Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

हम्पी आणि विजयनगर विषयक पुस्तकें

गौतम सोमण जानेवारी 25, 2026 1 minute read
0
HampiVijaynagar.jpg

गेल्या महिन्याभरापासून मी सगळीकडे हम्पीचा जप चालवला असल्याने  काही जणांनी त्याविषयी पुस्तके सुचवायला सांगितले. हा लेख त्या उद्देशाने लिहिला आहे.

Hampi Vijayanagar   लेखक:  John M. Fritz and George Michell
तुम्ही हम्पी बघायला जाणार असाल (पहिल्यांदा असो वा कितव्यांदाही ) तर हे पुस्तक वाचलेच पाहीजे. यात हम्पीचा इतिहास, तेथील  हंपीची मंदिरे आणि वास्तु, शिल्पकला आणि स्थापत्यकला याची सविस्तर माहिती दिली आहे . आणि त्यातील फोटोज तर अप्रतिम आहेत.
हे दोन्ही ब्रिटिश लेखक हंपीच्या अक्षरशः प्रेमात पडले होते. ३० वर्षांत त्यांनी अगणित वेळा हम्पीला फेऱ्या मारल्या. जॉर्ज मिशेल यांनी तर आपल्या मुलींची नावेही कृष्णदेवरायाच्या राण्यांच्या नावांप्रमाणे ठेवली होती. जॉन फ्रिट्झ यांचे हल्लीच २०२३ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्युपत्राप्रमाणे त्यांचे हिंदु पद्धतीने दहन करून अस्थी, रक्षा तुंगभद्रा नदीत विसर्जित करण्यात आली .

South India Under Vijayanagar: Art and Archaeology  संपादिका:  Anila Verghese  – 

हम्पी येथील शिल्पकलेच्या परंपरा, मंदिरांची रचना आणि साम्राज्याच्या इतर प्रदेशाशी असलेले संबंध यावर विद्वत्तापूर्ण निबंध.

A Forgotten Empire: Vijayanagar  लेखक:  Robert Sewell    –  

युरोपीय प्रवाशांच्या वृत्तांतांवर आधारित विजयनगर साम्राज्याचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास. हे पुस्तक आजही मोठ्या प्रमाणावर वाचले जाते.

Vijayanagar: History and Legacy    लेखक:  S. Krishnaswami Aiyangar   – 

एक प्रतिष्ठित ऐतिहासिक ग्रंथ जो संपूर्ण विजयनगर साम्राज्याचा उदय आणि त्यातील प्रमुख व्यक्ती आणि संस्थांचा आढावा घेतो. हंपीविषयक वाचन सूचीमध्ये या ग्रंथाची बरेचदा शिफारस केली जाते.

A History of South India: From Prehistoric Times to the Fall of Vijayanagar   लेखक:  K.A. Nilakanta Sastri   –  

या संदर्भ ग्रंथात संपूर्ण विजयनगर  साम्राज्याच्या  कालखंडाबद्दल  तपशीलवार विवेचन आहे.

अमुक्तमाल्यदा –
स्वतः सम्राट कृष्णदेवरायांनी तेलुगू भाषेत लिहिलेले हे महाकाव्य, त्यांच्या कारकिर्दीतील संस्कृती, धार्मिक जीवन आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची माहिती देते. (अनुवाद उपलब्ध.)

Krishnadevaraya  लेखक Srinivas Reddy – 
कृष्णदेवरायाच्या संपूर्ण कारकिर्दीचा तपशीलवार आढावा घेणारे उत्कृष्ट पुस्तक

जर तुमची आवड स्थापत्य आणि कलेकडे अधिक असेल, तर फ्रिट्झ/मिशेल, आणि वर्गीस यांच्या पुस्तकांपासून सुरुवात करा. 
राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी  सेवेल आणि अय्यंगार हे ठोस आधार आहेत, तर शास्त्री हम्पी आणि विजयनगरला दक्षिण भारताच्या व्यापक संदर्भदृष्टीने पाहतात.  
कृष्णदेवरायाबद्दल जिज्ञासा असेल तर रेड्डींचे पुस्तक आणि स्वतः रायाने लिहिलेले महाकाव्य अभ्यासावे.

याव्यतिरिक्त तुमच्या माहितीत चांगली पुस्तकें असतील तर जरूर सांगा.

गौतम सोमण
२५ जानेवारी २०२६

#सुरपाखरू  #३० दिवसाच्या३० #जानेवारी२०२६

लेखक

  • गौतम सोमण
    गौतम सोमण
Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Post navigation

Previous: माउंट वेलिंग्टनवर चढाई!!
Next: ll२६, जानेवारी….अर्थात प्रजासत्ताक दिन ll
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0

ताजे लेख

  • चांदणे शिंपीत जाशी
  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.