे पडता की काय? ही मनात शंका आहे.
असो.
*आपला इतिहास संस्कृती आणि  भाषेचे सौंदर्य जपणारे, आणि सदैव ज्ञान देणारे पुस्तकं नक्की कात टाकतेय, नविन रूप धारण करतय,  हे मात्र नक्की.*
*ll झरे संस्कृतीचे ll*
“वाचाल तरच वाचालं”
सांगून अनेक थोर गेले
राहिले फार कमी आता
ज्यांचे वाचनाशी वैर आहे..१
वाचता ती फक्त्त येते
लिहिण्याची कला हो,
लेखक ते निघून गेले 
लेखनाने अमर झाले..२
ईश्वर आम्हास देतो
जगण्यास सर्वं काही
वाचण्याची  ती भूक
संस्कार देत आहे.. ३
वाचण्या ज्ञान lवर्धक 
अनेक सुंदर पुस्तकं ते 
त्यासी वाचा नित्य तेथे 
शारदेचा निवास आहे.. 
रिझवता अनेक आले 
हे वाचनाचे प्याले..
लेखानाचे जीवन्त  झरे
लेखणीस ओपोआप सुरु झाले..
✍️हेमंत नाईक
२७.०४.२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: संत नामदेव
Next: मुकी होत चाललेली घरे
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
gumohor-water
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 0

ताजे लेख

  • हास्य!!
  • मुकी होत चाललेली घरे
  • २३ एप्रिल…
  • संत नामदेव
  • तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
CTJ98482648147111441.jpg
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 0
gumohor-water
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.