Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

डोक्यावर गाठोडं आणि चेहऱ्यावर हास्य… कुठे गेला असेल बसवप्पा?

अंजली सहस्रबुद्धे जानेवारी 1, 2026 1 minute read
0
anjali-basavappa

तिचं सासर शहराच्या काहीशा बाहेरच्या भागात होते. बंगल्याभोवती छान फुलाफळांची बाग होती. घरामध्ये पणजी बाई, आते सासू ,चुलत सासू ,सासरे अशी अनेक माणसं होती. नवीनच़ं लग्न झाले असल्यामुळे घरातील सर्व व्यवस्था, नोकर चाकर इत्यादींची हळूहळू माहिती होत होती.

बागेची झाडझूड, स्वच्छता इत्यादी करण्यासाठी आठ दहा दिवसातून एकदा बसवप्पाचा फेरा डुलत डुलत ति च्या घरी येत असे. डोक्यावर एका गाठोड्यात त्याचे कपडे वगैरे सर्व संसार असे. “अक्काबाई” अशी त्याच्या बारक्याश्या आवाजात हाक येई. तिच्या आते सासूबाई त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी पुढे सरसावत. दोन रुपये का तीन रुपये यावर घासाघीस होऊन सौदा ठरे आणि कामाला सुरुवात होई. तोंडांनी काहीतरी बडबड ही सुरू असे. काम झाले की त्याला मजुरी आणि खाणेपिणे दिले जाई. हा बसवप्पा फारसा बोलत नसे. आपण बोललेले त्याला कितपत कळते आहे? तेही समजत नसे. नुसता दात दाखवून हसत असायचा. एकांडा गडी. तिच्या परिसरातील अनेक बंगल्यांमध्ये तो काम करत फिरायचा. जवळच्याच एका बंगल्यात रात्री मुक्काम असायचा.

वर्षोनुवर्ष हे चालू राहिले. घरातील ज्येष्ठ मंडळी हळूहळू वयोपरत्वे कमी सक्रिय होऊ लागली. आत्या बाईची जबाबदारी आता तिच्यावर आली. ती व्यवसायामुळे बाहेर जायची. त्यामुळे बसप्पा कडून काम करून घेणे जमेना. मग माळीबुवा ठेवायला लागले.

बसवप्पा मात्र रस्त्यावर इकडे तिकडे फिरताना दिसायचा. तो जिथे रात्री मुक्काम करायचा, तिथे बांधकाम सुरू झाले. त्याला त्याचा ठिकाणा हलवावा लागला. अधूनमधून तिच्या अंगणात येऊन हाक देऊन जायचा. एकदा असाच आला तेव्हा तिच्या नवऱ्याशी त्याची गाठ पडली. काहीतरी खायला द्या म्हणाला. तिच्या नवऱ्याने रोज आमच्याकडे दुपारी जेवायला येत जा असे त्याला सांगून टाकले. साधारण सहा महिने त्याचे येणे चालू राहिले. मग तो अधूनमधून येईनासा झाला. तिच्या घरातली माणसेही कमी झाली. त्यामुळे त्याचे अधून मधून न येणे त्रासदायक वाटू लागले. “तू जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवत जा मी हॉटेलवाल्याला सांगून ठेवते” असे तिने त्याला सुचविले. इतक्या वर्षात आजूबाजूचा परिसर विकसित झाला होता. हॉटेलही निघाली होती. पण याला ती कल्पना कळली नाही किंवा रुचली नाही. त्याचे वय ही आता पन्नाशीच्या पुढे गेले असावे. तिला वाटले आता याचं पुढे कसं होणार?

अशा लोकांसाठी सरकारतर्फे मोफत वृद्धाश्रम चालवले जातात. त्याची माहिती तिने काढली. एक दिवस त्याला गाठून तू वृद्धाश्रमात राहायला जा असे त्याला सुचविले. पण तो सरळ नाही म्हणाला. त्यानंतर बसवप्पा अगदी क्वचितच कुठे तरी दिसायचा. आणि नंतर तो दिसेनासा झाला.

देवानेच त्याची काय ती व्यवस्था केली असेल का?

अंजली सहस्रबुद्धे

लेखक

  • अंजली सहस्रबुद्धे
    अंजली सहस्रबुद्धे
Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Post navigation

Previous: जेव्हा बोट मिळाली नाही, पण ‘श्री’ भेटला
Next: दिग्दर्शक ‘साब’ आणि आमचं तारांगण: मंतरलेल्या दिवसांची गोष्ट
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
CTJ98482648147111441.jpg
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 0

ताजे लेख

  • हास्य!!
  • मुकी होत चाललेली घरे
  • २३ एप्रिल…
  • संत नामदेव
  • तुम्ही जे समजतात..तो मी नव्हे !!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

Screenshot_20260504_161004_Blogger.jpg
  • ललित

हास्य!!

हेमंत नाईक मे 4, 2026 0
gumohor-water
  • ललित

मुकी होत चाललेली घरे

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 30, 2026 0
CTJ98482648147111441.jpg
  • ललित

२३ एप्रिल…

हेमंत नाईक एप्रिल 29, 2026 0
gumohor-water
  • ललित

संत नामदेव

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 23, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.