Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

चुगली

सायली कराडे जुलै 10, 2026 1 minute read
0
the-cleveland-museum-of-art-h-gZtqTRFuk-unsplash.jpg

“तुला म्हणून सांगते/सांगतो, कोणाला सांगू नको हा!” या वाक्याने जिची सुरुवात होते ती, कानगोष्टीची जुळी बहीण म्हणजे “चुगली”. आता मी “सांगते” शब्दासोबत “सांगतो”चा ही उल्लेख केला तो केवळ योगायोग अथवा एकट्या स्त्री जातीचा उद्धार होऊ नये या माझ्या शालीन उद्देशामुळे नव्हे तर “ती” जशा तिच्या “ती”जवळ चुगल्या करते तसेच “तो” सुद्धा त्याच्या “तो” सोबत चुगल्या करतोच. हे वास्तव जाणून केला. काळाने अन् समाजाने उगाच स्त्री वर्गाला चुगल्या करण्यात पटाईत असल्याची उपाधी(?) देऊन ठेवलेली आहे. 

काही अगदीच शिष्ट – म्हणजे शिष्टाचार पाळणारे हो – सोडले तर बाकी सरसकट सगळे कधी न कधी कोणा न कोणासोबत कोणा न कोणाच्या चुगल्या करत असतातच. 

अगदी “स्ट्रॉन्ग माइंड्स डिस्कस आयडियाज,  अव्हरेज माइंड्स डिस्कस इव्हेंट्स, वीक माइंड्स डिस्कस पीपल” असं आपल्या सॉक्रेटिस महाशयांनी कितीही लिहून, सांगून ठेवलं असलं तरी चिंता कोण करेल? असू देत कमकुवत मन असलं तर, मनाला बरं वाटतं ना. झालं तर मग. 

तथाकथित महिला वर्गाची मक्तेदारी समजल्या जाणारी चुगली ही सर्व धर्म, सर्व वयोगट, सर्व आर्थिक, सामाजिक विभागणीतून तयार झालेले समाज गट, सर्व प्रकारच्या कामाच्या जागा अशी परमेश्वराइतकीच सर्वव्यापी आहे. परमेश्वराचे ठावूक नाही पण जिथे जिथे मनुष्याचे (शिष्ट नसलेले बरं का) अस्तित्व आहे, आन् जोवर या आकाशात सूर्य चंद्र आहेत तोवर चुगलीच्या आयुष्याला धोका नाही. 

टपरीवर चहा, कॉफीसोबत बिस्किटाइतकीच प्रिय असलेली, जेवणाच्या ताटावर अगदी मीठाइतकी नाही तरी लोणाच्याइतकीच महत्वाची असलेली चुगली. 

रोजच्या मालिका कितीही रंजक आन् मसालेदार असल्या तरी ताज्या चुगलीची मजा काही औरच. 

असंच एके ठिकाणी नोकरी करत असताना एक वाद सुरू झाला – जो शिष्ट विरुद्ध अ-शिष्ट ज्यांना सध्या भाषेत चुगलखोर म्हणूयात – यांच्यात सुरू झाला. विषय होता चुगली करण्याची गरज आहे अथवा नाही! तर यांचे शिष्टमंडळ – अर्थात ते एकटेच होते, बाकी मंडळी सर्व अशिष्ट. तर आमचे शिष्ट सभासदांनी मी चुगली करत नाही व मला चुगली करण्याची गरज भासत नाही असे जाहीर करून टाकले. आम्ही बापडी अशिष्ट जनता त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की चुगली करणे कसे गरजेचे असते. (आपणाला ते सांगेन च पुढे). परंतु महाशय अडूनच बसले. मग काय, आम्ही तसेही अशिष्ट. म्हटलं असू देत, आपणच कमकुवत मनाचे दुसरं काय. पण मग काही दिवसातच महशयांच्या संयमाचा कडेलोट झाला आन् त्यांनी एक छोटीशी का होईना पन चुगली निर्माण केलीच. तेही स्वतः च्या नकळत. आन् जोपर्यंत आमच्या हास्याचा गडगडाट झाला नाही तोवर त्यांच्या लक्षातही आलं नाही की आपण चुगली केलीय. 

चुगली करण्याचे साधारण दोन प्रकार मला आढळले. एक जिथे एकाच व्यक्ती अथवा व्यवस्थेविरुद्ध सातत्याने चुगली चालते आन् दूसरा जिथे फक्त काही विशेष नसताना फक्त चुगली करायची असते म्हणून जी व्यक्ती हजर नाही तिची चुगली चालते. दुसऱ्या वेळी ती हजर असली तर सगळे मिळून दुसऱ्या गैरहजर व्यक्तीची चुगली करायला मोकळे. आता दुसऱ्या प्रकारमागचं कारण माझ्या अल्पबुद्धीला अजून तरी कळलं नाही. पण पहिल्या प्रकाराबद्दल मला असं वाटतं की ती चुगली नसून आवडत नसलेल्या, त्रासदायक गोष्टींबद्दलचा उद्वेग असतो जो आपण सरळ समोर मोकाळेपणी व्यक्त करू शकत नाही आन् मनात ठेवलं तर त्रास होतो मग कुठे बाहेर काढायचं तर जे समदु:खी आहेत त्यांच्या जवळ. त्यात दोन फायदे असतात – आपण जे सांगतोय ते समोरच्याला फक्त ऐकून नाही तर अनुभवून समजलेलं असतं, आन् तीच व्यथा तोही मांडतो त्यामुळे चुगलीचा फुगा फुटून अंगावर येण्याची चिंता नसते. महागड्या मनोवैज्ञानिकाचे खिसे भरण्यापेक्षा सर्वसामान्य लोक छोट्या छोट्या ताणाचे विसर्जन चुगली करून करणे पसंत करत असावेत अगदी त्यांच्याही नकळत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोण आहात? – शिष्ट की अशिष्ट.. ?

#सुरपाखरू 

#३०दिवसात३० 

#प्रयोग२०२६


the-cleveland-museum-of-art-h-gZtqTRFuk-unsplash.jpg

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: वृद्धाश्रम
Next: तंबोरा एक जिवलग……६
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.