Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

शिक्षा

हेमंत नाईक जुलै 17, 2026 1 minute read
0
1001100453.png
     शिक्षा..हा शब्द शिक्षण या अर्थाचा असला तरी एखादी चूक झाली तर ती सुधारण्यासाठी पुन्हा ती करू नये ती कायमस्वरूपी लक्षात रहावी यासाठी शारीरिक वा मानसिक क्लेश भोगणे वा देणे म्हणजे शिक्षा. 
    “छडी लागे छम छम
    विद्या  येई घम  घम”
    विद्या छडीने प्राप्त होते अशा अर्थाच्या या ओळी आहेत, असं म्हणून  त्या वेताच्या छडीने नाठाळ विदयार्थ्यांना मार्ग दाखवणारे शिक्षक आमच्या वेळी भरपूर होते. त्या छडीला घाबरून  गृहपाठ नियमित होत असे.
     आमच्या शाळेत उशिरा येणाऱ्या मुलाना घन्टा झाली की बाहेर थांबवले जायचे आणि मग लाईनीत हात पुढे करून छडीचा प्रसाद घेतल्या शिवाय शाळेत प्रवेश होत नव्हता. 
     हल्ली एकुलता एक लाडाचा मुलगा असतो त्याला जर शिक्षकांनी चुकून रागावल  तरी आई वडील दुसऱ्या दिवशी शाळेत प्राध्यपकाकडे जाऊन शिक्षकांचीच तक्रार करतात . 
     मराठीत बोलताना अगदी सरळ वळणाचा आहे तो.. असे सरळ असल्याचा पुरावा म्हणून वापरता.. एक वळण हे सरळ कसे असू शकते हा एक गहन प्रश्न आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही अशी म्हण प्रचिलीत आहे. अगदी देवांनाही शिक्षा झाल्याचे पुराणात वाचतो, खोडकर श्री बालकृष्णाला यशोदेने उखळाला  बांधले होते. मुलावर चांगले संस्कार होण्यासाठी आई नाईलाजाने शिक्षा करते खरी पण तिचे मन मात्र दुःखी झाले असतें.
     लहानपणी शिक्षेसाठी शिक्षा असतें. शिक्षण देण्यासाठी वळण लावण्यासाठीच्या या बालपणाच्या शिक्षा वेगळ्या आणि मोठं झाल्यावर मात्र समाजाचे नियम तोंडण देशाचे कायदे तोडण हे गुन्हे मानले जातात त्यावेळी शिक्षेला दंड म्हणतात ती दंडाच्या स्वरूपात दिली जाते आर्थिक दंडापासून मृत्युंदंडापर्यंत.
    जैन धर्मात चुकलो असेल तर माफ करा असं जाहीर माफी मागणारे पर्युषण पर्वही असतें.
       शिक्षा भोगून पश्चाताप झाला नाही तर ती शिक्षा व्यर्थ असते. आत्मपरीक्षण करून स्वतःला स्वतःच सुधारण्याची सवय लावली पाहिजे.
      शिक्षा नाही झाली तरी कुणी चुकीचे वागला असेल तर अंतर्मन ती कबुली देत असते. त्यावेळी सज्जनांना होणारा आत्मक्लेश हा पण शिक्षेचाच एक प्रकार आहे.
     काही लोकांत कुणी मनाविरुद्ध वा स्वार्थाच्या आड वागले तर बदला घेण्याची, कठोर शिक्षा देण्याची खुनशीवृत्ती असते आणि रागाच्याभरात नको ते कृत्य करून जातात आणि स्वतः अजून मोठया शिक्षेचे धनी होता.
चुकीला क्वचित असे माफी 
शिक्षा मात्र नक्की असतें 
हातावर बसतात छड्या 
शाळेत तिचेहे रूप असते.
उठबशा खूप काढुनी थकता 
बालक नाजूक शाळे मधले 
वळण संस्कार देण्यासाठी 
गुरुजनाची ती धडपड चाले..
मोठाले डोळे आई करते 
धाक तिचा हो असतो भारी 
शिक्षा जर अवचित केली 
तिच्या नयनाना येते पाणी..
उन्मत्त तरी पुढे होऊनि 
अन्याय कुणी कुणावर केला 
न्यायदेवता न्यायमंदिरी 
शिक्षा देई ती गुन्हेगाराला..
न्यायदेवतेपुढे सर्वसारखे 
असे म्हणुनी डोळ्यावर पट्टी 
पुरावा सबळ नाही म्हणुनी 
इथेही सुटतात खरे आरोपी..
न्यायाचा तराजू घेऊनी हाती 
न्याय देई आंधळी न्यायदेवता 
सुटे चुकून इथं जरी कुणी तो 
बसतो त्यास देवाचा फटका.. 
पेराल तेच  ते खरं उगवते 
जाणुनी सर्वजनहो वागा 
” प्रेम कराअन प्रेमच  वाटा 
जीवनी नको शिक्षेला थारा..”
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: वसालीचा दवाखाना
Next: अजामिळोपाख्यान
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.