Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

आनंद कि सुख ? भाग १

अभिषेक किन्हेकर जुलै 3, 2026 1 minute read
0
image.png
अध्यात्म हा काही माझा प्रांत नाही. पण काही गोष्टी खरंच विचार प्रवण करणाऱ्या असतात. कुणाला आपण अगदी वाकून नमस्कार केला की अगदी हटकून मिळणारा आशीर्वाद म्हणजे “सुखी राहा.” लग्न करून सासरी आलेल्या मुलीची आई सहज विचारते. “सुखी आहेस नं?” आधीच्या काळीं एखादी व्यक्ती झोपली असेल तर म्हणायचे “सुखी झाला. उठेल थोड्या वेळानी…” जुनी लोकं पत्रात लिहत असत, “तुमचे पत्र पावले, आनंद झाला.”(सुख झालं नाही). एखादा अवलिया पाहून म्हणतात “तो आत्मानंदात आहे”. अगदी भान विसरून, येणाऱ्या परिणामांची पर्वा न करता, कामात अगदी आकंठ बुडून गेलेल्याला म्हणतात “ब्रह्मानंदी टाळी लागली आहे.” इथेपण सुखाचा नव्हे आनंदाचा उल्लेख. असंच उदाहरण परमानंदाचं पण देता येईल……

झालं ….. प्रश्न पडला ….. कुठला शब्द कुठे वापरायचा? सुख कधी म्हणायचं आणि आनंद कधी म्हणायचं?

असं काही विचित्र लक्षात आलं की मग शोधाशोध सुरू होते …. उत्तराकरता…. सुख काय असेल? आनंद काय असेल?

आजकाल प्रश्न पडला कि पहिले आठवण येते ती गूगल ची. मग काय…. केलं सर्च ….. आल्या सतराशे साठ लिंक्स….. बसलो वाचत ….. शब्द डोक्यात जात होते पण पटत नव्हते….

Sukh (happiness) is temporary, external, and depends on material things, achievements, or sensory pleasures. It always has a counterpart (dukh/sorrow). Anand (bliss) is permanent, internal, and independent of external circumstances. It is a state of lasting peace and spiritual fulfillment rooted within your own.

म्हणजे सुख (Pleasure/Happiness) हे बाह्य गोष्टींवर, परिस्थितीवर आणि वस्तूंच्या प्राप्तीवर अवलंबून असते, त्यामुळे ते तात्पुरते असते. याउलट आनंद (Joy/Bliss) हा आंतरिक असतो, जो कोणत्याही बाह्य घटकांवर अवलंबून नसतो आणि तो कायमस्वरूपी किंवा स्थिर मनाची स्थिती असते.

झालं? अजून गोंधळ वाढला….. अजून वाचायला लागलो….

नव्या नव्या व्याख्या कळायला लागल्या…… पण अजूनही समर्थांचे ,”जागी सर्व सुखी….” मधलं सुख आणि “आनंदवनभुवनी” मधला आनंद काही केल्या गवसत नव्हता. एखादी वस्तू खूप निकडीची असावी, घरातच आहे हे पण माहित असावं पण शोधून पण सापडू नये अशी अवस्था झाली. अगदी चष्म्या सारखं म्हणा नं ….. त्यावाचून अडतंय पण तोच सापडत नाही ……

आणि चषमा सापडायचं नेहेमीच ठिकाण…. आपल्याच कपाळावर किंवा गळ्यात लटकलेला …… अगदी तसाच लागला शोध सुखाचा अन आनंदाचा देखील ….

साधं कारण …. अगदी कालच शाळा सुरु झाल्या…. माझी मोठी मुलगी दुसरीत आणि लहाना पाहिलीत….. मी संध्याकाळी घरी आलो. लहाना धावत धावत मला सांगायला आला, “बाबा, आज ताई ला तिच्या मैत्रिणींनी चॉकोलेट दिलं ….. पण तिनी खाल्लं नाही, ती माझ्यासाठी घेऊन आली.” लहान्याला काय न मागता चॉकलेट मिळालं होतं…. घरभर हुंदडत होतं ….. पण….
चेहेरा त्याच्या मोठ्या बहिणीचा चमकत होता. एक छानसं हासून ती म्हणाली, मला तर मैत्रिणी नेहेमीच देतात, आज त्याच्यासाठी आणलं …. तो बघा कसा माकडासारखा घरभर नाचतोय….

आता माझी ट्यूब लाईट पेटली….. लहान्याला चॉकलेट मिळालं ….. ते सुख…. पण भावाच्या सुखात तिला सापडला तो आनंद ….. चॉकलेट संपेल…. चव निघून जाईल पण…. ताईंनी माझ्यासाठी आणलं हे तो विसरणार नाही …… हा आनंद…….

बाह्य कारणांनी उत्पन्न होणारे, क्षणिक, नश्वर, इंद्रियांशी संबंधित, इच्छापूर्तीवर अवलंबून असते ते सुख पण स्वयंभू, निरंतर आणि शाश्वत चिरकाल राहणारा आनंद….  सुख हे 'घटना' आहे, तर आनंद ही 'अवस्था' आहे. सुख हे मिळवावे लागते; आनंद हा उलगडावा लागतो. सुख हे 'करायचे' असते; आनंद हा 'होण्याची' वृत्ती आहे.

आता खरी सुरुवात झाली शोधाची….. आता कुठे थोडा थोडा अर्थ कळायला लागला “आनंदवनभुवन” चा…..

लेखक

  • अभिषेक किन्हेकर

Post navigation

Previous: वर्धा नदी शोधयात्रा ​
Next: श्रीमदभागवत चिंतन – ४ नैष्कर्म
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.