Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

अमृताहूनि गोड..

हेमंत नाईक जानेवारी 18, 2026
Screenshot_20260118_130809_Chrome.jpg
*l अमृताहूनि गोड l*
*l वाटे आम्हा चहा l*
*l पाहतो रात्र दिन हो l*
*l वाट त्याची!!! ll*
☕☕☕☕☕☕
असे म्हणणारे माझ्यासारखे चहाप्रेमी खूप असतील.
अमृताशी बरोबरी करणारे मला माहित असलेले फक्त्त दोन पेय आहेत.. एकाला सर्वसमाज मान्यता आहे तर दुसऱ्याला अपेयपान म्हणणारे खूप असले तरी  काही  समाजात मात्र त्यास शिष्टाचारासारखी राजमान्यता आहे .. दुसऱ्याच्या वाटेला मी कधी गेलो नाही पण पहिल्याचे सतत सानिध्य लाभल्याने त्यावर मात्र मी पानांवर पाने लिहू शकतो.
माझ्या प्रिय चहाचें चहाते असंख्य भरपूर आहेत अगदी जगभर पसरलेले!!  शाळेत इतिहास शिकताना बोस्टनची चहा पार्टी यात पार्टी हा शब्द मला खटकत असे चहाची पार्टी करताना बहिष्कार कसा??.. आणि तोही माझ्या प्रिय चहावर!! हा त्यावेळी बालमनाला प्रश्न पडला होता.
चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरवात न करणारे कमनशिबीच.  COEP ला असताना जंगली महाराज रोडवरचे,सकाळी सर्वात प्रथम उघडणारे NCR इराणी कॅफे मधील सतत उकळत राहणाऱ्या इराणी चहाही चव आणि रुचकर मस्का पाव अजून ही आठवतो आहे. चहा करणे ही एक कला आहे.. नेमका किती वेळ उकळत ठेवावा आधी दुध घालावं की चहा?  नंतर वेलची आलं चहा मसाला, गुळ वा साखर आदी विविध प्रमाणात मिक्सिंग करून हे पेय बनते. घरोघरची चव वेगळी असतें. गृहिणी यात वाकबगार असल्यातरी अट्टल चहाबाज पुरुषांना स्वतःच्या हाताचाच चहा आवडतो.
लिप्टन, टाटा आदी नावाजलेल्या चहा कंपनी पूर्वीपासून होत्या त्यांचे अनेक ब्रँडहीं आहेत .. आता नविन “वाघ बकरी चहा” हे नाव ऐकून मजेशीर वाटले.
“बासुंदी चहा येथे मिळेल!” अशी पाटी एकाठिकाणी लिहिली होती अगदी दुध आटवून भरपूर साखर टाकून वेलचीची चव टाकून चहाची बासुंदी चवीने पिणारे चहाबाज तिथे गर्दी करून असायचे.
पुण्यात अमृततुल्य नावाने एक चहा प्रकार असलेली चहाची दुकान कोपऱ्यांकोपऱ्यावर होती त्यात मालक स्वतः चहा बनवत असे ती त्याची किंचित उंच बैठक स्टोव्ह त्यावर ठेवलेली किटली त्यात उकळणारा चहा सोबत खारी, क्रिमरोल आणि वाचण्यास ठेवलेला पेपर आणि तो वाचत चहाचा एकेक घोटाचा मित्राबरोबर आस्वाद घेतानाची मजा औरच होती.
कॉलेजला बोटिंगचा क्लब असलेले आमचे एकमेव कॉलेज. आम्हाला संध्याकाळी बोटिंग करायची सोयही उपलब्ध होती.  मुळा मुठेच्या संगमा जवळ रोज संध्याकाळी आम्ही बोटिंग करायचो तिथे. हिरवळी लागत असलेले नदीचे सुंदर चित्र अजूनही डोळ्यापुढे स्पष्ट दिसते आहे. बोटक्लब कॅन्टीनला त्यावेळी आता चलनातही नसलेल्या फक्त्त पंचवीस पैशात चहा मिळायचा लेक्चर्सला दांडी मारून सृष्टी सौंदर्य न्याहाळत मित्रांच्या कोंडाळ्यात गप्पाबरोबर या चहाची चव कशीही असली तरी ‘तरतरी” मात्र नक्की देत होता.
काहीं सुचत नसले तर चहा घेतल्या शिवाय पर्याय नसतो. दिवसाला तीन चहा नॉर्मल असले तरी तासातासाने चहापिणारे चहाप्रेमी अस्तित्वात आहे. प्रत्येक साईटवर एक चहा याप्रमाणात दहा पंधरा चहा माझे पक्के असायचेत.
वैद्यकीय दृष्ट्या चहा अँटी ऑक्सिडेंट तरतरी देणारे पेय असले तऱी  झोप उडवण्याचे कामही तें करते असा विदयार्थी दशेत बऱयाचा जणांचा विश्वास असल्याने. हॉस्टेलवर परीक्षेच्यावेळी झोप उडवण्याचे निमित्त म्हणून रात्री शिवाजीनगरजवळ टपरीवर सामुदायिक चहापान मध्यरात्री होत असे. चहा पिऊन तृप्त होऊन आल्यावर मी मात्र गाढ झोपी जात होतो..उठायचो तो सकाळी पुन्हा चहापिण्यासाठीच.
हल्ली टपरीवर च हाच्या कपची साईझ कमी होत असल्याच माझ्यासहित बऱ्याच जणांना दुःख होत असेल. मोठ्या मग मधे आलं वेलची मसाला आणि नेमकी साखर घातलेला वाफाळलेला चहा एकेक घोट घेत आस्वाद घेण्याची मजा अवर्णनिय आहे.
साठीनंतर आता साखर हानिकारक आहे याची जाणीव मला शरीराने करून दिली आणि चहात तिचे अस्तित्व प्रामुख्याने असल्याने या अमृततुल्य पेयास नाईलाजाने दूर सारले असले तरी अजूनही प्रेम तेवढेच कायम आहे.अगोड शर्कराविरहित चहा घेतो पण त्यात संपूर्णता नाही. असो.
चहावरील प्रेमाने चहावर मी लिहिलेले हे “प्रेमगीत” शेअर करून  थांबतो.
*अमृततुल्य चहा!!!*
चहावर केली मी
मर्जी  बहाल ..
चहा नसता तेव्हा,
माझे होतात हाल..llधृll
पापण्याची उघडता
दार रोज सकाळी,
ही नजर शोधते,
कपबशी गरम चहाची
डोळे मिटूनी ओठी लावुनी,
स्वाद घ्या तुम्ही खुशाल..ll १ ll
हुरहूर म्हणू की,
ओढ म्हणू ही गोड..
घोट घेता चहाचा,
सुटतील सारी कोडं..
विरहाने त्याचा शुल ..
मस्तकी येई फार..ll २ ll
सवयीने त्याच्या आधीन
चहाबाज झाली मंडळी
अमृततुल्य  घोट घेता,
डोक्यात येई तरतरी
कृपा त्याची सदा व्हावी ..
चहाविना न व्हावी सकाळ..३
चहावर केली मी
मर्जी  बहाल ..
चहा नसता तेव्हा
माझे होतात हाल..
(चाल: तुम्हावर केली मी मर्जी बहाल!!)

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Continue Reading

Previous: रंगू या नात्यांच्या रंगात
Next: चमत्कारांना नमस्कार
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.