Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 1 minute read
0
Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
हास्य!
०५. ०४. २६
*औषधेष्वपि सर्वेषुहास्यं* 
*श्रेष्ठं वदन्ति ह।* 
*स्वाधीनं सुलभं चापि आरोग्यानन्दवर्धनम्॥*
भावार्थ :- सर्व औषधांमध्ये हास्य हे श्रेष्ठ औषध आहे, कारण हे औषध स्वतःकडे उपलब्ध असणारे, घ्यायला सुलभ, तसेच आरोग्य आणि आनंद वाढवणारे आहे.
मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्यदिन म्हणून साजरा करतात.
काल साजऱ्या झालेल्या हास्यदिनानिमित्त हास्य हा विषय घेऊन काहितरी लिहितो आहे.. ते हास्यनिर्मिती  करेल की नाही, यांची खात्री नाही पण हास्यास्पद ठरू नये ही ईश्वरचरणी प्रार्थना..
अर्थात हास्यास्पद ठरले तरी मी हसण्यावारी नेईन!!
😄😄
सुखाची अनुभूती झाल्याशिवाय हास्य निर्मिती होत नाही.हास्य म्हणजे आनंदाचे प्रगटीकरण. हास्याची देणगी फक्त्त मानवाला दिली आहे..इतर कोणी दोन प्राणी हसल्याचे ऐकीवात नाही. 
विनोद हा हास्यनिर्मितीसाठी आवश्यक भाग अंग असलं तरी कोणच्याही व्यंगावर तो न करण अभिप्रेत आहे. 
चिं.वि.जोशी, पु. ल. , द. मा.मिरासदार, शंकर पाटील, शं नां  नवरे हे मराठीतील साहित्यिकाचे लाईव्ह शो बघणारे सर्व भाग्यवंत आहेत आणि त्यांनी लिहिलेले साहित्य अजूनही हास्याची उधळण वाचकासाठी करत आहे आणि करत राहणार!!
पदमश्री आर.के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचे कार्टून हसू  देतांना कटू सत्य सांगत होते.
विनोदी लेखन करण ही अत्यंत कठीण गोष्ट आहे.. हल्ली टीव्हीवरचा हास्य जत्रा हा कार्यक्रम खरोखर हास्य फुलवतो.
सात आठ दशकापूर्वीचा चार्लीचॅपलीनचा एक शब्द न बोलता केलेला मूक अभिनय  सर्वांनाच पोट धरून हसण्यास कारणीभूत ठरतो.
विरोधाभासातून हास्य लारेल हार्डीच्या, चिमणराव गुंड्याभाऊ या जोड्यातून पडद्यावर आले असले तरी काही गंभीर प्रसंगी नकळत हास्यनिर्मिती होऊन जाते.
प्रत्यक्षात घडलेला एक प्रसंग आठवतो,
एका मित्राची वृद्ध मातोश्रीचे निधन झाले असताना  त्या देहास तिरडीवर दोरीने बांधण्याचे कार्य सुरु होते… हे काम करणारी अनुभवी मंडळी बहुतेक सर्व ठिकाणी फिक्स असतें..त्यापैकी एकाची गोष्ट.
तिरडी बांधणाऱ्या पैकी हा एक, लग्न जुळवण्याचा व  ती इव्हेट मॅनेज करण्याचा  व्यवसाय करीत होता. हल्ली मोबाईल वर गाण्याची ट्यून  कॉलर ट्यून म्हणून काही मंडळी सेट करतात.. तशी यानेही मोठ्या हौसने त्याच्या मोबाईलवर या गाण्याची ट्यून कॉलर ट्यून म्हणून हे गीत सेट केले होते
_”बोला शुभमंगल_ 
_सावधान!!सावधान!!_
_मंडपी जोडा शोभे_
_छान छान छान!”_
आणि 
नेमका या प्रसंगी त्याला कॉल आला मोबाईल फोनची कॉलर ट्यून वाजू लागली.. तो खाली बसलेला आणि त्याच्या पॅन्ट मध्ये फोन असल्याने तो लवकर स्विच ऑफ ही करता आला नाही..
दुःखद प्रसंगी नकळत निर्माण झालेले हास्य लपवतांना सर्वांनाच कसरत करावी लागली होती. बाजू उभा असलेला एक टार्गट मुलगा मिश्किलपणे पुटपुटला अरे फोन लवकर बंद कर नाही तर म्हातारीही हसायला लागेल.
असो.
विनोद आणि हास्य याचे अतूट नाते असतें  विनोद समजायला विनोद्बुद्धी लागते अस म्हणतात.. ते काही अशी खरं असले  तरी हास्यही साथीच्या रोगाप्रमाणे असतें… आज बहुतेक शहरांत हास्य क्लब असतात भुसावळलाही तापीनदीकाठी सकाळी काही मंडळी कारण नसताना त्यांना मोठं मोठ्याने हसताना पाहून मलाही हसू येते.
“प्यार किए जा” मधील पिक्चरची स्टोरी सांगताना मेहमूदचा अभिनय आणि ओमप्रकाशच्या चेहेऱ्यावर भिती अजूनही हसू आणते COEP ला असताना मॅटीनीला पुण्याच्या मंगला सिनेमेगृहात आम्ही सर्व मित्र खूप हसलो होतो पुढे लक्षानेही धूमधडाका या चित्रपटात तेवढ्याच ताकदीने ही भुमिका केली होती सोबतीला होते शरद तळवलंकर!! 
मित्राच्या बरोबर गप्पा म्हणजे निखळ हास्याचा धबधबा होता… अजूनही आपण मित्रांना भेटतो तेव्हा तो नित्य अनुभवत असतो.
हसवा फसवीचे  दिलीप प्रभावळकर  , दादा कोंडके , अशोक सराफ…….अशी  महाराष्ट्राला नेहमी हसत ठेवणारी खूप मोठी कलाकारांची यादी आहे… आणि त्यांना कथा लिहून देणारे सर्व लेखक साहित्यिक या सर्वांनाच हास्यदिनानिमित्त मानाचा मुजरा!!
हास्य नेहमी एकमेकांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतं. कारण..
_”हसण्याला नसते बंधन_
_हसण्याला नसते भाषा,_
_वेदनांशी संवाद साधून_
_हसू दूर करते निराशा!”_
एक स्मितहास्य न होणारे काम करून देते हा अनुभव सर्वांनी घेतला असेल.
_हसण्यासाठी जन्म आपुला_ 
_नित्य सर्व हसत रहा रे.._ 
_सुख दुःख म्हणजे जीवन_
_निश्चित अटळ प्राक्तन आहे!.._
_मित्र जेव्हा साथ संगती_
_हास्याचा भरपूर पूर लोटे_
_स्मितहास्य करता वदनी_
_कार्य कठीण सिद्धी जाते!_
_हास्य औषधी, जाते बीपी_
_चिंता साऱ्या दूर पळे त्या.._
_विनोद बुद्धी ठेवुनी शाबीत_
_हसा अन सर्वांना हसवा!.._
*हास्याचे फायदे खूप असले तरी दुःखी चेहऱ्यावर हास्य फुलावताना मिळणारा आनंद मात्र निश्चित वेगळा आहे.*
सर्वाना नेहमी हसत राहण्याच्या आणि इतरांना हसवण्याच्या शुभेच्छा देऊन लिहिणं थांबवतो.
हेमंत नाईक
०४. ०५. २०२६

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: मुकी होत चाललेली घरे
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
CTJ98482648147111441.jpg
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 0
gumohor-water
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 0

ताजे लेख

  • हास्य!!
  • मुकी होत चाललेली घरे
  • २३ एप्रिल…
  • संत नामदेव
  • तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
CTJ98482648147111441.jpg
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 0
gumohor-water
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.