Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पसारा

सायली कराडे जुलै 25, 2026
0
gumohor-water
रोज सकाळी डोळे किलकिले करून आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत कोनाडे भरून पसारा पाहिल्यावर स्वतःची आणि त्या पसाऱ्याचीसुद्धा सारखी चीड यायची. आज नको, उद्या करू; उद्या नक्की करू; उद्या कोणत्याही परिस्थितीत करायचंच असा काही सहस्र वेळा जप करून झाला तरी तो पसारा काही जागचा हालत नव्हता. कमी तर होतच नव्हता; उलट दिवसेंदिवस त्याचं वय आणि आकार वाढत चालला होता आणि माझ्या आयुष्यातली त्याची व्याप्तीसुद्धा.

एके दिवशी त्याचासुद्धा वाढदिवस — माफ करा, जन्मदिवस — साजरा करण्याची वेळ येते की काय, असं वाटू लागलं. आणि मीच का आवरला पाहिजे पसारा? त्याचा तो स्वतःला आवरून का घेत नाही? असं म्हणूनही काहीच होणार नव्हतं. अशी माझी टाळाटाळीची टळटळीत दुपार डोक्यावर आल्यावर शेवटी पुन्हा एकदा मनाने ध्यास घेतला. काहीही झालं तरी आता पसारा आवरायचाच, असा मनाशी दृढ निश्चय करून मी कल्पनेतला पदर प्रत्यक्षात कमरेचा खोचला आणि सुरू केलं मिशन पसारा.
संपूर्ण कोनाडा रिकामा करून झाल्यावर लक्षात आलं की मी त्या पसाऱ्याच्या रिंगणाच्या मध्यभागी उभी आहे आणि आता बाहेर कसं पडलं पाहिजे याची योजना मला तयार करावी लागेल. मग कसं बसं फसलेल्या चक्रव्यूहातून जेमतेम पाऊल मावेल एवढी वाट काढण्यात मी यशस्वी झाले. मग कोनाडे पुसून त्यावर तेच ठरलेले मागच्या वर्षीच्या दिनदर्शिकेचे कागद फाडून आकार सारखा करून त्यांची मानाची जागा त्यांना मिळवून दिली. मग परत पसाऱ्याकडे मोर्चा वळवला.
कामाच्या वस्तू एकीकडे, बिनकामाच्या दुसरीकडे. दरवेळी हेच करत असताना बिनकामाच्या वस्तू जमा कशा होतात, हा एक यक्षप्रश्न समोर येतो. याचं उत्तर ना यक्षाला माहीत असेल, ना युधिष्ठिराला…
बिनकामाच्या वस्तू कचऱ्याकुंडीत स्थिरावल्यानंतर तात्पुरती विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला लागतीलच — कचरा गाडीत बसून…
मग कामाच्या वस्तूंवरून एक स्वच्छ फडके घेऊन त्यांना आंजारून, गोंजारून पुसून झालं की त्यांची रवानगी कोनाड्यांमध्ये — त्यांच्या जात, वर्गवारीनुसार त्या त्या कोनाड्यात — पुस्तकांच्या जागी पुस्तकं, भांड्यांच्या जागी भांडी, आणि काय काय…
सगळ्यांनी व्यासपीठावर अर्थात कोनाड्यांमध्ये आपापलं मानाचं स्थान ग्रहण केलं की आपण दोन वेळा झाडून, नंतर दोन वेळा फरशी पुसायला मोकळे.
मग पसारा आवरून झालाच आहे तर स्वतःचा पसरलेला आणि घामाने डबडबलेला अवतारदेखील धुऊन, पुसून, आवरून झाल्यावर पुन्हा त्या आवरलेल्या पसाऱ्यावर नजर जाते आणि विचार येतो — या वेळी किती दिवस टिकणार आहे हे सगळं…
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: Live From The Field
Next: पाठवा पुढे संस्कृती अर्थात फॉरवर्ड कल्चर
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.