Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

व्यथा

हेमंत नाईक जुलै 15, 2026 1 minute read
0
1001101149.jpg
     वर सोबत जोडलेले एक सुंदर रांगोळी चित्र आज बघण्यात आले पण एवढे सुंदर चित्र असूनही त्यातील दुःखाचे भाव पाहून आनंद झाला नाही. रांगोळीकाराने अक्षरशः जीव ओतला होता त्या चित्रात. त्याच्या कलेने चित्र सजीव झाले खरं!! मला लिहिण्यासाठी आजचा शब्द मिळाला,
” व्यथा.. ” 
      ही सुंदर रंगोळी होती एका खूप वयस्कर जर्जर झालेल्या वृद्धेची. रांगोळी चित्र होत ते. खूपच सुंदर रंगवले होत!  चित्रात  उदास भाव होते जणू सर्व   जीवन निरस झाल्याचे भाव स्पष्ट दिसत होते त्या चित्रात. तिला खूप जास्तीचे मिळालेले आयुष्य त्रासदायक ठरत असणार. वेदनादायी  अव्यक्त दुःख.चित्रात पदराआड  दांबून ठेवलेला हुंदका हे चित्र बघताना तुम्हालाही जाणवेल.
      ‘हॅट्स ऑफ फॉर हिज आर्ट!”” त्याच्या कलेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
       एखादी गोष्ट नेमक्या वेळेवर मिळाली नाही तर वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो. मग प्रतिक्षा नोकरीची, लग्नाची, रोज लोकलने उशिरा येणाऱ्या नवऱ्याची, मुलाची, वास्तुयोगाची, सन्मानाची, नोकरीतल्या बढतीची… अगदी जीवनातील रस संपल्यावर, मिळालेल्या जास्तीच्या आयुष्यात शेवटी मृत्युंची पण प्रतिक्षाचं करावी लागते.
      वृद्धेचे बोलके चित्र आज माझ्याशी खूप काही बोलून गेले. 
“काय घोर मोठे  पाप 
देवा मी असे केले 
गेले वरती आप्त मित्र 
निरर्थक माझे जिणे!!
होती चार गोड पिल्ले 
नेली ती तू आधीच 
जन्म असं नको देऊ
तू पुन्हा तू कधीच!!
आनंद जेव्हा होता 
दिवस लवकर सरले 
आता क्षण अन क्षण
दुःखाचे ते रेंगाळाले!!
शरीवरच्या सुरकुत्यारे
दाट दाट खूप झाल्या
जिभेस चवही  नाही 
आवाज खोल तो गेला
!!
रांगोळी ती काढण्याला
मॉडेल झाले कुणासाठी
चेहरा होता किती सुंदर
अनोळखी आज माझ्यासाठी!!
डोळ्यास दिसें ते धुसर
सृष्टी सारी हलते डुलते 
कानाना नाही आता
आवाजाशी देणे घेणे!!
जराही झाली म्हातारी
दातांनी रजा घेतली
मेंदू अजून चिरतरुण
आठवांचे कोरडे पाणी!!
पूजले तुला रोज मनोभावे
पूर्ण माझ्या उभ्या आयुष्यात
“शंभरीनंतरचे  हे आयुष्य”
का दिला रे हा उगा शाप!!
 
उचलरे तू आता माझ्या बापा
विनवणे नित्याचे तुला रोज
वाट स्वर्गात पाहुनी थकले
माझी पिल्ले..अन सौभाग्य!!
एवढ्या दिर्घायुष्याचा शाप 
शत्रूलाही तू नको रे देऊ
नव्या अनोळखी दुनियेत 
नको उगाचच त्याला धाडू!!
नेशील  तू वरती जेव्हा
खरा आनंदाचा सोहळा रे
जे सवे येतील चितेपर्यत
करा तोंड गोड त्यांचे पेढ्याने !!
सुंदर रांगोळीत जिवंत झाली
बोलली ती माझ्याशी माऊली
तिची व्यथा  व्यक्त करण्या
दिल्या तिनेच मला शब्दओळी!! “
    “व्यथा” अर्थात दुःख देणाऱ्या समस्या वेगवेगळ्या असतात. गडगंज पैसे असतात पण   मुलबाळ नसत. मुलं असतात तर आई बापाना ते विचारत नसतात. सर्व काही सुखात चालू असताना अचानक दुर्धर आजार उद्भवतो. रोज खडूस बॉसची दादागिरी आता सहन होण्यापलीकडे गेली असते. नवरा वा बायकोशी अजिबात पटत नाही.अशी खूप अगणित उदहारण देता येतील. आपल्या “व्यथा”  सहजासहजी कुणी सांगण्यास तयार नसतो. त्यामागे आपण कुठंतरी कमी पडलो ही अपराधी भावना असू शकते. सुख  वाटल्याने वाढते आणि दुःखही शेअर केल्यानेच कमी होते. हे मात्र नक्की.
     आपण “शतायुषी व्हा.” अशी वाढदिवशी शुभेच्छा देतो पण शंभरी जो गाठतो त्याच्या “व्यथा”  त्यालाचा माहिती असतात. सगे सोयरे मित्र आप्त बरेच वर्ष आधीच देवाघरी गेलेले असतात त्या सर्वांच्या अंत्ययात्रेस जाण्याचे दुर्दैव भोगून झाल्यावर नकळत शंभरीनंतर एका अनोख्या विश्वात त्याचा प्रवेश होतो म्हणायला श्वास सुरु असतो तर गात्र साथ देत नाही. सारे जग अनोळखी वाटते त्याला. मधुर आठवणी असल्या तरी त्याच त्रासाच्या ठरत असतात… आणि मग नकळत हुंदका येतो…डोळ्यातून पाणीही येत नाही.. डोळ्यातले आसवही थिजून जातात आता त्याला फक्त एकच प्रतिक्षा असते ती म्हणजे वरच्याच्या आमंत्रणाची.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६a

Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: बक्षीस
Next: वंचित
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.