Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

भुलाबाई

सायली कराडे जुलै 19, 2026
0
4996.jpg
भुलाबाई किंवा भोंडला: समस्त महाराष्ट्रीय महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सण. फक्त सण नाही तर महिलांच्या संघर्षमय इतिहासातून कधीही पुसून न टाकता येणारा अविभाज्य घटक. आज वेळेअभावी पाच दिवस किंवा अगदीच एक दिवस साजरा केला जाणारा हा सण पूर्वी चांगला महिनाभर म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चालत असे.

आज बऱ्याच महिलांसाठी हा कदाचित एक जुनाट आणि सध्याच्या जगाशी फारसा ताळमेळ नसणारा सण असू शकतो. ही अनुत्सुकता, हा निरुत्साह सध्याच्या आधुनिक आणि बऱ्यापैकी स्वतंत्र आयुष्य जगायला मिळण्यातूनही येत असावा.
परंतू आपण एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे साहित्य मग ते लिखित असो वा तोंडी, गद्य असो वा पद्य; ते कधीही निरर्थक नसते; उलट ते ज्या काळात रचलेले असते त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीचे जीवंत चित्रण असते. आज आपण कितीही आधुनिक आयुष्य जगत असलो तरी एक महिला म्हणून आपल्याच भुतकाळात डोकावून पाहिले पाहिजे. आपण महिला म्हणून प्रस्थापित पुरुषसत्ताक प्रणालीशी संघर्ष करीत आणि सोबतच आपण महिलांनीच महिलांवर लादलेली बंधने झुगारून इथपर्यंत कसे येऊन पोहचलो याचा आढावा घेणे अत्यंत आवश्यक ठरते. आणि हे समजून घेण्यासाठी मदत करणारी दोन महत्त्वाच्या साहित्यसंपदा म्हणजेच जात्यावरच्या ओव्या व भोंडल्यांची गाणी!
लहानपणी ही गाणी म्हणत असतांना फक्त मज्जा वाटायची. ती गाणी संपवून खिरापत कधी मिळते याचीच जास्त प्रतिक्षा असायची. पण आज तीच गाणी मनाला सुन्न करुन जातात.
पूर्वीच्या काळी महिलांच्या वाट्याला येणारी उपेक्षा, आपल्याच जवळच्या स्त्री नातलगांकडून सहन करावा लागणारा छळ, एकमेकांबद्दल वाटणारी असूया, परावलंबी जीवन, अमाप शारीरिक कष्ट यातुन तात्पुरता दिलासा मिळण्यासाठी आणि सरळ तोंडाने सांगून मिळणार नाही म्हणून आडमार्गाने काढलेली सोय म्हणजे ही भुलाबाईची गाणी.
आपल्या आयुष्यातील अडचणींची तक्रार कुठेही सोडवल्या जाणार नाही हे पक्के ठावुक असुनही मनात साचलेल्या विचारांना वाट करुन देऊन पुन्हा नव्याने जगण्याचा शोधलेला मार्ग.
आज आपण एक व्यक्ती म्हणून मोकळा श्वास घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला अशा सणांची आवश्यकता भासत नाही असं आपल्याला वाटतं. पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे आधीपेक्षा आताच्या स्त्री चं आयुष्य अधिकच गुंतागुंतीचं झालंय. पूर्वी अशा गाण्यांच्या वाटे स्त्रीयांनी आपली घुसमट बाहेर काढली तरी सगळे ते मोकळ्या मनाने स्वीकारत असत. त्याची कोणी अढी धरुन बसत नसे. आज मात्र आपल्या साध्या बोलण्याचा कोण कसा अर्थ काढेल आणि त्यातून उद्भवणारे वाद कुठल्या टोकाला जातील याच्या धास्तीने स्त्रीला मनमोकळेपणाने कोणाजवळ बोलणेही दुरापास्त होऊन बसले आहे.
म्हणूनच आपल्या महिला पूर्वजांच्या संघर्षाची आठवण म्हणून आपण हा सण साजरा करत राहिलो तर आपल्याही भावनांना सहज वाट करून देता येईल.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: चांदणे शिंपीत जाशी
Next: Live From The Field
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.