Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

व्यक्तता…

हेमंत नाईक जुलै 1, 2026 1 minute read
0
1001084515.jpg
व्यक्तता  म्हणजे आपले विचार, भावना किंवा मत स्पष्टपणे मांडण्याची क्षमता किंवा प्रक्रिया होय. भाषेच्या किंवा कलांच्या माध्यमातून स्वतःला विविध कृतीतून उघड करणे, म्हणजेच व्यक्तता.
तिस दिवस सातत्याने लिहून “व्यक्त व्हा” हेच शब्द घेऊन हा लेख लिहितो आहे. व्यक्ती पासून व्यक्त शब्द आला की व्यक्त पासून व्यक्ती हे मला माहीत नाही पण प्रत्येक व्यक्तीत आत जे काही दडलेले आहे ते सर्व भाव बाहेर बोलण्यातून, वागण्यातून, लिहिण्यातून, गाण्यातून, नजरेतून, आणि कृतीतून बाहेर पडणे म्हणजे मी  व्यक्त होणे असं समजतो. अर्थात लिहून व्यक्त होण्यासाठी  पर्यटन कला साहित्य संस्कृती विचार आचार अशी कधीच न संपणारी फार मोठी यादी आहे. अगणित विषयही उपलब्ध आहे आणि सुरपाखराच्या थव्यात व्यक्त होण्यासाठी लिखाण, त्या सोबत जोडलेले फोटो,  ही आपली येत्या तिस दिवसातील साधन. वेळीवेळी होणाऱ्या रविवारच्या तुषार सरांच्या मार्गदर्शक मिटिंग चुकवू नका .  टायपिंगचा बऱ्याच वेळा कंटाळा येतो. रोज केल्याने हळूहळू त्यात गती प्राप्त होते. मला सुद्धा खुप कठीण जायचे सुरवातीला, पण आता एक्सपर्ट झालोआहे. कवितेसाठी, लेखासाठी विषय अगदी जागोजागी मिळतात.यंदाच्या जुलैच्या या सत्रात एखादा शब्द घेऊन त्यावर “वांछील तें तो लिहो ” हा  प्रयोग करणार आहे.
काही जण अगदी स्वभावानेच अव्यक्त असतात सहजा सहजी त्याचे मनाचा ठाव घेता येत नाही, ते काही प्रदर्शन करण्यास इच्छुक नसतात अगदी मितभाषी असतात , तर काही जण आपल्यात दुसऱ्याला दाखवण्यासाठी काही विशेष आहे का?, या संभ्रमात कारण नसतांना असतात.
व्यक्त होणे खरंच गरजेचंआहे का ?
तुमच्या लिहून व्यक्त होण्याने हा मंच समृद्ध होईल. तुम्हालाही आनंद होईल.तुमच्यात जर काही सुंदर कलागुण असतील तर त्याचा आस्वाद इतरांनाही घेऊ द्या. परमेश्वराने निसर्गात जसं सौंदर्य  बघण्यास सर्वाना खुले केले आहे तसें आपण ही ते सर्वाना द्या. विद्या वाटल्याने वाढते हे प्रथम मला लहानपणी खरं वाटत नव्हतं, पण नंतर हळूहळू पटलं कारण विद्या वाटता वाटता आपण प्रगल्भ बनतो आणि नवीन क्षितिजे दिसायला लागतात आणि ते  आपल्या ज्ञानवृद्धीस कारणीभूत ठरतात.
लिहून व्यक्त होणे या विषया व्यतिरिक्त आयुष्यातही प्रत्येक ठिकाणी व्यक्त होणं हे अत्यंत महत्वाचे आणि जरुरी असतें.व्यक्त होणे हे जिवंतपणाचे एक लक्षण आहे.
प्रेमही वेळेवर व्यक्त होणं ही महत्वाचे असतें…नाहीतर संगम मधील राजकुमार बनतो.मुलांवर , चुकीच्या वागण्यावर राग व्यक्त केला नाही तर ती सुद्धा बिघडतात.ओरलला सर्व येत होत रे… पण बोलून व्यक्त नाही केल म्हणून ती राहिली.  अगदी लेखी परीक्षा सुद्धा तुमच्या ज्ञानाची लिखीत स्वरूपात केलेली व्यक्तताच असते.
” थ्री इडियट्स ” मध्ये सुद्धा फरहान फोटोग्राफी ची आवड असल्याची भावना वडीलांपुढे व्यक्त करतो आणि सुखी होतो..अशी व्यक्ततेच, जीवनात महत्व असलेली अशी अनेक उदाहरण देता येतील.
माझ्या व्यक्त होण्याला अथवा माझ्या कलेला लोक हसतील का?  हा सुध्दा खूप जणांच्या अगदी माझ्या पण मनातील प्रश्न आहे. “सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक?”लोक काहीही म्हणतील तरी  त्यांची पर्वा आपण करायची नसते,कारण लोक उंटावरही बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही आणि इथं तर सर्व जण लिहिण्याची आवड असलेली मंडळी आहोत. बरेच जण एकमेकांशी न बोलताही, लिहिण्याने  मित्र झालो आहे आणि होणार आहोत. आवड एक असली की मैत्री होते आणि मग ती खूप जुनी मैत्री असल्याचे जाणवते.
विशेष करून माझ्यासारख्या साठीपार केलेल्यासाठी साठाव्या वर्षी तर तुम्ही काहीही केले तरी “साठी बुद्धी नाठी”  या कलमान्वये तुम्ही काहीही केले तर तुम्हास पूर्ण माफी आहे.
*त्यामुळं बिनधास्त व्यक्त व्हा… लिहा!!*,
अर्थात सर्व नियमांना धरून.
माझे जीवन गाणे गाणे… या चालीवर,
” महिनाभर रोज 
लेख ते लिहिणे …llधृ ll
कुणी काही
मला म्हणू दे..
कुणी माझ्यावर
लेखावर हसू दे..
मनात जे वाटेल 
ते खुशाल लिहिणे ll१ll
शब्दावर लिहीन 
स्फूट कधी मी ..
पर्यटन अनुभव 
कधी कथा ती ..
लाईक मिळो वा
ना ते मिळू दे..ll२ll
घटना अवचित 
घडून कुठे जाते ..
विचाराचे मनात 
वादळ उठवते ..
लागलीच लेखणीने 
शब्दात उतरवणे ll३ll
कार्यमग्न खूप जर हो 
लिहीणे रोज होईल काहो ?
कधी नाही केले
टायपिंग येईल काहो ?
सुंदर अक्षरांत ,
लिहून पाठवणे..ll४ll
ना उत्तम जमले
जर कधी हो..
प्रयत्न करता
नक्की जमेल हो..
सराव होता होता 
सहजच लिहिणे ll५ll 
वाचण्यानेच आम्हा 
इतिहास समजतो 
लिहिले आज कुणी 
उद्या दुसरा वाचतो 
व्रत लिहिण्याचे 
रोज अचूक पाळणे 
महिनाभर ,रोज 
लेख  ते लिहिणे ..llधृ ll
आज इथेच थांबतो.
सर्वांनी १००% तिस दिवस वेगवेगळ्या विषयावर आपले विचार अनुभव कल्पना कथा आदी,
 ” लिहून  व्यक्त व्हा..” हीच सर्व सुरपाखरांना सदिच्छा देतो आणि थांबतो.
✍️ *हेमंत नाईक .*
1जुलै 26

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: नग्न भिक्षा
Next: सुरपाखरू होताना— दिवस पहिला
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.